खुनाची मानसिकता व त्यामागची कारणे - ॲड. वैभव चौधरी
खून,आत्महत्या करण्यामागे कोणती मानसिकता असते ? याकाळात मनाची स्थिती नेमकी काय असते? वाचा गुन्हेगारांच्या मानसिक स्थितीचे विवेचन करणारा ॲड. वैभव चौधरी यांचा लेख…
X
हिंदू (Hindu) असो किंवा मुस्लिम (Muslim)आपण सगळे भारतात (India)एखादी घटना घडली की आरोपींची जात धर्म(Cast) कोणता आहे ते पाहतो आणि मग भूमिका घेतो. किती संकोचिंत आहोत आपण सगळे... परंतु त्या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्या घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. खून (Murder)करणाऱ्यांचा कोणताही धर्म नसतो किंवा जात नसते. कोणताही प्रियकर ज्यावेळी त्याच्या प्रेयसीचा खून किंवा एखादी प्रेयसी ज्यावेळी तिच्या प्रियकराचा खून करत असते त्यावेळी त्यांच्यात असणारे आपआपसातले संबंध बिघडलेले असतात. दोघांपैकी एक कुणीतरी कोणाला फसवत असतो त्या कृतीचा अतिरेक होतो, पुढच्या व्यक्तीची सहनशिलता संपते त्यावेळी तो खुन करायच्या निर्णयाप्रत जातो. असं पाऊल उचलणारी व्यक्ती खूप भावनिक व संवेदनशील असते त्या व्यक्तीला आपल्याला फसवलं आहे, आपल्या प्रेमाचा विश्वाचाचा वापर करून घेतला आहे, आपल्याला धोका दिला आहे हे सहन होत नाही, त्यात तो झुरत असतो, स्वतःला खात असतो मग राग, द्वेष या सगळ्या भावना एकत्र येऊन त्याला ज्या व्यक्तीने त्याची किंवा तिची फसवणूक केली आहे, वापर केला आहे. अशा व्यक्तीचा खून करू वाटतो व तसे केल्याशिवाय त्याला मानसिक शांतता मिळणार नाही अशा प्रकारची बदला किंवा सूड घेण्याची भावना त्याच्या किंवा तिच्या मनात घर करून बसते. त्यामुळे प्रेमसंबंधात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. सेम असेच आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या बाबतीत घडते. वरीलप्रमाणे जे सांगितले आहे ते या लोकांना सहन होत नाही. परंतु पुढच्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम केल्यामुळे त्यांना त्या व्यक्तीला जीवे मारण्यापेक्षा स्वतः आत्महत्या करून मोकळं होऊशी वाटतं. बदला किंवा सूड घेण्याची भावना यांच्या मनात येत नाही. वरीलप्रमाणे हीच परिस्थिती नवरा बायकोच्याही(Husband-Wife)संबंधात लागू पडते. अशा घटनांच्या मध्ये कधीच कोणती जात नसते किंवा कधीच कोणता धर्म आडवा येत नसतो. हे आपण समजून घेतले पाहिजे.
