Home > मॅक्स ब्लॉग्ज > निष्पक्ष सडेतोड पत्रकारितेचा चेहरा हामिद मिर

निष्पक्ष सडेतोड पत्रकारितेचा चेहरा हामिद मिर

भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे आरोप होत असतानाच शेजारच्या पाकिस्तानमध्येही अशाच पद्धतीने लष्कराच्या माध्यमातून प्रसार माध्यमांची नाकेबंदी सुरू झाली आहे. पत्रकार हमीद मीर यांच्या लोकप्रिय राजकीय टॉक शो 'कॅपिटल टॉक' निमित्ताने विश्लेषण केले आहे लेखक अभ्यासक विकास मेश्राम यांनी...

निष्पक्ष सडेतोड पत्रकारितेचा चेहरा हामिद मिर
X

पाकिस्तानमधील लोकशाही ही नाममात्र असून पुर्ण सत्ता ही लष्कराच्या अधिपत्य खाली ही लोकशाही आहे म्हणजे या देशाच्या लोकशाही मध्ये लष्कराचा हस्तक्षेप हा महत्वाचा भाग आहे यामुळे लोकशाहीचा पुरस्कार करणार्‍या संस्थांचे मोठेपणही धोक्यात येईल का हा प्रश्न निर्माण होत आहे . पाकिस्तानचा भूतकाळ दर्शवितो की स्वतंत्र पत्रकारिता करणे हे खूप जोखमीचे हींमतीचे काम आहे या देशात पत्रकारांवर वारंवार हल्ले करणे सामान्य आहे.

पत्रकारांचे म्हणणे आहे की सन 2018 पासून आतापर्यंत किमान तीन हजार मीडिया कर्मचार्‍यांनी सरकार आणि सैन्याच्या दबावाखाली आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. रिपोर्टर विथ बॉर्डर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते, पत्रकारांना काम करण्यासाठी पाकिस्तान हा जगातील पाच धोकादायक देशांपैकी एक आहे. एप्रिलमध्ये पाकिस्तानी ज्येष्ठ पत्रकार अबसार आलम यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी राजधानी इस्लामाबादमध्ये हल्ला करून त्यांना जखमी केले होते. खरं तर, पत्रकारांवर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे, हल्लेखोरांची ओळख कधीच उघडकीस येत नाही. पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांच्याबद्दल नुकतीच चर्चा सुरू असून लष्कराविरोधात टीका केल्यामुळे त्यांचा बहुचर्चित टीव्ही टॉक शो 'कॅपिटल टॉक' चे प्रसारण थांबविण्यात आले आहे.

पाकिस्तानी लष्कराचे टीकाकार आणि पत्रकार असद अली तोर यांच्यावरील हल्ल्याविरोधात आयोजित कार्यक्रमात हमीद मीर यांनी सैन्याबद्दल तीव्र टीका केली होती. असद तोर यांच्या घरावर तीन अज्ञात लोकांनी हल्ला केला हा हल्ला लष्कर पुरस्कृत आहे असा आरोप तोर यांनी केला. यासंदर्भात मीर यांनी पत्रकारांवर सातत्याने होणार्‍या हल्ल्यांसाठी जबाबदार्या निश्चित करण्याबरोबरच पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेत सहभागी असलेल्यांची ओळख उघड करण्याची मागणी केली होती. हमीद मीर यांनी कठोर शब्दात म्हटले होते की 'तुम्ही आमच्या घरांवर हल्ला करीत आहात पण आम्ही तुमच्या घरीवर हल्ला करू शकत नाही कारण आमच्याकडे ,तोफ ,शस्त्रे ,बंदूके नाहीत , परंतु आम्ही तुमच्या घरात असलेल्या अशा बर्‍याच गोष्टी शोधू शकतो.

या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रसिद्ध टीव्ही चॅनल जिओच्या व्यवस्थापकांवर सैन्याचा दबाव वाढला आणि पाकिस्तानचा सर्वाधिक लोकप्रिय राजकीय टॉक शो 'कॅपिटल टॉक' सादर करण्यास हमीद मीर यांना बंदी घातली. चॅनेलच्या व्यवस्थापकांनी कबूल केले की त्यांच्यावर लष्कराचा दबाव होता. याविरोधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल म्हणाले की दमनकारी वातावरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी माध्यम संस्थांना मोठे आव्हान आहे ज्यावरून असे दिसून येते की प्रेस पाकिस्तानात खरे स्वातंत्र्य उपभोगत नाहीत. या कारणामुळेच सत्ताधारीच्या हस्तक्षेपामुळे बीबीसीला या वर्षाच्या सुरुवातीच्या उर्दू बुलेटिनचे प्रसारण स्थगित करावे लागले.

किंबहुना वीस वर्षांपासून जिओ टीव्हीवर कॅपिटल टॉक प्रोग्रामचे आयोजन करणारा हमीद मीर हे नेहमीच सत्ताधारी लोकानी आणि लष्करानी त्यांना लक्ष्य केले आहे . यापूर्वीही त्याच्यावर दोनदा बंदी घालण्यात आली आणि त्यानीं दोनदा नोकरी गमावली आहे. त्यांच्यावरही हल्ला झाला होता परंतु त्यांचा हा कार्यक्रम पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि सत्ताधारी अधिकारीऱ्या कोणतीही कारवाई केल्याने पाकिस्तानी जनतेची तीव्र प्रतिक्रिया दिसून येते.

23 जुलै 1966 रोजी लाहोरमध्ये एका पत्रकाराच्या कुटुंबात जन्मलेला हमीद मीर हे वारिस मीर आणि मुमताज मीर यांचे पुत्र आहेत . पत्रकार, स्तंभ लेखक आणि संपादक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. हमीद मीर हे सडेतोड पत्रकारितेसाठी ओळखले जातात. मीर बर्‍याच काळापासून पाकिस्तानच्या प्रसिद्ध वृत्तपत्र जंगच्या जिओ टीव्हीशी संबंधित आहेत. ओसामा बिन लादेन, कॉलिन पॉवेल आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्यासाठी साठी ते ओळखले जातात. बलुचिस्तानमध्ये सैन्याने जनतेच्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा मुद्दा मीर यांनी जोरदार उपस्थित केला. यानंतर मीरला 19 एप्रिल 2014 रोजी जियो न्यूजच्या कार्यालयात जात असताना मोटारसायकलस्वारांनी सहा गोळ्या झाडल्या,तेव्हा त्यांच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान धाडस दाखविले आणि त्याचा जीव वाचला. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी न्यायालयीन चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली होती आणि हल्लेखोरांच्या अटकेसाठी एक कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. 2012 मध्येही त्याला ठार करण्यासाठी त्यांच्या गाडीखाली बॉम्ब ठेवण्यात आला होता जो वेळीच लक्षात आल्यावर निकामी करण्यात आला . आपल्या कार्यक्रमांवर घातलेल्या बंदिबाबत मीर म्हणतात बंदी असूनही मी घटनेने दिलेल्या अधिकारांसाठी आवाज उठवतच राहणार आहे. आता असे म्हटले जात आहे की सरकार आणि सैन्याच्या दबावानंतर काही पत्रकार संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मीर यांनी म्हटले आहे की सैन्याची प्रतिमा डागाळण्याचा त्यांचा हेतू नव्हता किंवा भाषणात त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही.

विकास मेश्राम

[email protected]

Updated : 16 Jun 2021 7:55 AM IST
Next Story
Share it
Top