Home > मॅक्स ब्लॉग्ज > जागतिक सेक्स वर्कर दिवस

जागतिक सेक्स वर्कर दिवस

महिला वेश्य़ा व्यवसायाकडे का वळतात? जागतिक सेक्स वर्कर दिनानिमित्त शितल पाटील यांचा विचार करायला लावणारा लेख

जागतिक सेक्स वर्कर दिवस
X

जगभरात असंख्य दिवस साजरे केले जातात... हल्ली तर दिनविशेष trending सुरू आहे. परंतू आजचा दिवस विचारात घेतला तर सहसा या विषयावर कोणी उघडपणे बोलायला तयार नसत आणि जर कोणी बोललेच तर ते असे की, वेश्या व्यवसायामुळे (Sex Worker), समाजातील आई बहिणींची अब्रू सुरक्षित राहते. बलात्कार कमी होतात वगैरे वगैरे...

परंतू एक दृष्टिक्षेप या समाजाकडे टाकला तर लक्षात येईल की, या व्यवसायाला शासन मान्यता देत नाही आणि नाही समाज मान्य करतो. परंतू याच समाजातील उच्चभ्रू प्रतिष्ठित वर्गातील माणसाचं यांचे ग्राहक असतात.

समाजातील या घटकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. वैश्या व्यवसायातील (Sex Worker Womaen) स्त्रियांना सन्मानाचे स्थान तर सोडाच परंतु जगण्याचे स्वतंत्रही मिळणे अवघड असते.

बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे की, ह्या स्त्रिया (Sex Worker) आपल्या स्वच्छेने या व्यवसायात येतात. कारण त्यांना चैनीचे आणि आरामचे जीवन जगायचे असते. परंतू यातील मूळ समजून घेतलं तर, कोणत्या स्त्रीला आपले शरीर नाराधमसमोर खायला वाढून आराम मिळत असेल?

तर 2 जून जागतिक स्थरावर सेक्स वर्कर डे (Sex Worker Day) निमित्त वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या समस्या समजून त्यावर निराकरणासाठी प्रयत्न झाले पाहिजे. या एकाच Approach साठी हा दिवस नेमलेला आहे. ना की, इतर दिवसांप्रमाणे म्हणजे व्हॅलेंटाईन डे सारखा साजरा केला जातो.

समाजातील हा एक गट म्हणजे रोजंदारी वर देह विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. अश्यात समाजाचा या वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत हीन आणि तुच्छतेने असतो. या व्यवसायावर सिनेमा काढून तो प्रकाशित करायला सेन्सर बोर्ड परवानगी देतो. मात्र, उघडपणे या व्यवसायाला मान्यता नाही..!!!

नाही... म्हणजे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की यावर उपायकारक योजना सरकार काढत नाही. परंतु या गटासाठी अपायकारक परिस्थिती मात्र, निर्माण करून दिली जाते.

लॉकडाऊन दरम्यान देशातील सर्वांच्या समस्या समाजासमोर मांडल्या गेल्या म्हणजे स्थलांतरित कामगार असतील, इंडस्ट्रियल वर्कर असतील, माणूस घरात आहे म्हणून घर नसलेले भीक मागून पोट भरणारे, असे अनेक घटक ज्यांना-ज्यांना लॉकडाऊन च्या झळीने चटके दिले ते सर्व एव्हाना लॉकडाऊन असल्याने रस्त्यावरील प्राण्यांची झालेली दैना सुद्धा लक्ष्यात घेतली गेली. परंतू वेश्या व्यवसायातील समाजाचा दूर दूर पर्यंत कुठेच प्रश्न विचारत घेतला गेला नाही...

खरंतर त्यांचा व्यवसाय हा समाज मान्य आणि शासन मान्य नसल्याने त्यांची कुठे नोंद नाही किंवा त्यांच्या नावे आधार कार्ड, राशन कार्ड सुद्धा नाही म्हणून कदाचित दुर्लक्ष झाले असावे...

त्यातल्या त्यात HIV संक्रमणाची शक्यता ही या गटातील स्त्रियांना जास्त असते, शिक्षणाच्या अभावामुळे Health hygiene चा विषय गंभीर असतो, परंतु तरीही कायम मानवाधिकार व मूलभूत हक्क या सगळ्या तरतूदी मधून त्यांना वगळले जाते.

परंतु आज मला या ठिकाणी सर्वांना आवर्जून सांगावे वाटते की, वेश्या व्यवसायातील स्त्रिया जन्मतः वेश्या नसतात. त्या आधी माणूस आहे आणि दुर्दैवाने म्हणा काही म्हणा या व्यवसायात जाण्याची अनेक कारणे असतात. म्हणून सहिष्णू धर्मनिरपेक्ष भारतात माणूस धर्म सर्वप्रथम पार पाडा, माणुसकी आपोआप जपली जाते. वेश्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायच्या हेतूने का होईना पण एक दृष्टिक्षेप यांच्या समस्यांवरही टाका...

शितल पाटील

Updated : 2 Jun 2021 8:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top