Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : महापुरानं उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी पॅकेजचा आधार पुरणार का?

Ground Report : महापुरानं उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी पॅकेजचा आधार पुरणार का?

निसर्ग कोपल्यानं सांगली जिल्ह्यात महापूर आणि अतिवृष्टीनं 41 हजार हेकटर शेती उध्वस्त झाली असून 97 हजार 486 शेतकरी संकटात सापडले आहेत. ऊस,सोयाबीन, भाजीपाला पिकांचे 46 कोटींच नुकसान झालं ... राजाराम सकटे यांचा ग्राउंड रिपोर्ट....

Ground Report : महापुरानं उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी पॅकेजचा आधार पुरणार का?
X

सांगली जिल्ह्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे 41 हजार हेक्टर शेतीच क्षेत्र उध्वस्त झालं आहे. शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील 97 हजार 486 शेतकरी संकटात सापडले आहेत. ऊस,सोयाबीन, भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी उभ्या ऊस पिकांसह शेतीच वाहून गेली आहे. 46 कोटींच नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.



जिल्ह्यात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली होती.

कृष्णा नदीची पाणी पातळी 54 फुटांच्यावर गेली आहे. कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली होते. सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरल्यानं जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. 30 ते 30 हजार जनावरे स्थलांतर करण्यात आली आहेत.

अनेक ठिकाणी अजून रस्ते वळवण्यात आले असून शेकडो हेक्टर शेती अजूनही पाण्याखाली आहे. स्वा.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नदीला महापूर आला. त्याच बरोबर छोट्या नद्या आणि गावातील ओढयांना पण पूर आला. त्यामुळे घर आणि शेती पाण्यात गेली. अनेक ठिकाणी पीक पाण्या खाली गेली.

त्यामध्ये प्रामुख्याने वाळवा तालुक्यातील रेठरे धरण- ओझर्डे येथे तर उभ्या ऊस पिकांसह शेतीच वाहून गेली आहे. तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने हा फटका बसला असल्याचे सांगितले जाते.वाळवा तालुक्यातील ओझर्डे गावातील जगदीश शामराव पाटील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.

यांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे.



जगदीश शामराव पाटील या शेतकऱ्याची तब्बल ३० गुंठे क्षेत्र उभ्या ऊस पिकांसह वाहून गेली आहे. शेत जमिनीच्या कडेने तिळगंगा नदीचे पात्र असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दगडी ताली म्हणजेच बांध घातले आहेत होते.

शेतकरी सुहास चौगुले म्हणाले, या नदी किनारी असणारा दगडी संरक्षक बांध प्रवाहात वाहून गेल्याने मोठी हानी झाली आहे. जगदीश पाटील यांनी ही दोन वर्षांपूर्वी सोसायटीचे कर्ज काढून शेत जमिनीला संरक्षक भिंत घातली होती. त्याला तब्बल तीन लाख रुपये असा खर्च आला होता. वीस फूट उंची असणारी आणि चारशे फूट लांब असणारी संरक्षक भिंत पाण्याच्या प्रचंड दाबाने फुटून ३० गुंठे जमीनचं होत्याची नव्हती झाल्याने त्यांचे कुटुंबीय हतबल झाले आहेत. कोरडवाहू शेती असल्याने ठिबक योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात होते. हे सर्व ठिबकचे पाइपलाइन संचही वाहून गेले आहेत. पाणी वाहून गेल्याच्या खुणा जमिनीवर दिसत आहेत. काही उभा ऊस आडवा झाला आहे.

