Home > English Blog > Lotus could bloom in UP

Lotus could bloom in UP

Lotus could bloom in UP
X

Predicting the outcome of an Uttar Pradesh election can be injurious to health. In 1993, extensively covering a UP election for the first time, when my editor asked me for an opinion, I promptly claimed that a Ram wave was sweeping across the state against the backdrop of the Babri masjid demolition. I was proven horribly wrong: The caste arithmetic of the formidable Samajwadi Party-Bahujan Samaj Party alliance trumped the emotional appeal of Ram Lalla.

Once bitten, not twice shy: Twenty-four years later, I am putting my neck on the line once again and forecasting a likely BJP win in Uttar Pradesh. In a seemingly ‘wave-less’ election where 403 constituencies are witnessing fierce competition almost everywhere, this may be a big call to make. But there is reason to believe that the lotus is poised to bloom in the country’s most politically prized state.

Firstly, the sheer numbers back the BJP’s claim to be UP’s party number one. In 2014, the BJP-led NDA got 42% of the vote and an astonishing 73 of 80 Lok Sabha seats. While that was an unusual ‘wave’ election, the fact is even a highly unlikely 10% decline in the BJP vote could be enough to give it a leadership position in the state. The SP swept to power in UP in 2012 with 29% of the vote, while in 2007, the BSP got a majority with 30% of the vote.

Some analysts have compared UP with the 2015 Bihar assembly elections, claiming that the SP-Congress ‘gatbandhan’ has changed the electoral numbers game in the state. But this is a false comparison: In Bihar, we had a broad anti-BJP ‘maha-gatbandhan’ (grand alliance), which meant that there was a bipolar contest and at even 34% of the vote, the BJP was pushed to a poor second place. In UP, by contrast, we have a tough triangular fight: Had the two principal players Mayawati and Akhilesh Yadav fought together like Nitish Kumar and Lalu Prasad did in Bihar, the BJP would have struggled to make an impact. The Congress, by contrast, in UP is still a ‘kamzor kadi’ or weak link in the alliance.

Second, it appears that Narendra Modi has successfully bridged the Delhi-Lucknow divide in a state election. His opposition may label him an ‘outsider’ fighting the ‘UP ke ladke’, but the fact is, Modi has struck a chord in the Indo-Gangetic plain. In his adopted village of Jayapur near Varanasi, the road has been washed away, the solar panel batteries have been stolen, the toilets don’t have water supply, and yet, every villager one meets, including in Dalit bastis, says they will vote for ‘Modiji’. In Varanasi’s paan bhandar, traders admit demonetisation has hurt them, but they still chant ‘Har Har Modi’. And on the banks of the Ganga at Assi Ghat, a mahant says the Namami Gange project is eyewash but he will still vote for the PM.

Clearly, the PM, despite unfulfilled promises and a weak local BJP leadership, still retains voter trust and goodwill. Again, the attempt to draw a comparison with Bihar doesn’t quite work. In Bihar, a Nitish Kumar had addressed core issues: Roads, electricity, and crucially, law and order and women¹s empowerment. In UP, Akhilesh Yadav¹s ‘kaam bolta hai’ slogan resonates only in pockets: There is a bit of a ‘UP Shining’ trap in the glossy advertisements that showcase the Gomti riverbank in Lucknow but you can’t ignore the darkness in a Gorakhpur village. And while his emergency crime helpline is a laudable initiative, the image of the Samajwadi Party ‘rowdies’ still haunts the party. Akhilesh could still be the future of UP with a strong youth connect, but may not be its present: “We’ve tried Maya and Yadavs, ek baar Modiji ko bhee chance dete hain!’ is an often-heard refrain.

In a sense, Modi symbolically offers hope amid UP’s over-arching despair. Aligned to this is the artful messaging of political Hindutva, calculated to polarise the electorate. In the 1990s, the Ram Janmabhoomi campaign overtly attempted to consolidate a Hindu identity. Now, a more devious strategy is underway to link caste and community identities to the magical word ‘vikaas’ or development. The odious comparisons between availability of bijli during Ramzan and Diwali and the false claim of discrimination in laptop distribution have been designed to stoke the worst fears and prejudices in a deeply divided society.

The aggressive Yadav and minority support for the Akhilesh-Rahul combine has only accelerated the counter polarisation. As a result, a new Hindutva alliance is being cemented where upper caste interests are being aligned to the numerically large most backward castes and even non-Jatav dalit aspirations. Hindutva politics based on anti-Muslim propaganda and ‘hope’ embodied in the Modi persona offer a deadly combination: The UP voter may well be intoxicated by it this time.

Post-script: One of the great joys of covering a UP election is to listen to the sharp one-liners from politically conscious voters. Ask a shop-keeper in Jaunpur on the PM’s ‘shamshan-kabrastan’ controversial comparison, pat came the reply: “Sir, chunav hai, pehle neta hamein jeene nahi deten, ab hamein marne nahin denge!” (It’s election time, first leaders don’t let us live; now they won’t let us die either).

