Home > मॅक्स ब्लॉग्ज > पाप वाढलं म्हणून शेतकऱ्यांवर संकट?

पाप वाढलं म्हणून शेतकऱ्यांवर संकट?

जगात काही वाईट घटना घडली तर काही... शेतकरी म्हणतात पाप वाढलं म्हणून शेतकऱ्यांवर संकट आलं. मात्र, खरंच असं होतं का? वाचा पापणुण्यांच्या मिथकावर प्रत्येकाचे डोळे उघडणारा गिरधर पाटील यांचा लेख

पाप वाढलं म्हणून शेतकऱ्यांवर संकट?
X

नेहमीच्या एका वाचक शेतकऱ्यांचा फोन आला. या साऱ्या नुकसानीतून निसर्गाला काही संदेश द्यायचा आहे का? अशी त्याची शंका होती. आपल्यावर झालेल्या वैदिक संस्कारानुसार आपल्याला निसर्ग का कोपला असेल? याची कारण मीमांसा शोधतांना, निती-अनिती, न्याय-अन्याय, पाप-पुण्य व त्यातून निर्माण झालेल्या स्वर्ग, नरक वा मोक्षाच्या कल्पनांची आठवण येणे स्वाभाविकच आहे. कदाचित त्यांना यातील एका कारणाची अपेक्षा असावी. कदाचित त्यानी त्यांचे समाधानही करता आले असते. कारण अशी विचार पध्दती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाली आहे. त्यांना म्हटले, असं काही नाही.

निसर्गाने आपल्याला या जगात पाठवलं ते एक स्वतंत्र एकक म्हणून नव्हे तर या साऱ्या पसाऱ्याचा एक भाग म्हणून आपलं अस्तित्व असायला हवं. एकपेशीय जीवापासून ते अच्युत्तम पातळीवर विकसित झालेल्या मानवापर्यंत सारे एका अदृष्य धाग्याने जोडले गेले असून त्यांची अधिकार, कर्तव्ये व जबाबदाऱ्याही निश्चित असतात. या जबाबदाऱ्या पार पाडल्या की, आपले इहलोकीचे कारण संपते.

शेतकऱ्यांना यदाकदाचित काही संदेश असला तर तो आपल्या सहाध्यायी बंधूसह जो काही अन्याय सहन करत साऱ्या शेतकरी समाजालाच एका राजकीय, सामाजिक व आर्थिक कोंडीत नेत त्याचा प्रतिकार करु शकत नसतांना त्यांनी असे भाकड जीवन जगण्याचा मार्ग निवडला आहे. अशा अनेक घटकांना असा शाप असतो व शेतकऱ्यांना आपली सामूहिक जबाबदारी ओळखत त्याला तोंड देण्याऐवजी एकेकाने आपले मौल्यवान जीवन संपवायचा मार्ग निवडला आहे.

एक तर आपल्या समस्या काय ते समजून घ्यायच्या नाही, समजल्या तर एकत्र यायचे नाही व त्यामुळे अशा गर्तेत सापडलेल्या समाजाला गमवण्यासारखे काही ठेवायचेच नाही. म्हणजे तो आपल्यासह साऱ्यांची सुटका करुन घ्यायला प्रवृत्त होईल. असे कदाचित निसर्गाला कळवायचे असावे. अर्थात ही मांडणी सारा शेतकरी समाज भोगत असलेल्या अन्यायापोटी त्याने काहीतरी करावे यासाठी असली तरी त्या शेतकऱ्यापर्यंत कितपत पोहचली असेल याची शंकाच आहे.

(गिरधर पाटील यांच्या फेसबुक भिंतीवरून)जगात काही वाईट घटना घडली तर काही... शेतकरी म्हणतात पाप वाढलं म्हणून शेतकऱ्यांवर संकट आलं. मात्र, खरंच असं होतं का? वाचा पापणुण्यांच्या मिथकावर प्रत्येकाचे डोळे उघडणारा गिरधर पाटील यांचा लेख

Updated : 19 Oct 2020 8:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top