Home > मॅक्स ब्लॉग्ज > गोंड आदिवासींची विवाहपद्धती

गोंड आदिवासींची विवाहपद्धती

गोंड आदिवासींची विवाहपद्धती
X

लग्न ही सर्वच जाती धर्माच्या समुदायातील समान गोष्ट आहे. या व्हीडीओच्या माध्यमातून आज आपण गोंड या आदिवासी जमातीतील विवाह पद्धती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आदिवासी गोंड समाज हा वेगवेगळ्या देवांमध्ये विभागला आहे. लग्नाची सोयरीक या देवांनुसार ठरते. चार देव, पाच देव ,सहा देव ,सात देव आणि बारा देव. या एका देवामध्ये ठराविक आडनावाच्या लोकांचा समावेश केलेला असतो. या प्रत्येक देवाचा एक प्राणी हा देव असतो. तो ठरलेला प्राणी त्या देवाला मानणारे लोकं खात नाहीत. मात्र दुसऱ्या देवाला मानणारे त्या प्राण्याला खाऊ शकतात, अशी प्रथा या आदिवासींमध्ये आहे.




प्रत्येक देवानुसार काही मोजकी आडनावे पाहुयात. चार देव: तलांडे , सिडाम , तडमे, परचाके

पाच देव: आलाम, कुमरे ,मडकामी, गावडे , सोयाम , टेकाम, महाका

सहा देव : वेलादी, आतराम, कुळमेथे, पुंगाटी, तोरे पेंदाम , ताडाम, सलामे मरस्कोल्हे, हलबा सात देव : हलामी , तेलामी , गोटा , परसे , पदा.

बारा देव : तोरे

वरील देवांमध्ये सम संख्येमध्ये विवाह होत नाहीत. उदा. चार देव आणि सहा देव यामध्ये लग्न होत नाही. सहा आणि पाच , चार आणि सात चार आणि पाच सहा आणि सात यामध्ये होते.

सध्याच्या झपाट्यानं बदलणाऱ्या काळातही या समुदायाने सामुदायिकता आजही जपुन ठेवली आहे. प्रतिकूल परिस्थितीत मनुष्याला एकटे जगण्यापेक्षा समुदायाने जगने अधिक सुलभ असते. यातल्या अनेक गरजा समाजाकडुन पुर्ण करता येतात. त्या बदल्यात आपणही समाजाला मदत करणे ही बांधिलकी असते. त्यातुनच समुहात एकीची आपुलकीची भावणा निर्माण होते. समाजात येणाऱ्या अर्थिक प्रश्नांवरही या लग्नपरंपरेत उपाय शोधल्याचे दिसुन येते. या आदिवासी जमातीतील लग्न हा आठवडाभर चालणारा सोहळा असतो. सुरूवातीला एकमेकांच्या पसंतीनुसार लग्न ठरवले जाते. यातही एक परंपरा दिसुन येते ती म्हणजे घर घुसणे, घर दसाला जाणे.

घर घुसणे/घर दसाला जाणे : या पध्दतीमध्ये मुलगी आपल्या आवडीचा मुलगा पसंद करते. यानंतर एक दिवस ती त्या मुलाच्या घरी राहायला जाते. पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी पंच बसतात. तिला विचारलं जात ती का आली आहे. ती सांगते मी हे घर माझं समजुन आली आहे. या घरातल्या लोकांना माझे समजुन आली आहे. मग पंच घर मालकाला विचारतात लग्न कधी लावणार ? मग ते तात्काळ तयार होतील अथवा एक वर्ष सहा महिन्याने, तेवढे दिवस ती तेथे राहते. घरच्यांना समजुन घेते. काही काळानंतर त्या मुलासोबत लग्न लावून दिले जाते. असं लागतं लग्न लग्न ठरवतांना मुलीला मागणी घालण्यासाठी लोकं जातात. एकमेकांची पसंती झाली की, मुलाकडील मंडळींनी आणलेल्या मोहाच्या दारुचे सार्वजनिक मद्यपान केले जाते. आणि पुढची बोलणी केली जातात. ज्याच्या घरी लग्न आहे त्या गावातील लोक सर्व तयारी करतात. लग्न घराबाहेर जांभळाच्या झाडाचा मांडव घालण्यासाठी सर्वजन श्रमदान करतात. लग्नामधल्या जेवणावळीत पत्रावळीसाठी लागणारी माहुराची पाने जोडुण पत्रावळ्या व द्रोण हाताने बनवले जातात. लग्न हि खर्चिक गोष्ट आहे. ज्याच्या घरी आहे, त्याला अर्थिक ताण येऊ शकतो हि बाब लक्षात घेउन यात सुंदर परंपरा निर्माण केली आहे.




