'स्कुप' : प्रपोगंडा आणि कथीत गुजराती अस्मितेची भलामण..
आपल्यामध्ये एखाद्याचं महिमामंडन झालं कि लोक त्याच्या मागे धावू लागतात. तो म्हणतोय तेच खरं मानू लागतात. हा नॅरेटीव्ह सेट करण्याचाच एक भाग आहे. काश्मीर फाईल, केरळ स्टोरी आणि आता गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा ’ स्कुप ’ हा प्रोपोगंडा आता Scam-92 चे निर्माते दिग्दर्शक हंसल मेहतांनी 'स्कुप' OTT मधून मांडला आहे. या प्रपोगंड्याचे विस्तृत विश्लेषण केले आहे विजय गायकवाड यांनी...
X
आपल्यामध्ये एखाद्याचं महिमामंडन झालं कि लोक त्याच्या मागे धावू लागतात. तो म्हणतोय तेच खरं मानू लागतात. हा नॅरेटीव्ह सेट करण्याचाच एक भाग आहे. काश्मीर फाईल, केरळ स्टोरी आणि आता गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा ’ स्कुप ’ हा प्रोपोगंडा आता Scam-92 चे निर्माते दिग्दर्शक हंसल मेहतांनी 'स्कुप' OTT मधून मांडला आहे. या प्रपोगंड्याचे विस्तृत विश्लेषण केले आहे विजय गायकवाड यांनी...
अलीकडे काही गोष्टी अगदी पद्धतशीरपणे तुमच्या मेंदूमध्ये पेरण्यात येतात. यालाच प्रपोगंडा म्हटले जाते.
हर्षद मेहता कुठे आदर्श पुतळा होता? जनतेच्या पैशावर डल्ला मारून घोटाळा केल्यामुळे जेलमध्ये गेला होता..
Scam-1992 OTT माध्यमातून आणून गुजराती डायरेक्टर हंसल मेहता या माणसाने हर्षद मेहता देव माणूस असल्याचा प्रपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न केला. SCAM-1992 पाहिला तर स्पष्टपणे लक्षात येते की यामध्ये पदोपदी गुजराती कथीत अस्मितेचे प्रदर्शन केले आहे.
SCOOP ओटीटी मालिका गुन्हे पत्रकार जिग्ना व्होरा हिच्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकावर आधारीत आहे. अर्थात कुठलीही सिरीज निर्मिती हा एक संशोधनाचा भाग असतो. आमचे मित्र वैभव छाया Vaibhav Chhaya याविषयी सविस्तर सांगू शकतील.. पण ग्रामीण भाषेत म्हणायचं अलीकडे 'दगडाला देव करण्याची प्रथा' सर्वत्र सुरू झाली आहे.
Scoop वेब सिरीज मध्ये कन्टेन्टच नसल्यामुळे ती प्रचंड लांबवण्यात आली आहे. तिचा शेवट काहीही संबंध नसताना अगदी गौरी लंकेश आणि शशिकांत वारीसे यांच्यापर्यंत नेऊन ठेवलाय.
सिरीजची नायिका खरंच आदर्श गुन्हेगार पत्रकार असती तर कितीतरी तिच्या एक्सलुव्ह स्टोरी आणि वैयक्तिक आयुष्यातल्या संघर्षावर वेब सिरीज रंगवता आली असती. ज्या पद्धतीने ती फार आयडियल गुन्हे पत्रकार आहे आणि बातम्या मिळवण्यासाठी किती जीवापाड प्रयत्न करते असं जे काही चित्र रंगवण्यात आलंय ते प्रत्येक पत्रकाराच्या कामाचा भाग असतो. या कथेत आदर्श गुन्हे पत्रकारासोबत एका असाइनमेंटच्या निमित्ताने मी आणि ज्ञानेश चव्हाण Dnyanesh Chavan एकत्र असल्याने ही गुन्हे पत्रकारिता किती पाण्यात होती हे मी ठामपणे सांगू शकतो.