कालच बिहार मध्ये एक घटना घडली लग्न झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी नवऱ्याला बायकोच्या चालू असलेल्या लफडया बद्दल कळल्यावर प्रियकराच्या मदतीने बायकोने नावऱ्याचा खून केला. तिचं लफडं नवऱ्याच्या चुलत भावा बरोबर होते. सुदैवाने या घटनेचा संबंध कोणी धर्माशी लावला नाही. पण यातलं मूळ स्पष्टपणे दिसून येत आहे. कोणत्याही व्यक्तीला आपली फसवुक झाल्याची, आपला वापर केल्याची, आपल्याला धोका दिल्याची घटना सहन न होण्यासारखी आहे. मित्रांनी , नातेवाईकांनी धोका दिला तर तो आपण सहन करतो किंवा परत कधीतरी वेळ आल्यावर बदला घेण्याचा विचार करून आपण त्यांच्याबद्दल असेलला राग द्वेष तात्पुरता गिळून टाकतो व पुढे निघतो परंतु जोडप्यांमधले प्रेम संबंध, नवरा बायको मधले प्रेम संबंध हे खूप नाजूक असतात. त्यांना खूप जपावे लागते. त्यात जर धोका देणाऱ्या घटना घडल्या तर त्या घटना व्यक्तीची मानसिक स्थैर्य पूर्णपणे उध्वस्त करतात. व्यक्तीची जगण्याची इच्छा सुद्धा त्याच्याकडून हिसकावून घेते त्यामुळे अशा घटनांमध्ये मरो अगर मारो ची परिस्थिती निर्माण होते. मग अशा वेळी तुम्ही कितीही श्रीमंत असा आणि कितीही प्रतिष्ठित असा तुम्हाला तुमच्या मरो अगर मारोच्या मानसिक परिस्थिती मधून कोणी वाचवू शकत नाही. खूप कमी लोकं अशी असतात जी यातून बाहेर निघतात. काही नवीन आयुष्य सुरू करतात आणि काही त्यात झुरतात व उधळपट्टी करून मरण्याची वाट पाहातात.
परंतु दंगली मध्ये मारल्या गेलेल्या व मारणाऱ्या लोकांची मानसिकता वेगळी असते. त्या ठिकाणी हमखास जातीय, धार्मिक व राजकीय मानसिकता असते. लोकांचे आपापसात काही वाद नसतात परंतु सत्ता मिळवण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठी राजकीय पक्ष हलक्या मेंदूच्या लोकांची मानसिकता किंवा आपण असं म्हणू की जातीय धार्मिक मानसिकता व त्यांच्यात असणारा द्वेष ओळखून समाजा समाजात भांडणे लावून देतात. राजकीय पक्षांची समीकरणे वेगळी असतात. ते लोकांच्यात भांडणे लावून समाजातील वातावरण अस्थिर करतात. मग यामध्ये घाबरलेल्या गटाला अभय देण्याची हमी देऊन निवडणूक प्रचार करायचा आणि वरचढ ठरलेल्या गटाला हाताला धरून तूच ग्रेट आहे, तुझ्याशिवाय पर्याय नाही, तुझंच आहे हे सगळे असं सांगून त्याची मते खायची...
असो... तूर्तास एवढंच बास झालं. दंगलीचे (Riot) सोडले तर बाकी सगळ्या खुनाच्या घटनेमध्ये आपापसातील संबंध खराब झाल्यामुळे, विश्वासघात केल्यामुळे अशा घटना घडतात.
या घटना रोखण्यासाठी नात्यात प्रामाणिकपणा, विश्वास खूप महत्त्वाचा आहे. नात्याचा आदर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तरच अशा घटना घडणार नाहीत. त्यासोबत तरुणांना विवाहाचे स्वातंत्र्य देणे. त्याला त्याच्या तिच्या आवडीच्या व्यक्ती सोबत लग्न करू देणे किंवा त्याचे तिच्या सोबत लग्न लावून देणे. काही अडचणी असतील तर त्याला समजावून सांगणे. ऐकत नसेल तर त्यांचा मार्ग मोकळा करणे. त्यासोबतच ज्याच्या त्याच्यावर त्याच्या लग्नाची जवाबदारी टाकणे. आवडीच्या व्यक्ती सोबत लग्न करण्याचे म्हणजेच प्रेमविवाह करण्याचे स्वातंत्र्य व त्या विवाहाची सर्व खर्चाची जवाबदारीही त्यांच्यावर टाकणे. तुमचे तुम्हीच कमवा व निर्णय घ्या. पैसा बापाचा आणि रुबाब पोराचा असे नाही चालणार. बळच कुणासोबत लग्न लावून त्यांच आयुष्य बरबाद करू नका आणि वडील धार्यांनीही ताण घेऊ नका. पहिला काळ गेला मुलांनी व मुलींनी बळच सहन केलं. संसार केला परंतु त्या गोष्टी आता शक्य नाहीत. जमाना बदलला आहे.
असो.....
©️ॲड. वैभव चौधरी
( पुणे जिल्हा व सत्र न्यायालय )