ओझर्डे गावचे शेतकरी जगदीश शामराव पाटील म्हणाले, पलूस तालुक्यातील भिलवडी,औदुंबर, अंकलखोप,पुनदी,आशा अनेक गावातील शेतकऱ्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.या अचानक आलेल्या पुराने शेतीतील उभी असलेली पिके उद्धवस्त झाली आहेत.यामध्ये प्रामुख्याने ऊस शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.त्याबरोबर केळी, पपई,खाऊची पाने,सोयाबीन, आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पुरामुळे शेतातील पाणी हे किमान दोन ते तीन महिने या पाण्याचा निचरा होत नाही.निचरा न झाल्याने जे ऊस पीक आहे.त्या पिकाला खालून मुळ्या सुटण्यास सुरुवात होते.त्यामुळे ऊसाचे वजन कमी होते.व तो ऊस तोडून घेऊन जाण्यास कारखानदार तयार होत नाही.पाण्याचा निचरा न झाल्याने शेतीमध्ये लागण करण्यात आला होता.



जो ऊस आहे तो ऊस कोलमडून पडतो.त्यामुळे मोठे नुकसान होते.हा नुकसानीचा आकडा मोठा असतो.शेतकरी अमोल चौगुले म्हणाले, काही भागात अचानक आलेल्या पावसाने शेतीमधील बांध फुटून वाहून गेले आहेत.काही भागात शेतातील पिकासहित माती वाहून गेली आहे. पीक नुकसान हे पंचनामा केला नंतर मिळेल.मात्र शेतातील जी सुपीक माती आहे. ती माती वाहून गेल्याने शेतातील खर्च हा दुप्पट झाला आहे.आता शेतामध्ये माती सुपीक माती आणून बांध घालून शेती तयार करावी लागणार आहे.असं जर एक वर्षा आड वर्ष जर घडू लागले तर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे न भरून येणारे नुकसान असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.नदीकाठच्या शेतकऱ्यांचे तर या ही पेक्षा वाईट हाल पाहायला मिळते.काही शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.नदी काठाला असलेली थोडकी जमीन त्यामध्ये येणारे थोडेशे पीक त्याच पिकांवर चालू असलेला उदरनिर्वाह हा म्हणजे तारे वरची कसरत म्हणावी लागेल.



अमोल चौगुले म्हणाले, शेतीच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील पश्चिम भाग हा सुजलाम सुफलाम मानला जातो.मात्र त्याच भागात जरवेळी हा पुराचा फटका बसू लागला.तर मात्र शेतकऱ्यानी जगायचं कसं असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.पश्चिम भाग हा नदी काठचा भाग आहे.तर पूर्व भाग हा दुष्काळी भागात गणला जातो.या भागात पिण्याच्या पाण्या पासून लोकांना अडचणी आहेत.पश्चिम भागातील पाणी हे दुष्काळी भागातील शेतीला मिळावे.या साठी राज्य शासनाने मोठं मोठ्या योजना चालू केल्या.कोट्यवधी रुपये खर्च केले.त्या योजना निवडणूक आल्या की चालू ही होतात.मात्र निवडणूका झाल्या की त्या योजना मोटारांच्या बिल भरणीच्या कारणावरून बंद असतात.या योजनांचे पाणी पुरवठा चालू करून दुष्काळी भागाला सोडले तर पूर परिस्थितीला थोडा फार फरक पडण्याची शक्यता वर्तवली जाते.

पूर पट्यातील नागरिक आता या येणाऱ्या अस्मानी संकटाला हैराण झाले आहेत.येणाऱ्या पुरामुळे होणारे नुकसान हे खूप मोठे आहेच.पण पूर आल्यानंतर जिल्हा हा पूर पर्यटन स्थळ होतो.त्याची भीती लोकांना वाटू लागली आहे.पूर आला की नेते वाऱ्या सारखे येतात आणि वाऱ्यासारखे निघून ही जातात.त्यामुळे मिळणाऱ्या मदतीची वाटच पाहत बसावे लागते.वाहून जाणारे नुकसान आणि पूर ओसरल्या नंतर घरी गेल्या नंतर ची परिस्थिती पाहता.डोळ्यातील अश्रू अनावर होतात.घर साफसफाई करायचे म्हंटले तर पैसे नसतात.यामुळे यावर कायम चा तोडगा माय बाप सरकारने काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी व अंकलखोप येथील पूरबाधित गावांची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. तुमच्या सर्वांच्या साथीने यातून मार्ग काढणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Updated : 5 Aug 2021 10:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top