Home > मॅक्स ब्लॉग्ज > ८० वर्षांचा 'शहेनशहा'

८० वर्षांचा 'शहेनशहा'

फिल्म इंडस्ट्रीला आपल्या दूरदृष्टीतून वेगळाचं आयाम देणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस... आजारपणावर मात करत लोकांच्या मनामध्ये शहेनशाह बनून राहणारे अमिताभ बच्चन कसे घडले ? जाणून घ्या ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडून...

८० वर्षांचा शहेनशहा
X

अमिताभचे यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे. तरीही टीव्हीवर, सिनेमात, जाहिरातीत, इव्हेंट्समध्ये, सरकारी उपक्रमात, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर असा तो सर्वसंचारी आहे. अगदी तरुणपणी त्याला हवाईदलात जायची इच्छा होती. सात हिंदुस्तानी, आनंद, प्यार की कहानी, रास्ते का पत्थर, बंधे हाथ, एक नजर, बन्सी बिरजूमधला अमिताभ नवखा, पण उत्कट होता. तो स्टाइलाइज्ड झाला नव्हता.

'भुवन शोम' या देशातील पहिल्या समांतर सिनेमास त्याने आपला आवाज दिला. पण स्वत: मात्र समांतर सिनेमाकडे पाठ फिरवली. मात्र त्याची अभिरुची उच्च दर्जाची आहे. दिलीपकुमार व वहिदा हे त्याचे आवडते कलावंत आहेत. तो उत्तम सतार वाजवतो आणि प्रभावीपणे कविता सादर करतो. देव आनंद वा राजेश खन्नाप्रमाणे तो फक्त स्वप्रेमातच बुडालेला नाही. इतरांच्या अभिनयास फुले व चिठ्ठी पाठवून तो दादही देतो. त्याने सर्वाधिक दुहेरी-तिहेरी भूमिका केल्या आहेत. आजही तो रेलेव्हंट वाटतो. माझ्या, म्हणजे बाबू मोशायच्या 'शहेनशहा अमिताभ' या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दलचे वेगळे विश्लेषण वाचायला मिळेल.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे समकालीन जे नट होते उदा. राजेश खन्ना, शत्रुघन सिन्हा, शशी कपूर, विनोद खन्ना हे अनेकदा बदलत्या काळाशी तेवढया प्रमाणात जुळवून घेऊ शकले नाही. उलट अमिताभ बच्चन सातत्याने नवीन निर्माते आणि नवीन कलावंताबरोबर काम करत राहिले. ज्या वेळी सोशल मीडिया प्रचलित नव्हता तेव्हा पासून अमिताभ बच्चन हे ट्विटर, फेसबुक अशा सोशल मीडिया साईटवर अँक्टिव होते. त्यांचे यावर लाखो फॉलोवर आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या उमेदीच्या वयात अनेक बकवास सिनेमे केले. खास करून त्यांनी जेव्हा (ABCL)एबीसीएल कंपनी स्थापन केली तेव्हा सुद्धा त्यांनी टेलिव्हिझन हे क्षेत्र पुढील काळात विस्तारणार आहे हे लक्षात घेतले होते. एबीसीएल या कंपनी मार्फत त्यांनी काही टीव्ही सीरीयल्स काढल्या तसेच तेरे मेरे सपने यांसारखे चित्रपट ही काढले. या चित्रपटात च्रंदचूड तसेच अरशद वारसी या नटांना त्यांनी प्रथम संधी दिली. तसेच अमिताभ बच्चन हा ब्रँड तयार करून त्याचे व्हॅलुएशन करण्यासाठीची पोस्ट त्यांनी फिल्म इंडस्ट्री घडवून आणली...

एबीसीएल या कंपनीत त्यांनी अनेक प्रोफोशनल मॅनेजर घेतले होते. चित्रपट क्षेत्रामध्ये मॅनेजमेंट मार्केटिंग ज्या बाबींना महत्त्व दिले पाहिजे याचा आग्रह अमिताभ बच्चन यांनी धरला होता. यावेळी चित्रपट उद्योग गावठी पद्धतीने चालू होता. त्यावेळी त्यात प्रोफोशनलिझम असला पाहिजे हे अमिताभ यांचे मत होते. आणि या बाबत त्यांची दूरदुष्टी दिसून येते.

एबीसीएल कंपनी तोट्यात गेल्यामुळे अमिताभ आर्थिक अडचणीत आले आणि त्यामुळे त्यांना नाईलाजाने फारच वाईट सिनेमांमध्ये काम करावे लागले. त्यानंतर अमिताभने गेल्या १०-१५ वर्षात पा, पिकू, पिंक, यासारख्या (अर्थपूर्ण चित्रपटात ) आशयाच्या चित्रपटात काम केले. अनंत आजार असूनही अमिताभ सतत कामामध्ये बिझी असतात. आणि आजी ('कोन बनेगा करोडपती') केबीसीचा कार्यक्रम त्यांच्यामुळेच लोकप्रिय आहे. दिलीप कुमार यांच्यानंतर भारतात सर्वोत्कृष्ठ अभिनेत्यानंतर अमिताभ बच्चन यांचा नंबर लागतो. ८० व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या बॉलिवूडच्या शेहनशाह अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

Updated : 11 Oct 2021 4:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top