Home > मॅक्स ब्लॉग्ज > गप्प बसा नतद्रष्टानो, देशाची प्रगती होतेय - संजीव चांदोरकर

गप्प बसा नतद्रष्टानो, देशाची प्रगती होतेय - संजीव चांदोरकर

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी सरकारतर्फे महागाई जास्त नसल्याचा दावा केला जातो आहे. यासाठी विविध आकड्यांचे दाखले दिले जात आहेत. यासर्व युक्तीवादाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी घेतलेला समाचार...

गप्प बसा नतद्रष्टानो, देशाची प्रगती होतेय - संजीव चांदोरकर
X

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी सरकारतर्फे महागाई जास्त नसल्याचा दावा केला जातो आहे. यासाठी विविध आकड्यांचे दाखले दिले जात आहेत. यासर्व युक्तीवादाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी उपरोधिकपणे समाचार घेतला आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन साभार... गप्प बसा नतद्रष्टानो ; देशाची प्रगती होतेय , जीडीपी वाढतोय , जीएसटीचे कलेक्शन वाढतेय ; जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून सर्टिफिकेट मिळत आहेत

सुटेड बुटेड डॉक्टरेट मिळवलेले अर्थतज्ञ , वित्तमंत्री सांगत आहेत देशाची अर्थव्यवस्था ठीकठाक चालली आहे , आणि तुम्ही सामान्य नागरिकांच्या बद्दल निकष सारखे चर्चेत आणता ? तुम्हला अधिक कळते कि या लोकांना ? मॅक्रो इकोनिमिक इंडिकेटर्स ठीक आहेत ना ? मग देशातील कोट्यवधी नागरिकांचे काय होत आहे याची फिकीर कशाला?

अर्थव्यवस्थेत सूक्ष्म पातळीवर काय चालले आहे याचा अजून एक निकष म्हणजे "स्त्रियांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग" लेबर फोर्स पार्टीसिपेशन (एलएफआर _LFR) २००६ सालात काम करू शकणाऱ्या वयोगटातील ३१ % स्त्रियांना रोजगार / मिळकत देणाऱ्या कामे मिळत होती

२०२१ सालात ते प्रमाण १९ % वर आले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नव्या जेंडर गॅप रिपोर्टप्रमाणे १४६ देशांत भारताचा क्रमांक वरून १३५ वा आहे. स्त्रियांच्या एलएफआर मध्ये, भारताच्या १९ % तुलनेत, विकसित राष्ट्रे खूप पुढे आहेतच : अमेरिका (५५%), ब्रिटन (५८%), जर्मनी (५७%)

पण ज्यांची तुलना केली जाते ते विकसनशील देश देखील खूप पुढे आहेत : चीन ६२ % जगात पहिला क्रमांक , ब्राझील ४९ % (सर्व आकडेवारी बिझिनेस लाईन , पान क्रमांक ४, ऑगस्ट ४, २०२२)

सगळी धम्माल. ५ ट्रिलयन्स ची इकॉनॉमी स्त्रियांना घरात बसवून करता येईल का? चीनशी स्पर्धा करता येईल का? प्रश्न विचारायचे नाहीत, नेत्याने घोषणा केली की जोरात टाळ्या वाजवायच्या

दोन गोष्टी समोर येत आहेत ; अर्थव्यस्वस्थेत रोजगाराच्या संधीच आक्रसल्या जातात त्यावेळी नवरा का बायकोने रोजगार मिळवायचा असा प्रश्न तयार झाला तर अर्थातच पुरुष कामावर जातो.

आणि स्त्रियांना दुनियाभराच्या सणवार, व्रतवैकल्ये, धार्मिक रूढी यात अडकवले, मातृत्व वगैरेचे नको तेवढे उद्दात्तीकरण केले की त्यांची बुद्धी ओरिजिनल , माणूस म्हणून विचार करत नाही

पण , पण , पण गेल्या एक दोन दशकात एक मूलभूत बदल झाला आहे ; मुलींना शाळेचे / कॉलेजचे पाणी लागले आहे. (त्यांना मिळालेल्या शिक्षणाची गुणवत्ता तूर्तास बाजूला ठेवून) त्यांची अक्षर ओळख झाली आहे , मराठी , इंग्रजी , स्मार्ट फोन, इंटरनेट वापरू लागल्या आहेत ,

सर्वात मुख्य बदल म्हणजे त्यांच्या भौतिक आकांक्षा , आपल्या पोटच्या मुलांना / मुलींना कसे वाढवायचे याच्या कल्पना त्यांच्या आयांपेक्षा , आज्यांपेक्षा भिन्न होत चालल्या आहेत त्या उठून उभ्या राहणार आहेत :

त्यांना फक्त चूलमूल करायला लावणाऱ्या धर्मांध शक्तींना आणि त्यांना रोजगार / उद्योगधंदे करण्याच्या संधी नाकारणाऱ्या भांड्वलकेंद्री आर्थिक नितींना त्या आव्हान देणार आहेत ; त्यांना साथ देणे आपले काम आहे बघाच तुम्ही

संजीव चांदोरकर (५ ऑगस्ट २०२२)

Updated : 5 Aug 2022 12:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top