Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्वतंत्र भारतात विज्ञानाच्या तीर्थक्षेत्रांचा निर्माता

स्वतंत्र भारतात विज्ञानाच्या तीर्थक्षेत्रांचा निर्माता

एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षात, पदार्पण करतांना ,आधुनिक भारत घडवताना नेहरूंनी जी दूरदृष्टीने उभारणी केली तरी सुद्धा आजच्या व्हाटस अँप फारवर्ड विद्यापीठ आणि शासन प्रणाली मध्ये त्यांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे, त्यामुळेच स्वतंत्र भारतात विज्ञानाच्या तीर्थक्षेत्रांचा निर्मात्या विषयी व्यक्त झालेत अभ्यासक विकास मेश्राम..

स्वतंत्र भारतात विज्ञानाच्या  तीर्थक्षेत्रांचा  निर्माता
X

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची सत्तावनवी पुण्यतिथी नुकतीच पार पडली या प्रसंगी त्याचे स्मरण करण्यासाठी, त्याचा जीवन प्रवास साधारणपणे दोन भागात विभागला जाऊ शकतो. पहीला 15 ऑगस्ट, 1947 पूर्वीचा जेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास नऊ वर्षे तुरूंगात घालविली, तेव्हा त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. याच काळात त्यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सारखे पुस्तकही लिहीले , आणि दुसरे म्हणजे 15 ऑगस्ट 1947 नंतर ते शेवटच्या श्वासापर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले आणि आधुनिक भारताची निर्मिती केली.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात इंग्लंडच्या संसदेतील विरोधी पक्षनेते विन्स्टन चर्चिल यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याला विरोध केला ते म्हणायचे की भारतीय स्वराज्य ,स्वातंत्र साठी पूर्णपणे अयोग्य आहे, आणी भाकीत केली आहे की ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर संपूर्ण यंत्रणा , न्यायप्रणाली , आरोग्य सेवा, रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम इत्यादींचा सेवा क्षेत्राचा नायनाट भारतात होईल. इतकेच नव्हे तर भारत हा साप ,मुंगूस, मदारी युगात परत जाईल कारण जर भारतीय नेत्यांची पिढी आपल्याशी भांडत असेल तर ती संपेल अशा इशारा त्यांनी दिला.जर भारत स्वतंत्र झाला, तर चर्चिलच्या या भविष्यवाणीला खोटी ठरविणे त्याचे एक मोठे आव्हान होते. असे असले तरी, भाकरा आणि नांगल यासारख्या 'आधुनिक भारतातील नवीन तीर्थक्षेत्रे' च्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोच्या अभिमानापूर्वक पोहोचली, याचे श्रेय पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना जाते.

पं. नेहरूं यांनी फाळणीच्या वेळी दोन्ही बाजूंच्या हिंसक गटांना ते स्पष्ट संदेश देण्यास अजिबात संकोच केले नाही आणि कणखर पणे फाळणीची परीस्थिती हाताळली की आपल्या सह-अस्तित्वाचा एकमेव पर्याय म्हणजे शांतता होय अशी त्यांची धारणा होती महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शेजारी चीनशी झालेल्या पंचशील कराराबद्दल शांततेत सहजीवन हादेखील एक भाग होता,परंतू 1962 मध्ये चीनने हा करार देश तोडुन भारतावर आक्रमण केले. निःसंशयपणे, हा एक मोठा विश्वासघात होता, त्यामुळे नेहरू यांना खूप दुःख झाले आणि 27 मे 1964 मध्ये त्यांचे निधन झाले..

धार्मिक विडंबनवादी लोकांशी व्यवहार करताना पं. नेहरूंना त्यांचा धर्म काय आहे किंवा त्यांचे बाजारीकरण कधीच केले नाही धर्मनिरपेक्षतेची आपली प्रतिमा शेवट पर्यंत जपली पुरुषोत्तम दास टंडन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मध्ये सप्टेंबर 1950 मध्ये जेव्हा कॉंग्रेसची परिषद आयोजित केली गेली होती तेव्हा पं. नेहरूंनी व्यासपीठावरून आपल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगितले होते की, "जर पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतील तर आपण इथेही तसे करू का?" जर याला लोकशाही म्हटले जाते तर अशा लोकशाहीला नरकात घाला ! "त्यानंतर त्यांनी परिषदेच्या प्रतिनिधींना सांगितले," जर तुम्हाला पंतप्रधान म्हणून मी हवा असेल तर तुम्ही मला बिनशर्त माझ्या मागे रहा आणि आपल्याला नको असेल तर ते स्पष्टपणे सांगा. मी पद सोडून कॉंग्रेसच्या आदर्शांसाठी स्वतंत्रपणे लढा देईन.

पं. नेहरू हे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे एकमेव नायक आहेत, जे आपल्या समर्थकांना किंवा विरोधकांना कल्पनांच्या पातळीवर कोणतीही सोडत नाहीत, जेणेकरून ते कोणत्याही विचारांकडे आपला थोडासा झुकाव सिद्ध करु शकतात. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर पंतप्रधान म्हणून त्यांना बहुलवादी भारत बांधायचा होता, त्याच्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक नैतिकतेमध्ये कोणताही विरोधाभास नव्हता.

विकास परसराम मेश्राम गोदिंया

[email protected]

Updated : 14 Nov 2021 6:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top