Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोनाने आज नि:शब्द आणि निरुत्तर केलं : पोलीसातल्या एका जिवंत माणसाच्या मन हेलावणा-या भावना

कोरोनाने आज नि:शब्द आणि निरुत्तर केलं : पोलीसातल्या एका जिवंत माणसाच्या मन हेलावणा-या भावना

व्हीआयपी अंत्यविधी निमित्ताने बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी गर्दी हटवण्याचे काम करत असतो. एका कोपऱ्यात बसलेला वीस वर्षाचा तरुण निशब्द असतो. तिथून जायला सांगितल्यानंतर तो तरुण पोलिस अधिकाऱ्याला जे उत्तर देतो ते हादरून टाकणारे असतं. कोरोनाने आज नि:शब्द आणि निरुत्तर केलं,सांगताहेत पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांच्या शब्दात....

कोरोनाने आज नि:शब्द आणि निरुत्तर केलं : पोलीसातल्या एका जिवंत माणसाच्या मन हेलावणा-या भावना
X

कोरोना सुरु होवून एक वर्ष होवून गेले आहे.मागील एक वर्षापासून करोनाशी आपण सर्वजन लढतचं आहोत.काही जण कोरोनाशी लढून जिंकुन परत आले काही जण दुर्दैवाने आपल्यातून गेले.प्रशासनाचा एक भाग म्हणून फ्रंटलाईन वर्कर म्हणून सातत्याने काम करतोय.मागील वर्षी कोरोना काळात केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा होतोय परंतू यावेळी दाहकता खुपच वेगळी आहे.सध्या मुंबई शहरामध्ये दादर मधील शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे काम करत आहे.आज माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन झाले.गायकवाड साहेब माजी खासदार तसेच त्यांची कन्या वर्षाताई गायकवाड विद्यमान शिक्षणमंत्री म्हटल्यानंतर जनसंपर्क मोठाच असणार व कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होवू नये म्हणून सहाजीकच आमच्यावर जबाबदारी.आणखी आज मी डे पीआय म्हणून कर्तव्यावर त्यामुळे माझ्यावर विशेष जबाबदारी. माझ्या पोलीस ठाणे हद्दीत चैत्यभूमी जवळ स्मशानभूमी आहे तेथे गायकवाड साहेबांवर अंत्यसंस्कार होनार म्हटल्यानंतर स्मशानभूमीजवळ गर्दी होवू नये म्हणून आम्ही त्या परिसरातील लोकांकडे चौकशी करुन लोकांना बाहेर काढून परीसर खाली करत होतो.

स्मशानभूमीच्या बाहेर एक 20 वर्षांचा मुलगा एका कोपर्‍यात बर्‍याच वेळापासून बसला असल्याचे माझ्या लक्षात आले.इतरांना सांगितल्यानंतर लोक बाहेर जात आहेत पण हा काही जागेवरुन हलायलाच तयार नाही म्हणून मी त्याच्या जवळ गेलो व तु बाहेर का जात नाहीस?,तुला मराठीत सांगितलेले समजत नाही का?असे विचारले त्यावर तो हिंदीमध्ये म्हणाला नही साहब मराठी तो नही आती लेकीन माँ का देहांत हुआ है एम्ब्युलन्स आ रही है माँ का शव लेके ईसलिए बैठा हूं।त्यावर मला खुप वाईट वाटले त्यामुळे मी त्याला धीर देत आणखी विचारपूस करु लागलो त्यावेळी समजलेली महिती एकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणीच आले.त्याने सांगितले सर माँ सिर्फ 44 साल की थी! हम लोग बेसिकली उडीसा से है,पिताजी बीपीसीएल(भारत पेट्रोलियम) में काम करते है इस कारण हम लोग न्यु पनवेल में रहते है। माँ कोरोना के वजह से चली गई।कुछ नही साहब दो दिन बुखार था तो पहले टेस्ट किया रिपोर्ट नॉर्मल आया था बुखार दो दिन मे चला गया हमे लगा कुछ नही है,लेकीन दो दिन बाद माँ को सांस लेने मे तकलीफ हुई तो रहेजा हस्पताल लाए।ऑक्सीजन लेवल 72 आया तो उपचार चालू किए लेकीन लेट हुआ साहब माँ मुझे छोडके चली गई।असे बोलून तो हुंदके देत रडू लागला मी त्याला धीर देत आणखी विचारले पिताजी एम्ब्युलन्स से लेके आ रहे है क्या माँ को समशान घाट त्यावर तो बोलला नही साहब पिताजीभी वाशी में एडमिट है उनकी भी कोरोना की ट्रीटमेंट चल रही है उनको ऑक्सीजन लगवाया है।मेरी बहन आई है घर पर डिलीव्हरी के लिए उसको पनवेल में घर पर एक रुम मे रखा है।एक छोटा भाई है उसको बहन के पास रखा हूं। मै अकेला हूं सर मुंबई मे पहचान का कोई नही है मेरे और पनवेल में जो पहचानवालें है वो डर की वजह से नही आ रहे और मैं भी उनको खत्रे में नही डालना चाहता।त्यावर मी त्याला विचारले की तेरी तो की है की नही टेस्ट त्यावर तो बोलला सर मैं भी कोरोना पॉझीटिव्ह हूं पर मुझे माइल्ड कोरोना है।

परिस्थिती ऐकुन माझं डोकं बधीर झाल्यासारखे झाले.एक पती आपल्या पत्नीच्या अंतिम संस्कारासाठी हजर नाही,एक मुलगा व एक मुलगी येवू शकत नाही.नातेवाईक ओडीसात.अंत्यसंस्कार करणारा मुलगा 20 वर्षांचा काय परिस्थिती असेल.बिचार्‍याच्या मनाची काय अवस्था असेल? आई गेली म्हणून त्याला रडू येत नसेल का?त्याला हमसुन हमसुन वडीलांच्या,भावंडांच्या नातेवाईकांच्या कुशीत जावून रडून रडून आपलं दुःख सांगावसं वाटत नसेल का? शेवटी त्याची ती आई होती आणि तिचं जाण्याचं वय नव्हतं.एकटाच बसलेला हताशपणे त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी.एकट्याला धीर होईल का आईला अग्नी देण्याचा? त्याचं सांत्वन कोण करेल?वडीलांची,भ‍ावंडांची आठवण होत नसेल काय?

मी धीर देण्याचा प्रयत्न केला पण तो पण खुप तोकडाचं.खुप वाटत होतं की त्याच्या खांद्यावर पाठीवर हात ठेवून त्याची समजूत काढावी पण तोही पॉझीटीव्ह त्यामुळे तेही शक्य नव्हते कारण स्वत:ची काळजी पण महत्वाची कारण मी पण कुणाचा मुलगा ,पती,भाऊ,वडिल,मित्र आहे.माफ कर मित्रा. माणूस म्हणून मला माझीच लाज वाटली की काहीच मदत करु शकलो नाही.

शेवटी एवढेच की "कोरोनाने नि:शब्द व निरुत्तर केले".

काळजी घ्या मित्रांनो.

Updated : 29 April 2021 8:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top