Home > मॅक्स ब्लॉग्ज > Reserve bank of India: डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कोण धुळीस मिळवतंय?

Reserve bank of India: डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कोण धुळीस मिळवतंय?

Reserve bank of India: डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कोण धुळीस मिळवतंय?
X

बँकांची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया... रिझर्व्ह बँक ही एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे. जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्त्वाचे निर्णय घेते. रिझर्व्ह बँकेची स्थापना १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'The Problem of Rupees' या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे .

आज आरबीआयचा वर्धापन दिन... त्यानिमित्ताने ब्रिटिशांच्या काळात सुरु झालेल्या आरबीआईचा इतिहास काय आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मांडलेल्या संकल्पना कोणत्या? 'द प्रोब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळाली?

अनेक देशांची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या बँकेची सद्यस्थिती काय आहे? स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात आरबीआयची धोरणं उद्दिष्ट्ये कशी आणि काय होती? गेल्या काही वर्षांपासून आरबीआय ही स्वायत्त संस्था असून तिची स्वाय्यत्त धोक्यात आली आहे असं वारंवार बोललं जातंय? त्याची सत्यता काय? भारतीय रिझर्व्ह बँकेचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला जातोय का? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं संकल्पना असलेल्या या रिझर्व्ह बॅंकेला कोण धुळीस मिळवतंय? येणाऱ्या काळात आरबीआय समोरील आव्हानं नेमकी काय असतील? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांच्याशी बातचीत केली.

विश्वास उटगी सांगतात की...

भारतीय अर्थव्यवस्थेच्या उभारणीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची महत्त्वाची कामगिरी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण जरी सरकारचं असलं तरी करंसी सप्लाय, करंसी व्यवस्थापन, एक्सपोर्ट-इम्पोर्ट हाताळणे, फॉरेन एक्सचेंज आणि करंसी व्यवस्थापनाकडे आरबीआय सातत्याने नजर ठेऊन असते.

त्यामुळे महागाई आणि चलन वाढ यावर नियंत्रण ठेवत असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मोठी संकंट कधी आली नाहीत. युद्धकाळातही आरबीआयचे काम उत्कृष्ठ दर्जाचं राहिलेलं आहे. डॉ. रघुराम राजन यांच्या बाहेर पडण्यापर्यंत आरबीआयने खूप यश मिळवलं आहे.

मात्र, गेल्या 5 वर्षात आरबीआयचे निर्णय आणि येणाऱ्या काळातील आरबीआय समोरील आव्हानं याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत विश्वास उटगी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Updated : 1 April 2021 5:38 PM IST
Next Story
Share it
Top