कसा असावा कोरोनानंतरचा महाराष्ट्र, पाहा सक्षणा सलगर यांचं रोखठोक व्हिजन
X
आज महाराष्ट्र दिन. त्या निमित्ताने कोरोनानंतरचा महाराष्ट्र कसा असावा? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने अनेक मान्यवरांचं व्हिजन जाणून घेतलं. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना कोरोना नंतरचा महाराष्ट्र कसा असावा या संदर्भात त्यांचं व्हिजन मांडलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्य, समता, बंधुता एकात्मतेचं दृढीकरण व्हायला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करत महिलांना पुरुषांप्रमाणे समानतेची वागणूक दिली पाहिजे. राजकीय जीवनात वावरताना, शिक्षण घेताना आलेल्या अनुभवातून त्यांनी हे आपलं मत व्यक्त केलं. उच्च शिक्षण महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण तरुणीला उच्च शिक्षण मिळावं. ते शिक्षण या तरुणाला सुशिक्षित नाही तर सृजनशील बनवेल. या शिक्षणातून सदृढ महाराष्ट्र उभा राहिल. असं मत सक्षणा यांनी व्यक्त केलं आहें.
आरोग्य यंत्रणा सक्षम असावी… कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणांच्या मर्यादा समोर आल्या. यावर बोलताना महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा येणाऱ्या काळात सक्षम करायला हवी. असा आशावाद सक्षणा सलगर यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांची प्रगती कोणत्याही देशाची प्रगती महिलांच्या प्रगतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी महिलांची प्रगती होणं गरजेचं आहे. महिलांना ५० टक्के राजकीय प्रतिनिधीत्व महिलांचा समाजातील वाटा हा ५० टक्के आहे. मात्र, त्या प्रमाणात विधानसभा, लोकसभेत महिलांचं प्रमाण ५० टक्के असतं का असा सवाल करत सक्षणा यांनी महिलांना ५० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. राजकीय नेत्यांचं शिक्षण ५० टक्क्यांच्या पुढं असावं. अशी देखील मागणी यावेळी सक्षणा यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केली आहे.