भारतात कर्मचारी आणि कामगारांच्या मानसिक आरोग्यावर का बोललं जात नाही?
X
ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रेशर किंवा कामगारांवर असलेला ताण... यावर भारतात फार कमी बोललं जातं. दिलेली कामं वेळेवर झाली नाही की बॉस कामातून बेदखल करतील याची भिती कर्मचारी आणि कामगार वर्गाला सतावत असते. नोकरी गेली तर घर कसं चालणार, मुलांचं शिक्षण, घर-दार कसं सांभाळावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा आधारचं निघून जाईल? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्याभोवती सुरु असतात. त्यात कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना मोठ्याप्रमाणावर सुरु झाली.
सुरुवातीला वर्क फ्रॉम होम वाटणारा हा आनंद आता नकोसा वाटू लागला आहे. तसेच कामगार वर्गालाही लॉकडाऊनमुळे काम न मिळणं, हातातला रोजगार जाणं, आर्थिक संकट ओढवल्यामुळे चिंता, ताण-तणाव, उदासीनता आणि कामाच्या प्रेशरमुळे कर्मचारी आणि कामगार वर्गामध्ये मानसिक अवस्था बिघडल्याचं चित्र पाहायला मिळतं. अर्थात ऑफिसमध्ये कामाच्या प्रेशरमुळे थकवा आणि शक्तीहीन जाणवण्याच्या स्थितीला 'बर्न आउट' असं म्हटलं जातं. बर्न आउट ही एक मानसिक अवस्था असून हा आजार नाही.
बर्न आउट म्हणजे काय?
बर्न आउट एक असा सिंड्रोम आहे. जो वर्कप्लेसवर होणाऱ्या कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे उत्पन्न होतो आणि याला योग्य प्रकारे मॅनेज केलं गेलं नाही तर व्यक्ती बर्न आउटच्या स्थितीत पोहोचते. या सिंड्रोमचं तीन पद्धतीने विश्लेषण केलं जाऊ शकते.
एनर्जी फार जास्त कमी आणि थकवा जाणवणे.
प्रोफेशनल क्षमता आणि गुणवत्तेत कमतरता येणे.
आपल्या कामाप्रति मनात नकारात्मक भावना येणे.
बर्न आउटची लक्षणे
- कमी झोपणे आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे
- मोटिवेशनची कमतरता जाणवणे आणि कामात लक्ष लागण्यात अडचण येणे.
- वर्कप्लेसवर छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे.
कोरोना काळात अतिकामाचा ताण आल्यामुळे तसेच कर्मचारी बर्न आउट होऊ नये. यासाठी लिंडिन सोशल नेटवर्किंग साईट कंपनीने कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची सुट्टी दिली.
एकंदरित सांगण्याचा मुद्दा असा की, बर्न आउटमध्ये सुद्धा वर्षानुवर्षे सातत्याने ताण-तणावाखाली काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची शारिरीक आणि मानसिक ऊर्जा संपवून जाते. काम करायचं म्हणून ते करत असतात. त्यातून त्यांची उत्पादनक्षमता, कार्यक्षमता कमी होते, सर्जनशीलता संपते आणि निव्वळ काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने ते कार्यरत असतात.
मॅक्स महाराष्ट्रच्या 'माझं मानसिक स्वास्थ' या कार्यक्रमामधील कर्मचारी व कामगार मानसिक आरोग्यावर बोलताना मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत सांगतात की, औद्योगिकीकरण झपाट्याने वाढल्यामुळे कर्मचारी, कामगार वर्ग हा कामात व्यस्त झाला आणि अतिकामाचा ताण येऊ लागला. ८ तासांऐवजी १२ तास काम भारतातील कर्मचारी वर्ग करताना पाहायला मिळतो.
भारतात बर्न आउटचं प्रमाण सर्वाधिक…
त्यामुळे भारतात बर्न आउटचं प्रमाण सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांच्या मानसिक आरोग्याचे कायदे आहेत. परंतू पुरेशा प्रमाणात नाही. मात्र, तिकडे कर्मचारी आणि कामगार यांच्या मानसिक आरोग्याची जागृती पाहायला मिळतेय.
भारतात कर्मचारी, कामगार यांच्या मानसिक आरोग्यावर बोललं जातं नाही. त्याचप्रमाणे यावर कोणताही कायदा अद्यापही भारतात अस्तित्वात नाही. भारतात कामगारांच्या मानसिक आरोग्यावर कायदा करणं आणि जागृता आणणं फार गरजेचं आहे. एकंदरित भारतात Work From Home चे पडसाद काय उमटले? भारतात कामगार मानसिक आरोग्य काय स्थिती? मानसिक आरोग्याचा आर्थिक आणि शारिरीक आरोग्याशी संबंध कसा येतो? कर्मचारी आणि कामगारांच्या मानसिक आरोग्याचा उद्योगांवर काय परिणाम झाले? सरकार आणि उद्योग कंपन्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? यावर सविस्तररित्या सांगतायेत औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत... पाहा हा व्हिडिओ
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडलेल्या तुमच्या मनातील प्रश्न खाली दिलेल्या इमेल आयडीवर पाठवू शकतात. [email protected]
दररोज सकाळी ११ वाजता 'माझं मानसिक स्वास्थ' हा विशेष कार्यक्रम पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर