Home > मॅक्स ब्लॉग्ज > कंगना रणौतच्या वक्तव्यावर मोदीचं मौन का?

कंगना रणौतच्या वक्तव्यावर मोदीचं मौन का?

कंगना रणौतच्या वक्तव्यावर मोदीचं मौन का?
X

एकीकडे देशभरात देशाच्या स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्याने देशात नवा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तिच्या या वक्तव्याला आता अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील समर्थन दिलं आहे. मात्र, या सर्व वक्तव्यावर मोदी यांनी ब्र शब्द देखील काढलेला नाही. त्यामुळं कंगना रणौतच्या या वक्तव्याला मोदी यांचं देखील समर्थन आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

त्यामुळं कंगनाच्या वक्तव्याचं भाजप समर्थन करते का?, कंगना कोणाची भाषा बोलते?, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांना भाजप मोठी पद का देतं?, कंगनाच्या वक्तव्यामागे काही षडयंत्र आहे का?, देशाचा नवीन इतिहास लिहिण्याचा हा प्रयत्न आहे का? या सर्व प्रश्नासंदर्भात अशोक वानखेडे यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा


Updated : 15 Nov 2021 5:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top