लग्नाचा खर्च लग्नातला खर्च मुलाच्या आईकडील पाहुणे करतात. जो कुणी पाहुणा येईल तो मोकळा कधीच येत नाही. तांदुळ, तेल, डाळ, मीठ, डुक्कर, बकरा, कोंबडे घेऊन येतात. यात लग्नातल्या जेवणाचा खर्च तर होतोच पण जमा झालेल्या अन्नधान्यावर ते कुटुंब काही महिने जगतंही. हात लांबवणे हा प्रकार लग्नात आढळतो. हात लांबवणे म्हणजे येणारे पाहुणे पैशाची मदत करतात. मात्र या संपूर्ण खर्चाचा हिशेब ठेवला जातो. कारण ज्यांनी मदत केली त्यांच्या कार्यक्रमात मग मदत करता येते यासाठी हा हिशेब ठेवला जातो.

जांभळाच्या मांडवात मुंडा रोवला जातो. मुंडा हे झाडाचे लाकुड असते त्यावर कोरीव काम करुन ते सजवले जाते. त्यावर प्राणी, पक्षी सुर्य, गोंडी ही संस्कृतीची प्रतिके पारंपारिक हत्यारे यामध्ये कुऱ्हाड बंदुक देखील असते. काही भागात यावर विमान, हेलीकॉप्टरही अलिकडे दिसुन येते. मुंडा रोवणे हा एक सोहळा असतो. मुंडा रोवल्यावर त्याच्या बाजुला फेर धरुन रेला नृत्य केले जाते. मांजऱ्या (ढोल) वाजवले जातात. पावसाच्या धाराप्रमाणे थंडावणाऱ्या गोंडी पाटा (गाणी) म्हटली जातात.

लग्न हे मुंडा रोवलेल्या मांडवाखालीच होते. विवाहाच्या ठिकाणी बैलाचे जू आडवे ठेवले जाते, त्याची पुजा केली जाते. अशा प्रकारे आदिवासींचा लग्न सोहळा पार पडतो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मुंडा बोरणे हा कार्यक्रम होतो. मुंडा बोरणे म्हणजे लग्नाच्या निमित्ताने सर्व पाहुणे जमा झालेले असतात. आदिवासी नात्यांमधलं वंगन अजुन कोरडे पडलेले नाही. लोक एकमेकांशी भरभरुन बोलतात. मुंडा बोरणे हा मजा लुटण्याचा कार्यक्रम आहे. लग्नसोहळा पार पडल्याचा आनंद पाहुणे मंडळी साजरा करतात. यात एकमेकांच्या अंगावर रंग टाकला जातो. मेहुणा मेहुणीची चेष्टा केली जाते. कुणी टोपल्यात पकडुन भिती दाखवण्यासाठी साप आणलेला असतो. त्याची भिती दाखवून गंमत केली जाते. पुन्हा त्याला जंगलात सोडले जाते. कुणाला उचलुन पाण्यात टाकले जाते.




घेतात. लहान मुलांपासुन ते वयोवृद्धापर्यंत सर्वजन यात सहभागी होतात. काहीतरी निमित्ताने सर्वजण एकत्र आले आहेत. पुन्हा कोण जगेल मरेल हा भरवसा नाही, त्यामुळे हसुन खेळुन बोलुन एकत्र काही काळ घालवावा व शेवटी एकत्र जेवण करावे हा उद्देश यात असतो. यानंतर सर्व बुजुर्ग पंच व गावकऱ्यांची बैठक बसते. कुणी काय काय आणले ? याची यादी वाचुन दाखवली जाते. तांदुळ तसेच अनेक वस्तुंचा हिशेब आजही बऱ्याच भागात पारंपारिक पद्धतीने म्हणजे सुतळीला गाठी मारुन ठेवला जातो. या बैठकीच्या शेवटी लोकांनी आणलेली मोहाची दारु एका भांड्यात एकत्र केली जाते. बैठक संपताच पुरुष स्त्रिया सार्वजनिक मद्यपान करतात. आज मोठ्मोठे विवाह सोहळे केले जातात यात अनेकदा कर्ज काढले जाते. त्या कर्जाखाली लग्नघर दबुन जाते. त्यांना पुन्हा वर यायला काही वर्ष लागतात. या सगळ्या विवाह सोहळ्यांना आदिवासी विवाह सोहळे हे पर्याय होऊ शकतात. अनेक ग्रामीण भागात आदिवासी विवाहात साधर्म्य असणाऱ्या अनेक गोष्टी दिसुन येतात. उदा: भांड्याचे आहेर आणने, बंद पाकिटात पैसे देणे. या परंपरा म्हणजे या लोकांनी केलेली मदतच आहे.

ठोकताळे माहित नाहीत, कोणत्याही प्रकारचे ऑडिट माहित नाही, पण आदिवासींच्या आणि प्रचलित सिद्धांतामध्ये असलेले साधर्म्य आपल्याला दिसून येईल. अनेक प्रश्नांची उत्तरे पुस्तकांत शोधणाऱ्या विद्वानांपेक्षा कधीही शाळेत न गेलेले हे लोक महान आहेत. कारण त्यांनी केलेल संशोधन छोट्या छोट्या उपाययोजना फक्त आकडे मांडत नाहीत तर यात त्यांनी त्यांच्या संस्कृतीला सुंदर रितीने गुंफले आहे.

Updated : 25 Dec 2023 7:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top