वेलकम टू न्यू इंडिया : आनंद शितोळे
देशात सध्या सुरू असलेला कारभार आणि लोकशाहीचे प्रतीक असणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे महत्व, याचे परखड शब्दात विश्लेषण केले आहे आनंद शितोळे यांनी
X
देशात सध्या सुरू असलेला कारभार आणि लोकशाहीचे प्रतीक असणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे महत्व, याचे परखड शब्दात विश्लेषण केले आहे आनंद शितोळे यांनी...
'काही महिन्यापूर्वी कर्नाटकच्या मंत्र्याने , " लवकरच भगवा ध्वज राष्ट्रध्वज असेल " अस म्हटलेलं आठवत आहे का ?
बहुतांशी स्वायत्त संस्थांवर सामान्य लोकांचा विश्वास उरलेला नाही. राज्य आणि केंद्राचे संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत आणि राज्यांच्या अधिकारावर केंद्र सातत्याने आक्रमण करत आहे. केंद्र आणि राज्यांची संयुक्त सूची केव्हाच केराच्या टोपलीत पडलीय. राज्यांचे अधिकारही कायदे करून केंद्र स्वतःकडे घेत आहे.
माध्यमं भाट झालेली आहे. कुणीही चटोर माणूस उठतो , कुणाविरोधात काहीही तक्रार करतो आणि सरकार सरळ माणूस उचलून कोठडीत डांबून मोकळ होतय. देशाचे मानबिंदू जाणीवपूर्वक थिल्लर पद्धतीने वापरले जाताहेत. तिरंगा फडकवणे अभिमानाची बाब आहे पण त्याची ध्वजसंहिता पाळणे तितकेच आवश्यक आहे.
सरकारने प्लास्टिक किंवा कृत्रिम धाग्यांच्या झेंड्याला परवानगी दिलीय. आता अशोकस्तंभची नव्या संसदेवर बसवलेली प्रतिकृती. भारताचे मानबिंदू जाणीवपूर्वक अश्या पद्धतीने सुमार दर्जाचे बनवले जाताहेत. लोकशाही पद्धतीने सत्तेवर येऊन लोकशाही गाडून हुकुमशाही एकेक पावलाने आपल्या घरात आलेली आहे. वेलकम टू न्यू इंडिया.'
- आनंद शितोळे