मिल्खासिंग यांच्यावरील विनोदांमागची मानसिकता
'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेल्या मिल्का सिंग यांच्या इंग्रजी भाषेवर होणाऱ्या विनोदांमागच्या मानसिकतेवर प्रा. हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेला समाचार... नक्की वाचा
Xफोटो सौजन्य -चार्वाक प्रतिमा हेरंब
लहानपणापासून मिल्खासिंग यांच्यावर दोन विनोद ऐकत आहे. मिल्खासिंग यांना 'फ्लाईंग सिख' म्हटले जायचे. एक व्यक्ती त्यांना म्हणते you are a flying sikh त्यावर इंग्रजी न समजल्याने ते म्हणतात no no I am Milkha singh व दुसरा विनोद असा की एकदा मिल्खासिंग विश्रांती घेत असतात समोरून येणारा परदेशातील माणूस विचारतो" Are you relaxing? पण ते इंग्रजी समजले नाही म्हणून ते उत्तर देतात no no I am not resting, I am Milkha singh
हे दोन्ही विनोद अनेकदा अनेक ठिकाणी सांगितले गेले आहेत त्याचा एक हेतू सरदारजी हे निर्बुद्ध असतात(जरी एका सरदारजी ने १० वर्षे देशाचे नेतृत्व केले तरी....!!!) या थीम खाली मिल्खासिंग यांचे विनोद सांगितले गेले.
पण दुसरा भाग जास्त गंभीर आहे इंग्रजी ही भाषा अभिजनांची भाषा आहे व ती भाषा येणाऱ्या व्यक्तीलाच आम्ही मान्यता देतो मिल्खासिंग यांनी जरी कितीही पराक्रम केले असते तरी त्यांना इंग्रजी येत नव्हते आणि इंग्रजी येत नसेल तर त्यांच्या त्या पराक्रमांना अभिजन वर्तुळात फारसा अर्थ नाही. अशा प्रकारची उच्चभ्रू मानसिकता या अशा प्रकारच्या विनोदातून डोकावते. तुम्ही कितीही उंच उडी मारली तरी आमच्या निकषावरच ती आम्ही मोजणार ही अहंगंडाची मानसिकता जास्त आक्षेपार्ह आहे.
अनेकांना असे वाटेल की विनोद हे गंमत म्हणून सोडून द्यायचे असतात परंतु असे विनोद का करावेसे वाटतात वर्षानुवर्ष ते का सांगितले जातात याच्या खोलात जाऊन ही मानसिकताही बघायला हवी
फक्त इंग्रजी येणे हेच बुद्धिमत्तेचे लक्षण असते का ? असाही प्रश्न विचारायला हवा. एकेकाळी असा निष्कर्ष होताच पण हावर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्ता ही एक प्रकारची नसून त्या आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात व त्यामध्ये खेळ, अंदाज बांधणे कविता करणे उत्तम संभाषण करता येणे अशा अनेक गोष्टींना बुद्धिमत्ता म्हटली गेले गार्डनच्या या सिद्धांताने मिल्खासिंग हे अत्यंत बुद्धिमान होते. जरी इंग्रजीवर विनोद झाले तरी...
प्रा. हेरंब कुलकर्णी