राजकर्त्यांनो, महिलांना तिच्या कपड्यांवरून जज करणं बंद करा: राही भिडे संतापल्या
X
सध्या राखी सावंत चांगलीच भडकली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी तिची तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबत करत कमी कपड्यांवरून तिच्या बौद्धिकत्वर विधान केलं आहे. त्यामुळं ती चांगलीच भडकली आहे. मात्र, या निमित्ताने महिलांच्या कपड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
राजकारणात किंवा सबंध समाजात काही झालं की महिलांच्या कपड्यांवरून त्यांना जज करण्यात येतं. राखी सावंत सारख्या अनेक फॅन फोलोवर असणाऱ्या लोकांचा वापर राजकारणी आपल्या फायद्यासाठी करत असतात का? त्यानंतर त्यांच्याविरोधात टिका-टिप्पणी करण्यासाठी हेच राजकारणी उभे ठाकल्याचं चित्र अनेकदा का पाहायला मिळतेय? राजकारणाचा दर्जा मुलींच्या कपड्यांवर, चारित्र्यावर येऊन का ढासळतो? यासंदर्भात राजकीय ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रने बातचीत केली.
राही भिडे सांगतात की, दिवसेंदिवस राजकारणाचा दर्जा घसरत चालला आहे. त्याचबरोबर कुणाशी-कोणाची तुलना कराव, काय बोलांव याच भान राज्यकर्त्यांना राहिलेलं नाही. राजकारणाचा दर्जा पूर्वी जसा पाहिला मिळत होता. तो आता पाहायला मिळत नाही. विशेष करून महिलांच्या बाबतीत काहीही बोललं जातं आहे. स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी महिलांच्या कपड्यांवर आणि त्यांच्या चारित्र्यावर बोलणं थांबवलं पाहिजे. ही राजकारणाची संस्कृती नाही. असं मत राही भिडे यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान काय म्हटले होते हृदय नारायण दीक्षित? उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भाजप प्रबुद्ध वर्ग संमेलनामध्ये विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांची जीभ घसरली. भाषण देताना ते म्हणतात की, मी 6 हजार पुस्तकं वाचली आहे आणि त्याचे विश्लेषणही केलं आहे.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करताना ते सांगतात की गांधी कमी कपडे घालायचे. त्यांना देश बापू बोलत असे. परंतु असं नाही की कमी कपडे घालून कुणी बौद्धिक होतं. कमी कपडे घातले किंवा उतरविल्यानं जर कुणी मोठं बनत असतं. तर आज राखी सावंत महात्मा गांधी यांच्या पेक्षाही मोठी झाली असती. असं विधान केलं होतं.