#Ukrain_Russia जनतेचे सशस्त्रीकरण
राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर जगभर नागरिकांच्या हाती शस्त्र देऊन युद्ध करण्याचे प्रकार रशिया युक्रेन युद्धामध्ये दिसून आले आहेत. युद्ध सैनिकांनीच लढावे असे विश्लेषण केले आहे सुनील गजाकोश यांनी...
X
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून तेथील जनता हातात शस्त्रे घेत आहेत, त्याला सरकारतर्फे उत्तेजन दिले जात आहे, म्हणजे लोक घराघरात बाँब बनवत आहेत, ते कसे बनवायचे त्याची माहीती व प्रशिक्षण त्यांच्या टिव्हीवर दिले जात आहे.
अनेकांना स्वयंचलित बंदुका दिल्या जात आहेत. पूर्ण देशाला युद्धासाठी तयार करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. या सगळ्याला युद्धाच्या परिस्थीतीमुळे या कृतीचे समर्थन (justify) केले जात आहे.
हे सगळं पश्चिमी माध्यामत उत्साहाने दाखविले जात आहे, वरून गोऱ्या चमडीच्या व निळ्या डोळ्यांच्या लोकांवर पुतिन असं कसे युद्ध लादतो आहे हे युरोप आहे, आफ्रिका किंवा मध्यपूर्व नाही अशा प्रकारचे छाती बडविणे पण चालू आहे.
मी हे सगळं बघत असतांना इतिहासात डोकावत आहे, युरोपला अनेक वर्षे युद्धाची परंपरा आहे, जगाती दोन्ही महायुद्धे युरोपात झाली आहेत, ८०-९०च्या दशकात युगोस्वाविकीयाचे गृहयुद्धतर ताजेच आहे तरी श्रेष्ठत्वातेच आख्यान (narratives) हे लोक सांगत आहेत.
परत.. पहिल्या मुद्याकडे येवू १९८०च्या दशकात रशिया अफगाणिस्थानत घुसला आणि त्यांना प्रतिकार करण्यासाठी अमेरीकेने नेमकं हेच केलं तेथील कबिल्यांना शस्त्रात्रे पुरवली त्यांना CIA तर्फे युद्धाचे व गनिमीकाव्याचे प्रशिक्षण देणात आले, आणि त्यावर आयतीच इस्लामच्या जिहादची संकल्पना चढवली आणि हे धर्मयुद्ध आहे आणि त्याला लढलेच पाहीजे अशा प्रकारे ते युद्ध लढले गेले, त्यात पाकीस्तानच्या हुकुमशाह आणि सैनिकी सुविधा वापरून रशिया विरूध्द कडवे युद्ध लढण्यात आले. त्याचा परिणाम रशियाचे तुकडे आणि कम्युनिझमचा ऱ्हास होण्यापर्यंत झाला.
आज हिच गोष्ट युक्रेन मधे होत आहे, हि शस्त्रसज्ज झालेली जनता युद्ध संपल्यानंतर नेमकी कशी वागेल, यात की स्थानिक बाहुबली तयार होतील, आधीच युक्रेन मधे नव-नाझीवादाचे उगम होत आहे. त्यांच्या हातात शस्त्रात्रे देवून युरोप परत वंश श्रेष्ठत्वाच्या राजकाराणात अडकेल याची खात्री नाही. यापरिणाम युरोप वांशिक हिंसा वाढण्यात होऊ शकते.
युद्ध नेहमी सैनिकांनीच लढावे आणि नागरिकी त्यांना मदत करावी हे तत्व संपत चालेले आहे, आज जगात ज्या प्रकारे सैनिकांचे उदात्तीकरण आणि नागरिकांच्या काही हिंसक गटाचे सशस्त्रीकरण होत आहे हे पाहीलं तर जगातील अनेक ठिकाणी यादवींची सुरवात होण्याची चिन्हे आहे.
युद्ध रशियाने लादले आणि युक्रेनला आपली रक्षा करण्याचे अधिकर आहेच, पण हे युद्ध संपल्यानंतर युक्रेन मधे तयार झालेले अनेक हिंसक गट तेथील सरकार कसे आवरतो हे पहावे लागेल. जनतेचे निःशस्त्रीकरण हे एक मोठे आव्हान असेल, अफगाणीस्थानापासून शिकावे, त्यांच्या समोर अमेरिकाही टिकली नाही.
१९९२-९३ च्या दंग्यात आमच्या धारावीच्या गल्लीतही सगळ्यांनी सुरक्षा म्हणून मिळेल ते शस्त्र घरात बाळगली आणि दिवसरात्र घरासमोर पहारा देत बसले, पण दंग संपल्यानंतर लोक आपले आयुष्य उभारणी आणि ज्यांना नुकसान झाले आहे त्यांना मदत करण्याच्या कामात स्वतालो झोकले, अनेकांना आपण अफवांना बळी पडलो याचा पश्चाताप होता, त्या जमा केलेल्या शस्त्रांना (यात बंदुका नव्हत्या) लोक विसरून गेली.
कारण ही स्वसंरक्षाणाची कृती होती, युद्धाच्या कृतीबरोबर याची तुलना होऊ शकत नाही. पण यात वैयक्तीक रित्या मला खुप शिकायला मिळाले कोणत्याही अफवेवर यापुढे मी विश्वास ठेवण्याचे सोडून दिले.
युक्रेन- रशिया- नेटो-अमेरिका आणि नविन जागाची रचना या सगळ्यावरून एक दिसतय की गेली अनेक दशके तेलाच्या साठ्यांवर ताबा मिळविण्याच्या युद्धनितीला आता तिलांजली दिली गेली आहे... आता यद्धाचे हे लोण कोणत्याही कारणांनी आपल्या दारापर्यंत येवू शकते.
मी युद्ध फक्त सैनिकांनीच लढावे या मताच आहे.