Home > मॅक्स ब्लॉग्ज > अदानी समुहाचे शेअर्स कोसळले, वस्तुस्थिती काय आहे?

अदानी समुहाचे शेअर्स कोसळले, वस्तुस्थिती काय आहे?

खरंच अदानी समुहाचे शेअर्स पडले आहेत का? काय आहे वस्तुस्थिती? जाणून घ्या पडद्यामागचं अर्थकारण अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांच्याकडून

अदानी समुहाचे शेअर्स कोसळले, वस्तुस्थिती काय आहे?
X

अदानी समूहातील कंपन्यांवर कारवाई केलेली नाही; अदानी समूहातील कंपन्यात गुंतवणूक करणाऱ्या तीन परकीय गुंतवणूकदार कंपन्यांवर तथाकथित कारवाई केली आहे. ही कारवाई सेबीने केलेली नाही तर एनएसडीएल ने केलेली आहे. ही कारवाई या तीन कंपन्यांनी काही माहिती पुरवली नाही म्हणून प्रचलित नियमानुसार केली आहे; हे तांत्रिक मुद्दे आहेत, म्हणजे आवश्यक ती माहिती पुरवली, काही बाही दंड भरला की अकाउंट डिफ्रिझ होऊ शकतील.

या तीन कंपन्यांचे अकाउंट्स फ्रीझ केले गेले; कधी ३१ मार्च २०२१ किंवा त्यापूर्वी (संदर्भ इकॉनॉमिक टाइम्स)

मग बातमी जवळपास अडीच महिन्यांनी का झळकली?

शासकीय संस्था धनदांडग्यांना मोकाट सोडतात असा आरोप नेहमी केला जातो; त्यात वित्तीय क्षेत्राचे रेग्युलेटर्स असतील, पोलीस किंवा न्याययंत्रणा देखील असेल. त्यामुळे या घटनेप्रमाणे तटस्थ, निपक्षपाती काम करण्याची अपेक्षा असणाऱ्या संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येते. त्यातून राज्यकर्त्या पक्षाची व राज्यकर्त्या वर्गाची विश्वासार्हता धोक्यात येते.

लोकशाही प्रणालीत नागरिकांच्या कन्सेंटने, सहमतीने नागरिकांवरच राज्य करण्याचे जे सूत्र आहे. ते कमकुवत होते; दीर्घकाळासाठी हे चांगले नसते. म्हणून मग अधून मधून जे दादा लोक असतात त्यांच्यावर देखील आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करण्यास कुचराई करत नाही हे सिद्ध केले जाते (सगळ्या यंत्रणा हे सगळे करतात)

त्यातून सिस्टीमची विश्वासार्हता पुनर्स्थापित होण्यास मदत होत असते. स्टॉक मार्केट मध्ये हर्षद मेहता सारखा काही घोटाळा सुरु आहे अशा गंभीर बातम्या येत आहेत. त्यातून उत्साहाने पुढे येणारे घरगुती गुंतवणूकदार स्टॉक मार्केट कडे पाठ फिरवू शकतात; अशा कारवाईमुळे त्यांना अंशतः दिलासा मिळू शकतो.

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स एका सरळ रेषेत वाढत गेले आहेत. त्यांना करेक्शन ची गरज होती. ती देखील यामुळे भागवली जाईल. एका दगडात किती पक्षी मारतात बघा ! व्यक्तींना भ्रष्टाचारी वगैरे लावणे सर्वात सोपे; सिस्टीम समजून घेणे महत्वाचे असते.

संजीव चांदोरकर (१४ जून २०२१)

Updated : 14 Jun 2021 3:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top