वाहनांवर कोण-कोण राष्ट्रीय ध्वज लावू शकतं?
X
अलिकडे आपल्या गाडीवर कोणीही राष्ट्रध्वज लावतं. मात्र, राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार ठराविक विशेष व्यक्तींनाच आहे. आणि तो वाहनावर कुठेही लावून चालत नाही. त्याचे विशिष्ट नियम आहेत. हे नियम नक्की काय आहेत. देशाचा राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार नक्की कोणकोणत्या व्यक्तींना आहे. हे आपण आता जाणून घेणार आहोत.
देशाचे राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
राज्यपाल व नायब राज्यपाल
परराष्ट्रातील भारतीय वकिलातीचे मुख्यालय(त्या देशात)
पंतप्रधान व इतर कॅबिनेट मंत्री
केंद्रातील राज्यमंत्री व उपमंत्री
लोकसभेचे सभापती
राज्यसेभचे उपसभापती
लोकसभेचे उपसभापती
हे झालं देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर...
राज्यस्तरावर कोण कोण तिरंगा आपल्या गाडीवर लावू शकत हे तुम्हाला माहिती आहे का?
राज्याचे किंवा संघराज्य प्रदेशांचे मुख्यमंत्री व इतर कॅबिनेट मंत्री
राज्याचे किंवा संघराज्य प्रदेशातील राज्यमंत्री व उपमंत्री
राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष
राज्यांच्या व संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे सभापती
राज्यांच्या विधानपरिषदांचे उपाध्यक्ष
राज्यांच्या व संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे उपसभापती
फक्त देशाचे अती महत्त्वाचे व्यक्तीचं नाही. तर न्यायालयीन प्रक्रियेतील महत्त्वाचे व्यक्ती देखील राष्ट्रध्वज लावू शकतात. त्यामध्ये
भारताचे सरन्यायधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
यांचा समावेश आहे.
राज्य घटनेच्या परिच्छेद ३४४ च्या कलम (५) ते (७) मधील सन्माननीय व्यक्ती आवश्यकतेनुसार व गरजेनुसार त्यांच्या मोटारकारवर राष्ट्रीय ध्वज लावू शकतात.
राष्ट्रध्वज वाहनाच्या कोणत्या बाजूने लावावा...
भारत सरकारने दिलेल्या वाहनातून परदेशी सन्माननीय अधिकारी जात असतील, त्यावेळी राष्ट्रीय ध्वज कारच्या उजव्या बाजूला लावला जाईल व परदेशाचा ध्वज कारच्या डाव्या बाजूला लावण्यात येईल.
रेल्वे आणि विमानावर ध्वज कधी लावला जातो?
राष्ट्रपती विशेष रेल्वेने देशांतर्गत प्रवास करतात, त्यावेळी चालकाच्या डब्याबाहेर ज्या स्थानकावरून गाडी सुटते, त्या स्थानकाच्या फलाटाच्या दिशेला राष्ट्रध्वज लावला जाईल. ज्यावेळी विशेष रेल्वे उभी असते किंवा ज्या स्थानकावर थांबणार असते, त्या स्थानकावर ती प्रवेश करताना ध्वज लावला जातो.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान परदेश भेटीवर जातील, त्यावेळी विमानावर राष्ट्रीय ध्वज लावला जातो. राष्ट्रीय ध्वजाबरोबर ज्या राष्ट्राला ते भेट देणार आहेत. त्या राष्ट्राचा ध्वजही लावण्यात येतो. परंतु वाटेत थांबणार असतील तर शिष्टाचार व सदिच्छा म्हणून ज्या देशात ते थांबतील त्या देशाचा राष्ट्रध्वज लावण्यात येतो. तसेच राष्ट्रपती ज्यावेळी देशांतर्गत दौऱ्यावर जातील. त्यावेळी ज्या बाजूने राष्ट्रपती विमानात चढतील किंवा उतरतील त्या बाजूला राष्ट्रध्वज लावण्यात येतो.
प्रियंका आव्हाड