उत्तर प्रदेश निवडणुकांचा अंदाज बांधणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. १९९३ साली, पहिल्यांदाच उत्तर प्रदेश निवडणूकीचे सविस्तरपणे वार्तांकन करत असताना, जेंव्हा मला संपादकांनी माझे मत विचारले, तेंव्हा मी चटकन दावा केला की बाबरी मशीद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर रामाची लाट राज्यभर पसरलेली आहे. मी पूर्णपणे चूक ठरलो. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या शक्तीशाली युतीच्या जातीच्या गणिताने राम लल्लाच्या नावे झालेल्या भावनिक आवाहनाला पुरती मात दिली.

एकदा धक्का खाल्यानंतरही, परत तेचः चोवीस वर्षांनंतर मी पुन्हा एकदा हाच धोका पत्करत आहे आणि उत्तर प्रदेशात भाजपाच्या विजयाची शक्यता वर्तवत आहे. वरवर पहाता कोणतीही लाट नसलेल्या या निवडणूकीत, ४०३ मतदारसंघांमधील बहुतेक सर्वच ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत असताना, असा अंदाज वर्तवणे कदाचित खूपच मोठी गोष्ट असेल. तरीही देशातील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या या राज्यात कमळच फुलण्याच्या तयारीत असल्याबद्दल विश्वास वाटण्यामागे कारणही आहे.

सर्वप्रथम, येथील केवळ आकडेवारीच उत्तरप्रदेशमधील क्रमांक एकचा पक्ष असल्याच्या भाजपाच्या दाव्याला पुष्टी देते. २०१४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएला ४२% मते मिळाली आणि लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा मिळवित त्यांनी सगळ्यांनाच थक्क केले. ती एक वेगळीच ‘लाट’ असलेली निवडणूक होती. मात्र तरीही त्यावेळेपेक्षा भाजपाची टक्केवरी जरी दहा टक्क्यांनी कमी झाली, जे की खूपच असंभव आहे, तरी देखील मिळणारी मते ही राज्यात नेतृत्वाची जागा मिळविण्यासाठी पुरेशी ठरतील. २०१२ मध्ये २९% मतांसह सपा उत्तर प्रदेशात सत्तेवर आली, तर २००७ मध्ये ३०% मतांसह बसपाला बहुमत मिळाले होते.

सपा-कॉंग्रेस या गठबंधनाने राज्यातील निवडणूकीतील आकड्यांचा खेळ बदलून टाकल्याचा दावा करत, काही विश्लेषकांनी उत्तर प्रदेशची तुलना २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणूकीशी केली आहे. पण ही तुलना चुकीची आहेः बिहारमध्ये एक व्यापक असे भाजप विरोधी महा-गठबंधन होते, ज्यामुळे त्या ठिकाणी ध्रुवीकरण झाले आणि द्विध्रुवी स्पर्धा झाली आणि ३४% मते मिळवूनही भाजपा दुसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला. या उलट उत्तर प्रदेशमध्ये अटीतटीची अशी त्रिकोणी लढत आहेः जर मायावती आणि अखिलेश यादव हे दोन मुख्य स्पर्धक बिहारमधील नितिश कुमार आणि लालू प्रसाद यांच्याप्रमाणेच एकत्र आले असते, तर भाजपाला आपला प्रभाव पाडण्यासाठी झगडावे लागले असते. या उलट उत्तर प्रदेशमध्ये आजही कॉंग्रेस ही या युतीमधील एक ‘कमजोर कडी’ आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांनी या राज्याच्या निवडणूकीत दिल्ली-लखनौमधील दरी भरुन काढल्याचे जाणविते. त्यांचे विरोधक कदाचित त्यांच्यावर ‘युपी के लडके’ अर्थात उत्तरप्रदेशच्या मुलांविरुद्ध लढणारा ‘आऊटसाईडर’ असल्याचा शिक्का मारत असतीलही, पण सत्य हेच आहे की गंगेच्या खोऱ्यात मोदी यांना सूर सापडला आहे. वाराणसी जवळच्या जयापूर या त्यांनी दत्तक घेतलेल्या गावात रस्ते वाहून गेले आहेत, सोलर पॅनलच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत, स्वच्छतागृहांमध्ये पाणीपुरवठा नाही, आणि तरीही भेटणारा प्रत्येक गावकरी, अगदी दलित वस्त्यांमध्ये रहाणाराही, हेच सांगतो की ते ‘मोदीजीं’ नाच मत देणार. वाराणसीतील पान भांडारातील व्यापारी निश्चिलनीकरणाचा फटका बसल्याचे मान्य करतात, पण आजही ते ‘हर हर मोदी’ चाच जप करताना दिसतात आणि गंगेच्या काठावर अस्सी घाटला एक महंत म्हणतात की, नमामी गंगा प्रकल्प हा धूळफेक आहे, पण तरीही ते मात्र पंतप्रधानांनाच मत देणार.

