कोई भी सरकार इतनी बेरहम कैसे हो सकती है: रवीश कुमार
X
ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. रवीश कुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून या पोस्टमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधताना रवीश कुमार म्हणतात...
कोई भी सरकार इतनी बेरहम कैसे हो सकती है।
कोणतं सरकार इतकं निष्टूर कसं असू शकतं. असं रवीश कुमार आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
काय आहे रवीश कुमारची पोस्ट?
एप्रिल च्या कोरोना लाटेत तुमची नोकरी गेली आहे का? असा ठळक मथळ्याखाली लिहिलेल्या पोस्ट मध्ये रवीश म्हणतात...
सेंटर फ़ॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनमी च्या नवीन सर्व्हेमध्ये 34 लाख लोकांची नोकरी गेल्याचं समोर आले आहे. ज्यांची नोकरी गेली आहे. त्या लोकांना आता काय वाटत असेल. या परिस्थितीत जर कोणाच्या घरावर आजाराने दार ठोकावलं तर ते आतून किती तुटून जातील.
रोगावर खर्च करण्याची ताकद त्यांची संपली आहे. त्यांच्या खात्यावर कोणतीही मदत दिली जात नाही. आणि बॅंक कोणतं कर्जमाफ करणार नाही.
सरकारला असं वाटतं का लोकांना काहीच नको आहे. व्हाट्स अप यूनिवर्सिटी चा प्रोपोगंडा ही सरकारचं जीवन आहे का? इतकी निष्टूर सरकार असू शकते का? मध्यम आणि लघू उद्योगाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एप्रिल मध्ये 73 लाख नोकऱ्या गेल्या आहेत.
असं म्हणत रवीश कुमारने मोदी सरकारवर निशाणा साधला.
https://www.facebook.com/RavishKaPage/posts/312479180243002
रवीश कुमार च्या या पोस्ट नंतर अनेक लोक आता सरकारवर निशाणा साधत असून असंच सुरु राहिलं तर आम्ही कोरोनाने नाही तर उपासमारीने मरु. अशा कमेंट करत आहेत.