Home > मॅक्स ब्लॉग्ज > आजही मी शिकत आहे, असे दलाई लामा का म्हणतात ?

आजही मी शिकत आहे, असे दलाई लामा का म्हणतात ?

आपल्या धका-धकीच्या जीवनात अवस्थता आणि अशांततेचं वातावरण मोठ्याप्रमाणात वाढलं आहे. या सगळ्या गोंधळात बुद्ध आपल्याला काय शिकवतात? बुद्धांचा मार्ग स्विकारत त्यांचे विचार आपल्या आचरणात कसे आणावेत? दलाई लामा बुद्धांच्या शिकवणीचा शोध घ्या असं का म्हणतात? जाणून घ्या डॉ. सुभाष देसाई यांच्या लेखातून...

आजही मी शिकत आहे, असे दलाई लामा का म्हणतात ?
X

साऱ्या जगभरच्या बुद्ध अनुयायांना परमपूज्य असणारे दलाई लामा आता 86 वर्षाचे धर्मगुरु आहेत ते साऱ्या मानवजातीला मनापासून सांगतात की, बुद्ध संदेश हा बुद्ध मूर्ती पुढे केवळ नतमस्तक होण्यासाठी नाही तर तो आचरणात आणण्यासाठी आहे.

एका विशिष्ट गटासाठी तो नाही. एखाद्या देशासाठी नाही तर साऱ्या मानवजातीसाठी आहे. आपापल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार तो आचरणात आणायचे. जीवनामृत आहे उदाहरणात मी बुद्ध शिकवण अगदी बालपणापासून आज ८६ वर्षापर्यंत शिकतच आहे. म्हणून एकविसाव्या शतकातले, जे बुद्धानुयायी आहेत त्यांना मी सांगतो की बुद्ध शिकवणीचा शोध घ्या. बुद्ध नेमके काय सांगतात हे शोधा. त्यानुसार वागा. त्या शिकण्यात ऐकणे आहे, वाचनहि आहे. आपण जे शिकलो त्यावर चिंतनीही आहे. मग त्या विचारांची चिरपरिचित व्हा.

बुद्धांच्या काळापासून आजपर्यंत आपले जग खूप खूप बदलले आहे. पण त्यांच्या शिकवणीचा गाभा आजच्या काळाशी सुसंगत नि उपयुक्त आहे. पाली आणि संस्कृत परंपरेत मोक्ष कसा प्राप्त करावे हे सांगितले आहे. अज्ञान आणि दुःख नाहीसे करणारे मार्गही दाखवलेले आहेत. बुद्ध एवढच सांगतात की, दुसऱ्याला दुखवू नका शक्यतो त्यांना मदत करा ती कोणत्याही पद्धतीने मदत असुदे.

हे काम आम्ही प्रथम समजू की प्रत्येक जण आमच्या सारखाच असतो. त्यालाही आनंद, सुख हवे असते आणि तोही दुःख टाळत असतो. दुःखांपासून मुक्ती आणि आनंद व स्वातंत्र्य मिळवणे हा जणू प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आपला व्यक्तिगत आनंद हा आपण इतरांना कसे वागवतो यावर अवलंबून असतो. परस्परांची सद्वर्तन महत्त्वाचे ठरते. त्यासाठी आम्ही अप्पलपोटेपणा कमी करू शकतो. त्यामुळे तर अनेक समस्या निर्माण होतात. जगातल्या अनेक धर्मातला बुद्ध धर्म एक आहे. फक्त बुद्धाने सांगितले एखादा सोनार सोन्याची पारख करतो तपासतो तसे मी सांगितलेले तपासून पहा. मग हृदयापासून स्वीकारा. जर ते योग्य वाटले, फायदेशीर वाटले तर आचरणात आणा "

धर्मगुरू दलाई लामा भारत आणि तिबेट चे नातं सांगताना भावुक होतात ते म्हणतात "बुद्धाने आम्हाला बुद्धिवादी पद्धत शिकवली आहे.

आमच्या स्वतःपुरते पाहाण्याच्या वृत्तीवर कशी मात करायची हे ते सांगतात. या वृत्तीमुळे आपली मनःशांती बिघडत असते. भारतीय प्राचीन परंपरेत करुणा आणि अहिंसा ही तत्त्वे फक्त भौतिक जगा पुरती मर्यादित नाहीत तर ती शरीर क्रिया आणि मानसिक पातळीवरही उपयुक्त ठरतात.

आम्ही दुसऱ्यांना विविध रीतीने दुखावतो कारण आमचे मन आमच्या ताब्यात नसल्याने ते बेशिस्तपणे चालते. बुद्ध धर्मात आम्ही असे म्हणतो की ज्याच्या मनाला शिस्त आहे तेथे आनंद नांदतो. जेथे बेशिस्त असते तेथे मन दुःखी होते.

बुद्धाला आम्ही शाक्यमुनी असे म्हणतो. त्यांचा संदेश तक्षशिला, विक्रमशीला आणि नालंदा या मोठ्या विद्यापीठातून जगभरच्या तरुणांना शिकवला जात होता. सातव्या शतकात तिबेटच्या सम्राटाने भारतातल्या देवनागरी लिपी प्रमाणे भाषा तयार करून त्यात बुद्ध संदेश लिपिबद्ध केला. त्याने भारतातून शांतरक्षिता या थोर तत्त्वज्ञानाला तर्कशास्त्रीला निमंत्रित केले व बुद्धधर्माचा प्रसार केला. बुद्ध विचारांचा तिबेटीयन भाषेत अनुवाद करून घेतला त्याप्रमाणे अनेक भारतीय विद्वान लोक तिबेटमध्ये आले होते.

शांतरक्षिताने समग्र बुद्ध संदेश अभ्यासक्रम बनवला मी (दलाई लामा )तिबेटमध्ये मोठ्या कष्टाने तो पूर्ण अभ्यासला. त्यात उत्तम बुद्धी व तर्क याचा वापर आहे त्यानंतर चा भाग म्हणजे कठोर ध्यान आणि त्या मार्गांनने ज्ञानप्राप्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.

प्रारंभी भारतीय विद्वान हे आमचे गुरू होते. पुढे एक हजार वर्षे ती उज्ज्वल परंपरा तिबेटियन लोकांनी जपली त्यामुळे मी जेव्हा जेव्हा भारतीय बांधवाची चर्चा करतो. त्यावेळी माझे हृदय कृतज्ञतेने भरून येते भारत ही बुद्ध भूमी आहे.

माझे तिला नमन"

डॉ. सुभाष देसाई

Updated : 4 Oct 2021 9:21 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top