Home > मॅक्स ब्लॉग्ज > थियेटर ऑफ रेलेव्हन्सच्या ७२ दिवसांच्या कलात्मक यात्रेत 'इकोलॉजी-ह्यूमनोलॉजी' ने युरोपला गुंजायमान केले!

थियेटर ऑफ रेलेव्हन्सच्या ७२ दिवसांच्या कलात्मक यात्रेत 'इकोलॉजी-ह्यूमनोलॉजी' ने युरोपला गुंजायमान केले!

थियेटर ऑफ रेलेव्हन्सच्या ७२ दिवसांच्या कलात्मक यात्रेत इकोलॉजी-ह्यूमनोलॉजी ने युरोपला गुंजायमान केले!
X

भारतीय रंगभूमीसाठी हे क्षण अद्वितीय व कलात्मक आहेत. सामान्यतः भारतीय रंगभूमीवर पाश्चात्य प्रभाव दिसतो, परंतु थियेटर ऑफ रेलेव्हन्सच्या नाट्य सिद्धांताने गोठलेल्या बर्फाळ युरोप खंडाला भारतीय तत्त्वज्ञान, तत्व, व आपल्या कलात्मक ऊर्जेने वितळवले. ७२ दिवस १४ सप्टेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान भारतीय रंगभूमीचा पताका युरोपमध्ये अभिमानाने फडकत राहिला.


जर्मनीच्या हॅमबर्ग शहरातल्या ब्यूरो फॉर कुल्तुर अँड मीडिया प्रोजेक्टतर्फे आयोजित किंडर कुल्तुर कारवांच्या २५ व्या उत्सवात थियेटर ऑफ रेलेव्हन्सने 'द... अदर वर्ल्ड' या नाटकाचे कोलोन, बोखम, आखन, आरन्सबर्ग, स्विरीन, डॉर्स्टन, राडोल्फझेल आणि लिव्हरकुसेन या शहरांमध्ये १० प्रयोग प्रस्तुत केले. या प्रयोगांना पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांनी, ज्यामध्ये प्रौढ, लहान मुले व तरुण यांचा समावेश होता, यांनी उपस्थित राहून नाट्यानुभव घेतला. याशिवाय १५ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ३०० हून अधिक सहभागींचा सहभाग होता. या उपक्रमांद्वारे युरोपने आपल्या तरुण पिढीला रंगभूमीच्या माध्यमातून सामाजिक चेतना देण्याचे एक अनोखे कार्य थियेटर ऑफ रेलेव्हन्सच्या हाती सोपवले. भारतीय रंगभूमीसाठी हा एक अत्यंत गौरवास्पद क्षण ठरला.

'द... अदर वर्ल्ड' हे नाटक होरपळलेल्या पृथ्वीला व उष्ण ब्रह्मांडाला शीतल करून नैसर्गिक संकटांपासून मानवतेचे रक्षण करण्याचे कलात्मक अभियान आहे. विज्ञानातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे मानव निसर्गावर वर्चस्व गाजवत आहे. मात्र, अनैसर्गिक विकासात अंध होऊन विश्वातील महाशक्तींनी पृथ्वी उद्ध्वस्त केली आहे, ज्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी संकटात आहे. हे नाटक निसर्ग, पर्यावरण आणि इकोलॉजी जपण्याची एक कलात्मक प्रतिज्ञा आहे.



रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या लेखन आणि दिग्दर्शनात, थियेटर ऑफ रेलेव्हन्सच्या अभ्यासक अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर आणि कोमल खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पाच युवा कलाकारांनी - तनिष्का लोंढे, नेत्रा देवाडिगा, प्रांजल गायकवाड, राधिका गाडेकर आणि संजर शिंदे यांनी या कलात्मक संदेशाचे युरोपमध्ये सशक्त प्रस्तुती करून, आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने युरोपमधील मुलांमध्ये निसर्गप्रेम जागवले.

किंडर कुल्तुर कारवां हा एक सांस्कृतिक कारवां आहे, जो गेल्या २५ वर्षांपासून आंतरखंडीय तरुणाईला सांस्कृतिक आदानप्रदानाचे अद्वितीय विचारमंच देत आला आहे. या उपक्रमात जगातील विविध खंडांच्या सांस्कृतिक समूहांचा सहभाग एक वैश्विक समज निर्माण करतो. यावर्षी दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील विविध सांस्कृतिक समूहांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.हॅमबर्गमध्ये पार पडलेल्या २५ व्या वार्षिक सोहळ्यात सर्व निमंत्रित समूहांनी आपल्या संस्कृतीला दर्शवणाऱ्या कलात्मक प्रस्तुती सादर केल्या. थियेटर ऑफ रेलेव्हन्सने भारतीय विविधतेच्या लोकनृत्यांच्या विशेष प्रस्तुतीने माहौल बनविला.

या प्रवासाने भारतीय रंगभूमीला नवा सन्मान मिळवून दिला आहे, जो पर्यावरण आणि मानवतेला आपल्या कलात्मकतेने उन्मुक्त करतो.


पर्यावरण आणि पृथ्वीसाठी आपली कलात्मक बांधिलकी जपताना, थियेटर ऑफ रेलेव्हन्स आपले 'द... अदर वर्ल्ड' हे नाटक २१ डिसेंबर, शनिवारी, सकाळी ११ वाजता मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी मंदिर येथे मराठीत सादर करणार आहे.

* या प्रवासाने मला दोन मौल्यवान तत्त्व दिली आहेत - सत्य आणि शक्ती. हे अनुभव मला एका बॉक्समध्ये बंद करून ठेवायचे नाहीत, तर माझ्यासोबत जिवंत ठेवायचे आहेत. - तनिष्का लोंढे

* युरोपमधील आमचा प्रत्येक परफॉर्मन्स ऊर्जेने भरलेला, हाउसफुल, सृजनशील आणि रंगीबेरंगी होता. प्रत्येक शोमध्ये नवीन लोकांना भेटणं खूपच रोमांचक होतं. - राधिका गाडेकर

* जगात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मी युरोपला प्रवास केला. 'द... अदर वर्ल्ड' या नाटकाद्वारे भारताचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटला. - नेत्रा देवाडीगा

* पर्यावरण वाचवण्याच्या ध्येयाने भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझी सर्वात मोठी उपलब्धी आहे. युरोपच्या अनुभवाने मला नवीन मार्ग दाखवला आहे. - संजर शिंदे

* या ७२ दिवसांत मी कोणाची मुलगी किंवा विद्यार्थिनी म्हणून नाही, तर प्रांजल म्हणून जीवन जगले आहे, स्वतःला ओळखले आहे. यामुळे माझ्या जीवनाला दिशा मिळाली आहे.

- प्रांजल गायकवाड.

Updated : 27 Nov 2024 8:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top