Home > मॅक्स ब्लॉग्ज > कतार समोर मोदी सरकारने गुडघे का टेकले?

कतार समोर मोदी सरकारने गुडघे का टेकले?

जो देश मिलिटरी सुपरपॉवर नाही, आर्थिक बाबतीत आपल्या तुलनेत फारच किरकोळ आहे, भूराजकीय स्तरावरही काही आपल्याला डोळे दाखवेल अशा स्थितीत नाही; अशा देशासमोर आपल्या छप्पन्न इंची सरकारने गुडघे का टेकले? वाचा मकरंद देसाई यांचे सडेतोड विश्लेषण

कतार समोर मोदी सरकारने गुडघे का टेकले?
X

आता या नुपूर शर्मा प्रकरणाकडे थोडं गांभीर्याने बघू!

सर्वात आधी कतारबद्दल... तुम्हाला एम.एफ. हुसेन नांवाचा चित्रकार आठवतो का? त्या एम.एफ. हुसेनवर भारतात ईशनिंदा, धर्माचा अपमान, देवांचा अपमान वगैरेसाठी भरपूर कायदेशीर खटले दाखल झाले. त्याच्याविरोधात आंदोलने झाली, हिंसक राडेही झाले. तर हा हुसेन आपल्या देशातून पळाला तो गेला कतारमध्ये... त्याला कतारने आश्रयच दिला नाही तर आपलं बहुमूल्य नागरिकत्वदेखील बहाल करून टाकलं! याचा अर्थ कतारमधले अरब काही ईशनिंदेच्या विरोधात वगैरे नसून, ते फक्त त्यांच्या स्वतःच्या धार्मिक भावना दुखावण्याचा विरोधात आहेत!!

आता या अशा कतारसमोर, जो देश काही मिलिटरी सुपरपॉवर नाही, आर्थिक बाबतीत आपल्या तुलनेत फारच किरकोळ आहे, भूराजकीय स्तरावरही काही आपल्याला डोळे दाखवेल अशा स्थितीत नाही; अशा देशासमोर आपल्या छप्पन्न इंची सरकारने गुडघे टेकलेत! तेही अत्यंत हास्यास्पद प्रकारे आपल्याच प्रवक्त्याची जबाबदारी झटकून...

याने नुसत्या भाजपची अब्रू जात असती तर आपल्याला काही चिंतेचं कारण नव्हतं! पण शेठच्या चेल्यांनी हा जो काही भेकडपणा केला त्याने देशाच्या इभ्रतीला डाग लागला. हे नागरिक म्हणून आपल्यासाठी चिंताजनक आहे. काल सौदी, कतार, इराण अशा सगळ्यांनी भाजपच्या कचखाऊपणाचा फायदा घेत भारताला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. माफी मागा म्हणून आपल्या राजदूतांना धाक दाखवला...

ज्या देशाने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानचा तुकडा पाडला. जो देश परकीय धमक्या, आर्थिक निर्बंध न जुमानता अण्वस्त्रसज्ज झाला. तो देश आज या उपटसुंभ, सुमार अकलेच्या आणि स्वतःच्या इमेजसाठी वाट्टेल तशी कच खाणाऱ्या नेत्यामुळे कतारसारख्या देशांसमोर गुडघे टेकतो ही अत्यंत लांच्छनास्पद बाब आहे...

आता राहिला विषय भारतीय मुस्लिमांचा... भारतीय मुस्लिमांना संविधानाने दिलेले हक्क टिकून राहावेत म्हणून द्यायचा लढा हा अरबस्तानातल्या धर्मसत्तांकडून लढला जात नसतो! डॉ. काफील खान यांना खोट्या केस टाकून तुरुंगात सडवलं, तेव्हा अरबस्तानी शेख त्यांच्या उंटाचे मुके घेत तेलाचे पैसे मोजत गप्प होते... त्यामुळे आपल्यासाठी ईशनिंदेमुळे चिडणारे अरब नव्हे तर देशाच्या संविधानाच्या बळावर अन्यायाशी झगडणारे, तुरुंगात जाणारे, कोर्टात लढा देणारे डॉ. काफील खान महत्त्वाचे आहेत...

या अरबस्तानी उंटांना सामान्य भारतीय मुस्लिमाच्या रोजीरोटीशी देणंघेणं नाही, त्यांना खोट्या केसेस भरून तुरुंगात सडवले जाणारे मुस्लिम तरुण दिसत नाहीत. त्यांना बुल्लीबाईसारख्या ऍपद्वारे छळ केल्या जाणाऱ्या मुस्लिम स्त्रियांचं दुःख दिसत नाही. त्यांना दिसतो तो फक्त धर्माचा अपमान! त्यामुळे अरबांनी कचखाऊ, बढाईखोर आणि भेकडांनी भरलेल्या रंगाबिल्लाच्या टोळीचे नाक कापले हे चांगलेच आहे. किमान यावरून तरी यांची आपणच हिंदूंचे मसीहा असल्याची बतावणी किती खोटी आहे हे हिंदूंना नीट समजेल अशी अपेक्षा आहे... पण आपल्या देशाच्या प्रश्नांसाठी, इथल्या मुस्लिमांच्या संविधानिक हक्कांसाठीची लढाई ही आपल्यालाच सुरू ठेवायची आहे; त्याबाबतीत अरब उंटांच्या पाठी आपली मेंढी हुरळू देणे आपल्याला परवडणारे नाही!!

Updated : 7 Jun 2022 7:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top