तेव्हा हे स्टार झोपले होते का?
बॉलिवूडच्या ३४ मोठ्या निर्माता-दिग्दर्शक-सुपरस्टारनी एकत्र येऊन त्यांच्या व्यवसायाची बदनामी केल्याबद्दल काही वाहिन्यांवर खटला भरलाय… मात्र, देशातील घटकांना, वर्गांना, पक्षांना, नेत्यांना किंवा अगदी विद्यापीठांनाही बदनाम केलं जात असताना हे स्टार झोपले होते का? वाचा अजित अनुषशी यांचा लेख
X
बॉलिवूडच्या ३४ मोठ्या निर्माता-दिग्दर्शक-सुपरस्टारनी एकत्र येऊन त्यांच्या व्यवसायाची बदनामी केल्याबद्दल काही वाहिन्यांवर खटला भरलाय… ही एक महत्त्वाची घटना आहे. यात काही हिंदू आणि काही मुस्लिम व्यक्ती आहेत. (हो, 'नव्या भारतात' दुर्दैवाने असले हिशेब द्यावे लागतात.) काही फिल्मी घराण्यातून पुढे आलेत, तर काही 'बाहेरचे' आहेत. काहींनी पंतप्रधानांसोबत फोटो काढलेत, तर काही भाजपप्रणीत मुख्यमंत्र्यांसोबत वेगवेगळ्या योजनातही सहभागी झालेले आहेत.
आता एव्हढ्या सगळ्यांनी एकत्र येईपर्यंत वाहिन्यांवर लक्ष ठेवणारी सरकारी यंत्रणा कुठे झोपली होती? हा एक प्रश्न आहे. या मंडळींना केलं, तेव्हढंच किंवा त्याहून अधिक बदनाम समाजातल्या इतर घटकांना, वर्गांना, पक्षांना, नेत्यांना किंवा अगदी विद्यापीठांनाही बदनाम केलं गेलं. तेव्हा हे स्वतः कुठे झोपले होते? हा दुसरा प्रश्न आहे.
आणि वीज गेल्यावर टीव्ही स्टार्स क्रिकेट खेळत होते, याचे फोटो छापणाऱ्या असंख्य वृत्तपत्रांना ही बातमी सापडत का नाही? त्यावर काही विश्लेषण दिसत नाही? हाही एक तिसरा प्रश्न आहेच…. तूर्तास, वाहिन्यांचा वापर करून स्वतःचा ओंगळवाणा अजेंडा चालवणाऱ्यांना काही चाप बसणार का? हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे…!!
(अजित अनुषशी यांच्या फेसबुक भिंतीवरून)