Home > News Update > थाळ्या,घंटा बडवून नाही तर वैद्यकीय यंत्रणांबाबत ठाकरे सरकार जागरुक राहिल्याने कोरोना आटोक्यात- सामना

थाळ्या,घंटा बडवून नाही तर वैद्यकीय यंत्रणांबाबत ठाकरे सरकार जागरुक राहिल्याने कोरोना आटोक्यात- सामना

थाळ्या,घंटा बडवून नाही तर वैद्यकीय यंत्रणांबाबत ठाकरे सरकार जागरुक राहिल्याने कोरोना आटोक्यात- सामना
X

मुंबई : महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, ऑक्सिजन पुरवठा, औषधांचा पुरवठा, निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टींबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिले म्हणूनच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला आणि दिवाळीच्या तोंडावर राज्यातील टाळे उघडता आले.राज्यात निर्बंध उठलेच आहेत. पण भाजपच्या आंदोलनानंतर नाही तर डॉक्टरांच्या 'टास्क फोर्स' ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले. तेव्हा आता आम्हालाही जगू द्या आणि तुम्हीही जगा, असा टोला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

ठाकरे सरकार जागरुक राहिले म्हणून कोरोना आटोक्यात आला. कोरोना संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन जितके महाराष्ट्राने केले, तितके ते अन्य राज्यांनी केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रात कोणत्याही बाबतीत घिसाडघाई केली गेली नाही, अत्यंत सावधपणे लॉकडाऊनचे टाळे उघडले. दिवाळीपूर्वी राज्यात निर्बंध शिथिल करत दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा परवानाच जनतेला दिला. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने रात्री 12 पर्यंत उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होत आहेत. मॉल्स आधीच उघडले आहेत. हे सर्व विरोधी पक्षाच्या आंदोलनानंतर नाही तर डॉक्टरांच्या 'टास्क फोर्स'च्या मान्यतेनंतरच मंदिरं उघडली!

काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या 'टास्क फोर्स'ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले.असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

थाळ्या आणि घंटां वाजवून नाही तर विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चरमुळे लोकांचे प्राण वाचले,असं म्हणत पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधतण्यात आला. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आपल्या प्रिय पंतप्रधानांनी 'थाळ्या वाजवा कोरोना पळवा' असा दिव्य संदेश दिलाच होता. मात्र, थाळ्या वाजवून उपयोग झाला नाही आणि कोरोनाने जशा जागोजागी चिता पेटल्या तशी गंगेत शेकडो प्रेतांना जलसमाधी देण्यात आली. त्यामुळे थाळ्या आणि घंटा यापेक्षा विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचवत असतात. राज्यात ठाकरे सरकार जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले असं सामानातून म्हटले आहे.

Updated : 20 Oct 2021 11:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top