एक गोष्ट स्पष्टच आहे, अपूर्ण आश्वासने आणि कमकुवत स्थानिक भाजपा नेतृत्व असूनही, मतदारांचा विश्वास आणि पत टिकवून ठेवण्यात पंतप्रधान यशस्वी झाले आहेत. पुन्हा एकदा बिहारशी तुलना करण्याचा प्रयत्न फारसा योग्य दिसत नाही. बिहारमध्ये नितिश कुमारांनी मुलभूत समस्यांकडे लक्ष पुरविले होतेः रस्ते, वीज आणि सर्वात महत्वाचे कायदा आणि सुव्यवस्था आणि महिला सबलीकरण. उत्तर प्रदेशात मात्र अखिलेश यादव यांची ‘काम बोलता है’ ही घोषणा केवळ काही भागांतच दुमदुमताना दिसते. लखनौमधील गोमती नदीकाठाची जाहीरात करणाऱ्या चकचकीत जाहीरातींमधून काही प्रमाणात ‘युपी शायनिंग’ दिसते, पण तुम्ही गोरखपूरमधील अंधःकाराकडे दुर्लक्ष करु शकत नाही. आणि एकीकडे त्यांचा इमर्जन्सी क्राईम हेल्पलाईन हा एक स्तुस्त्य उपक्रम असला, तरी समाजवादी पार्टीची ‘रावडी’ ही प्रतिमा अजूनही पक्षाला त्रस्त करते. तरुणांशी असलेल्या भक्कम बंधामुळे अखिलेश अजूनही उत्तर प्रदेशचे भविष्य ठरु शकतात, पण कदाचित वर्तमान मात्र नाहीः “ आम्ही माया आणि यादवांना संधी देऊन पाहिली, एक बार मोदीजीको भी चान्स देते है!” हेच पालुपद बहुतेकदा ऐकू येते.

एक प्रकारे, उत्तर प्रदेशातील वाढत्या निराशेच्या वातावरणात मोदी लाक्षणिक अर्थाने आशा दाखवितात. याच्याच जोडीला राजकीय हिंदुत्वाचा एक चतुर संदेशही आहे, जो मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. १९९० साली राम जन्मभूमी मोहिमेद्वारे हिंदूंना संघटीत करण्याचे उघड प्रयत्न झाले. आता, जात आणि समुदायाची ओळख ‘विकास’ या जादुई शब्दाशी जोडण्याचे एक कुटील धोरण सुरु आहे. रमजान आणि दिवाळीमधील विजेच्या उपलब्धतेची किळसवाणी तुलना आणि लॅपटॉपच्या वाटपावेळी झालेल्या भेदभावाबाबतचे चुकीचे दावे, हे आधीच प्रचंड दुभंगलेल्या समाजामध्ये भीती पसरविण्यासाठीच तयार केलेले आहेत.

अखिलेश आणि राहूल जोडीला मिळणारे आक्रमक असे यादव आणि अल्पसंख्यांक समर्थन हे प्रति ध्रुविकरणाला वेग देत आहे. परिणामी एक नविन हिंदुत्व आघाडी तयार करण्यात येत असून, यामध्ये उच्च वर्णीयांचा फायदा हा संख्येने मोठ्या अशा मागासवर्गीय जातींशी आणि अगदी जाटेतर दलित आकांक्षांशी जोडला जात आहे. मुस्लिम विरोधी प्रचारावर आधारीत हिंदुत्वाचे राजकारण आणि मोदी या व्यक्तिमत्वामध्ये असलेली आशा यांचे एकत्रित मिश्रण खतरनाक आहेः यावेळी या मिश्रणामुळे उत्तर प्रदेशातील मतदार कदाचित धुंद होऊ शकतो.

ताजा कलमः उत्तर प्रदेश निवडणूकांचे वार्तांतन करताना मिळणारा सर्वात मोठ्या आनंदांपैकी एक म्हणजे राजकीय जाण असलेल्या मतदाराकडून ऐकायला मिळणाऱ्या एकएका ओळीच्या टोकदार प्रतिक्रीया.. जौनपूरमधील एका दुकानदाराला पंतप्रधानांनी केलेल्या ‘शमशान-कब्रस्तान’ बाबतच्या वादग्रस्त तुलनेबाबत विचारताच ताबडतोब प्रतिक्रीया येते, “ सर, चुनाव है, पहले नेता हमें जिनें नही देतें, अब हमें मरनें नही देंगे!”

- Rajdeep Sardesai

Updated : 3 March 2017 5:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top