Home > मॅक्स रिपोर्ट > पाच वर्षात सोन्याचा भाव 'दामदुप्पट' ...

पाच वर्षात सोन्याचा भाव 'दामदुप्पट' ...

पाच वर्षात सोन्याचा भाव 'दामदुप्पट' ...

पाच वर्षात सोन्याचा भाव दामदुप्पट ...
X

गेल्या दोन महिन्यांपासून Gold Rate सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. तर दोन दिवसात सोने प्रति तोळा (Gold 10 Gram) 60 हजार, 61हजार चा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीची मागणी अचानक वाढली आहे.त्याचा परिणाम सोने भाव वाढीत झाल्याचं जाणकार सांगत आहे.2 मे रोजी 60,500 रुपये असलेला सोन्याचा भाव 3 मे ला 900 रुपयांनी वाढला.त्यानंतर 4 मेला आणखीन 500 रुपयांनी वाढला.61,900 रुपयांवर पोहचला तर काल म्हणजे 5 मे ला जळगाव सराफा बाजारात (24 कॅरेट) 62,100 विक्रमी भावावर पोहचला होता.तर चांदी प्रति किलो 77,800 भावावर पोहचला. गेल्या पाच वर्षात सोनेच्या भावात दामदुप्पट झाले आहेत.

गेल्या पाच वर्षात सोने भाव दामदुप्पट झाले आहे. 2018 मध्ये प्रति तोळा 30 हजार पर्यंत पोहोचले होते. आजचा प्रति तोळा सोन्याचा भाव 62 हजारांवर पोहचला आहे. 2020 च्या कोरोना काळात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली ती कायम सुरू राहिली. खाली दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत.

गेल्या पाच वर्षातील सोने भाव -

24 कॅरेट प्रति तोळा (10 ग्राम )

2018 - 30,300

2019 - 31,600

2020 - 43,700

2021 - 45,000

2022 - 53,500

2023 - 62,100 (5 मे पर्यंत)

दरम्यान आज सराफा बाजार उघडला तेव्हा सोन्याच्या भावात 500 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली.मात्र ही घसरण अल्प काळासाठी असल्याचा अंदाज असून आणखीन भाव वाढतील अस सोने जाणकारांचे मत आहे.

Updated : 14 May 2023 8:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top