Home > मॅक्स ब्लॉग्ज > राज ठाकरे यांच भाषण म्हणजे ईडीची स्क्रिप्ट...

राज ठाकरे यांच भाषण म्हणजे ईडीची स्क्रिप्ट...

राज साहेब ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे काल जाहीर सभा झाली.ते सुमारे एक तास बोलले.सभेला लोक स्कूल बस मधून येत होते. प्रत्येक नेत्याला बस आणि त्या बस मधून उतरणाऱ्या लोकांची संख्या पाहिली की प्रत्येकाला टार्गेट दिल्याचं दिसून येत होतं.हजारो बस येत होत्या. मात्र ,त्या बस मधल्या लोकांत तेव्हढा जोश दिसंत नव्हता. एखादं दुसऱ्या बस मधील लोक घोषणा देत होते.सभेच नियोजन पाहता ही सभा इव्हेंट मॅनेजमेंटच्या जोरावर आयोजित केल्याचं दिसून येत होतं वरीष्ठ पत्रकार सुधाकर काश्यप यांनी केलेलं विश्लेषन...

राज ठाकरे यांच भाषण म्हणजे ईडीची स्क्रिप्ट...
X

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांना हात घातला.शिवसेना-भाजप युती,उद्धव ठाकरे यांच राजकारण, राज्यातील सध्याच्या सरकारच राजकारण ,मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार ,नवाब मलिक , हिंदू मुस्लिम संघर्ष कसा होईल ,कधी नव्हे ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर बोलले.

मराठीचा मुद्दा आता हद्दपार झाला आहे ,आता हिंदूंचा मुद्दा पुढे आला आहे.यांच्याकडे एक आमदार आणि मुंबईत एक नगरसेवक आहे.त्या आमदाराला चाळीस हजार तर त्या नगर सेवकाला जमतेम सात हजार मत मिळाली असतील.एवढ्या मताच्या जोरावर ते राजकारण्यांना धडा कसा शिकवणार.

प्रत्येक पक्षाची उत्तोतर प्रगती झाली आहे. यांच्या पक्षाचे सुरुवातीला 12 आमदार निवडून आलेत.आता एकच आमदार आहे. तो ही स्वतःच्या जोरावर निवडून येतो. यांची नाशिक महानगरपालिकेत सत्ता होती.ती गेली. मुंबईत एकेकाळी 23 नगरसेवक निवडून आले होते.मागच्या 2017च्या निवडणुकीत 7 नगरसेवक निवडून आलेत. राजाला साथ द्या अस भावनिक आवाहन त्यांच्या घाऱ्या डोळ्याच्या चाण्यक्य यांनी केलं होतं. मुंबईकर जनता शहाणी आहे. मतदारानी चाण्यक मंडळीच ऐकलं आणि मनसेचे सात नगरसेवक निवडून दिलेत.मात्र, पुढच्या काही काळातच त्यातले सहा नगरसेवक शिवसेनेत गेलेत.राजाकडे आता औषधा पुरता एक नगरसेवक आहे.याचा अर्थ स्पष्ट आहे. लोक राज ठाकरे यांना सिरीयसली घेत नाही.

राज ठाकरे एकदा भाषणात म्हणतात up त भाजपचं सरकार आलं मला खूप बरं वाटतं.थोड्या वेळाने म्हणतात हे शिदोरे up त गेले होते.तिथे ते एका ढाब्यावर चहासाठी बसले होते.तेव्हा काउंटरवरचा व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्याने यांना जात विचारली.यांनी आपली जात सांगितल्यावर त्याने चहा द्यायला सांगितलं.अशी परिस्थिती तुम्हाला महाराष्ट्र हवी आहे का,अस हे म्हणतात .किती हा विसंगत पणा आहे.

आपल्या भाषणात त्यांनी आंबेडकर चळवळीचा विचार या महाराष्ट्रातून देशभर गेला आहे,अस सांगितलं. चैत्यभूमी राज ठाकरे यांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर आहे. राज यांनी चैत्यभूमीच कधी दर्शन घेतलं आहे का हे त्यांनी आधी जाहीर करावं .

राज ठाकरे यांनी मशिदी बाबत फुत्कार काढला. पण हा मुद्दा जुनाच आहे. त्यांचे काका आणि राजकीस गुरू बाळासाहेब ठाकरे हे देखल हाच मुद्दा त्यांच्या हयातीत बोलत होते.त्यांच्या पासून सुरू झालेल्या या मुद्याचा कार्यकाळ पाहिला तर गेल्या 30 वर्षा पासून या मुद्यांवर बोललं जातं आहे.पण सत्ता मिळवणाऱ्या बाळ ठाकरे यांना ही मशिदीवरील भोंगे उतरवता आले नाहित. तर मग केवळ एक आमदार आणि एक नगरसेवक असलेल्या राज ठाकरे यांना या मुद्यावर किती यश मिळेल यात शंका आहे.

नवाब मलिक यांच्यावर टीका केली. त्यांचा संबंध दाऊद गँगशी असल्याचं ते बोलले. याच नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने 2014 सालात कालिना विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती.तेव्हा राज ठाकरे यांना या गोष्टी आठवल्या नाहीत.त्या काळात राज ठाकरे मराठीचा आणि काही प्रमाणात हिंदूंचा मुद्दा रेटत होते. कप्तान मलिक हे मूळचे up चे आहेत आणि धर्माने मुस्लिम आहेत. यामुळे त्यांना तिकीट देताना राज ठाकरे यांनी आपल्या दोन्ही मुद्याना स्वतःच हरताळ फासल्याच दिसून येतंय.

आता ईडी बाबत

काही वर्षा पूर्वी कोहिनूर मिलच्या विक्रीचा मुद्दा गाजला होता. ही मिल राज ठाकरे , उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली होती. त्या काळात IL & FS ही फायनान्स कम्पनी सुमारे दोन लाख कोटी रुपयांना बुडाली होती.या घोटाळ्याचा तपास नंतर ईडीने सुरू केला होता.ईडीच्या चौकशीत IL & FS या फायनान्स कंपनीने उन्मेष जोशी यांच्या कंपनीला 100 कोटी रुपयांच कर्ज दिल होत,हे उघडकीस आलं.यामुळे मग त्यांची ही चौकशी झाली.चौकशीत राज ठाकरे यांनी कोहिनूर मिल विकत घेण्यासाठी एक रुपया ही न गुंतवता 75 कोटी रुपयांचा फायदा घेऊन ते कंपनीतून बाहेर पडले होते, हे उघडकीस आलं होतं.याच व्यवहारा बाबत ईडीने त्यांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलावलं होतं.राज ठाकरे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे सात तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आल. तेव्हा पासून राज ठाकरे गप्प होते.कुठे काही बोलत नव्हते.

BJP कडे अनेक टीम आहेत,त्या टीम मध्ये अनेक खेळाडू आहेत, अस म्हटलं जातं.कालच्या राज ठाकरे यांच्या भाषणा नंतर ते सी टीम मध्ये असल्याचं स्पष्ट झालंय.त्यांच्या भाषणातील मुद्दे पाहिले की जे मुद्दे bjp नेत्यांनी बोलायला पाहिजे होते ते मुद्दे ते बोलत होते. कदाचित ईडीने ही स्क्रिप्ट लिहली असावी, असं वाटत होतं.

सुधाकर काश्यप .

Updated : 3 April 2022 2:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top