ओ महात्मा गांधी आता आम्हालाही बंदुका वाटल्या जाणारयेत…
X
नागरिक आपले सक्षम कान आणि डोळे असावेत. पोलीस एव्हढीच अपेक्षा करू शकतात आणि नागरिकांचे हे इंद्रिय मजबूत करण्यासाठी पोलीस फक्त विश्वास देऊ शकतात, बंदुका नाही. आता कोणत्याही बंदुकीच्या गोळीत एवढा दम नाहीय की, ती गोळी व्हाईट कॉलर गुन्हेगारी संपवू शकेल.
सामान्य नागरिकांना बंदुकी देण्याचं समर्थन करताना commissioner of police कृष्ण प्रकाश यांनी अमेरिकेत खुलेआम विकल्या जाणाऱ्या बंदुकाचं उदाहरण दिलं तेव्हा मला लहानपणी साधा हवालदार जरी दिसला तरी सगळे चिडीचूप व्हायचे तो प्रसंग आठवला, तो हवालदार तर फक्त काठी घेऊन फिरायचा, त्याचं काळात वरिष्ठांचा फोन जरी आला. तर खुर्चीत बसलेला पोलीस अधिकारी- कर्मचारी उठून उभा राहून बोलायचा तो शिस्तीचा प्रकार होता.
प्रश्न दरा-याचा आहे, धाकाचा आहे. जो फक्त खाकी वर्दीत होता. नागरिक महिलांची सुरक्षा बंदुकीच करणार असतील तर आम्ही मिश्यावर ताव कशासाठी मारायचा? असो..... यंत्रणांनी गुडघे टेकले की, सामान्यांचे हात उठणारच... रामराज्य, अहिंसा वैगरे पुस्तकी भ्रामक कल्पना ठरतायत. ठरतील ठरविल्या जाऊ लागल्यायत हे अधिक खेदाचं... लवकरच बंदूक परवान्यासाठी अर्ज करणार आहे. आधुनिक समाजात जगण्यासाठी गरजेचं आहे म्हणे... भेटलीच बंदूक तर तुमच्या फोटो सोबत सेल्फी घेईल.
ओ महात्मा बापू तुम्हाला सांगतोय हो... आम्हालाही बंदुका वाटल्या जाणारयेत बंदुका...!!!
(गोविंद अ.वाकडे यांच्या फेसबुक भिंतीवरून)