झूठ अंदर लो, झूठ बाहर छोडो, रवीश कुमारचा रामदेव बाबांवर निशाणा...
X
सध्या योगगुरू रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आहेत. तसं तर बाबा रामदेव हे कोरोनाच्या काळातला नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. कधी पंतजलीचं कोरोनावरील कथित औषधं "कोरोनील" बाबत केलेल्या वक्तव्यामुळं तर कधी नाकाला दोन ऑक्सीजन सिलेंडर असतात हे सांगितल्यामुळे. ऍलोपॅथी औषधांवर केलेली टीका सुद्धा त्यांना चांगलीच महागात पडताना दिसत आहे. या दरम्यान NDTV चे कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी रामदेव बाबांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
त्यांचं एक जूनं ट्विट त्यांनी शेअर केलं आहे, ज्यात त्यांनी रामदेव बाबांना 'डिअर रामदेव दी बिलेनीयर' असं संबोधलं आहे. त्यांची ही पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली असून पोस्ट मध्ये रामदेव बाबांचं एका जून्या ट्विटचा फोटो जोडला आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय की
"काळा पैसा मिळाला तर पेट्रोल ३० रुपये लिटर मिळेल." पुढे फेसबुक पोस्टमध्ये ते लिहितात
तुम्ही स्वतःला आणि संपूर्ण जगाला हे सांगू शकता का ? की पूर्णपणे बोगस आणि खोटे वक्तव्य करूनही पश्चाताप न येण्यासाठी कोणता योगा करावा. काय तुम्ही मोदींना टॅग करत हे ट्विट करू शकता? दरम्यान आम्ही नुकतेच विकासासाठी ९५ रु रुपये दिले आहेत. जोगी, हम तो लुट गए तेरे प्यार में जाने तुझको, जाने तुझको ख़बर कब होगी. तुम्ही हे गाणं ऐकू शकता, चला चला कपोल गपोल करूयात, खोटं आत घ्या, खोटं सोडून द्या.
काळा पैसा कुठे आहे? कुठे?
असं म्हणत रवीश कुमार यांनी बाबा रामदेव यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबा रामदेव यांच्यावर केलेल्या या पोस्टनंतर अनेक नेटिझन्सनी बाबारामदेव यांच्यावर टीका केली आहे.