जेडे मर्डर खुन खटल्यातून एकटी जिग्ना निर्दोष नाही सुटली तर छोटा राजन गँगचा पॉलसन जोसेफ हा सुद्धा निर्दोष सुटला हे आपण विसरतो आहोत. या प्रकरणात पॉलसनची भूमिका तपासल्यावर ब-याच गोष्टी पुढे येवू शकतील. शेवटी माननीय न्यायालयाने या दोघांना निर्दोषत्व बहाल केल्याने त्याबाबत फार न बोलणे हेच बरं.
असो फार अन्याय झाला पत्रकारितेतून बाहेर पडावं लागलं जेलमध्ये गेली.. पण जेल मधून बाहेर आल्यानंतर काय? रविश कुमार सारखा स्वतंत्र युट्युब चॅनेल किंवा सच्ची पत्रकारिता करणाऱ्या अनेकांना अलीकडे वर्षानुवर्षे जेलमध्ये डांबण्यात आला आहे. सिद्धीक कप्पान, महम्मद जुबेर आणि अशा अनेक पत्रकारांना जेलमध्ये डांबण्यात आलं आहे त्यासाठी एखादी लोक चळवळ उभी केली का?
जेडे मर्डर केस काय होती? हे प्रत्येक क्राईम जर्नालिस्टला चांगलं ठाऊक आहे.. वर्षानुवर्ष चांगली पत्रकारिता करणाऱ्यांना आपल्या सोर्स पासून किती अंतर ठेवावं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आरोग्याच्या कारणास्तव आत्महत्या केलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याची मदत म्हणून पुराव्या अभावी सुटलेली ही एक केस आहे बाकी आदर्श ग्रेट Scoop असं मला तरी काही दिसत नाही.
या पत्रकार मॅडमने सध्या भोंदूगिरीचा व्यवसाय सुरू केला आहे त्याला इंग्लिश मध्ये (she is now a tarot reader and healer who has been healing people and predicting their future through astrology).
सध्या प्रत्येक पत्रकाराने scoop ही वेब सिरीज पहायलाच पाहिजे अशी जाहिरात केली जात आहे.. मी म्हणतो काही पाहण्याची गरज नाही.. परवा एका फार सीनियर निवृत्त सनदी अधिकाऱ्याला भेटलो. निघताना ते म्हणाले, या देशाचा विचार केला तर कोणत्याही राज्याला मिळाला नाही असा फार समृद्ध वारसा महाराष्ट्राला मिळाला आहे. आम्ही तो आमच्या परीने समृद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु आता त्याला उतरती कळा लागली आहे..
ती काही मुद्द्यांवर खटल्यातून मुक्त झाली. तेव्हा कोणी काही बोललं नाही. पुस्तक आलं तेव्हाही काही मोजकेच बोलले. आता सिरीज आली, त्यात तिला या सगळ्या सिस्टीम चा विक्टिम दाखवून दिग्दर्शकाने तिला वॉशिंग पावडर मधून धूवून काढलं की काय असा विचार येतो.
महाराष्ट्र पेटवायला निघालेल्या सरकार पुरस्कृत विचारांची जातकुळी असलेल्या हंसल मेहताला त्याचा 'स्कॅम' आणि 'स्कुप' लखलाभ असो. आयुष्याची होळी करून सर्वसामान्यांचे प्रश्न आणि देश आणि राष्ट्र घडवणारा आमचा महाराष्ट्र आहे. मी प्रत्यक्ष पाहिलेला आणि भेटलेले दिनू रणदिवे असंख्य OTT चे प्रॉडक्ट आहे. माझे पत्रकारितेतील आदर्श ज्ञानेश महाराव Dnyanesh Maharao आणि सनातनी विचारांशी आणि वृत्तीशी कोणत्याही परिणामांची परवा न करता लढत असलेली माझी पत्रकार मैत्रीण अलका धुपकर Alka Dhupkar भविष्यातील OTT चे कंटेंट आहेत..