Home > मॅक्स ब्लॉग्ज > डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक विचार आजही समर्पक का ठरतात?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक विचार आजही समर्पक का ठरतात?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक विचार आजही समर्पक का ठरतात?
X

अफगाणिस्तानवर तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर तिथल्या महिलांच्या प्रश्नाबाबत आज जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातही एकेकाळी अशाच प्रकारची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात इतिहासात डोकवल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये ही विचार प्रवृत्ती पुन्हा एकदा जनमाणसात पेरण्याचं काम काही सनातनी लोक करत आहे. त्यामुळं डॉ. राजाराम मोहन रॉय, डॉ. महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची या समाजाला पुन्हा एकदा गरज असल्याचं दिसून येतं.

डॉ. राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा फुले यांनी स्त्रियांना त्यांच्या हक्क मिळून देण्यासाठी भारत पारतंत्र्यात असतानाही प्रयत्न केले आणि ते मिळवूनही दिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांना घटनात्मकरित्या तरतूद करून कायदेशीर संरक्षण मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब यांच्या या कृतीमागे त्यांचा स्त्रियांच्या हक्काप्रती असलेला विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये स्त्रियांच्या प्रगतीला, विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. 'एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे हे मी मोजतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये आयोजित ऑल इंडिया डिप्रेस़ क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स मध्ये केलेले भाषण आजही समाजासाठी मार्गदर्शकच आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज पुढे... ज्या देशात महिलांची प्रगती होते तोच देश प्रगतशील असू शकतो. असा विचार मांडत त्यांनी समाजातील स्त्रियांचं महत्त्व विषद करत देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचं महत्त्व पटवून दिलं. मात्र आज देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा वाढला असला तरी महिलांना समान हक्क, समान प्रतिनिधित्व, सामाजिक सुरक्षा मिळताना दिसत नाही. त्यामुळं २१ व्या शतकातील भारत महिलांच्या प्रगतीशिवाय महासत्ता होऊ शकत नाही. याची जाणीव बाबासाहेबांचे हे विचार आपल्याला करून देतात.

२० जुलै १९४२ ला नागपूरच्या परिषदेमध्ये २५ हजार महिलांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, तुमच्या मुलांना-मुलींना शिकवा त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा. त्यांच्या मनामधले जे न्यूनगंड आहेत ते त्यांना झटकून टाकायला सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न करण्याची घाई करू नका. लग्न ही एक जोखीम आहे. तुम्ही हे विसरता कामा नये की तुमच्या मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा, सर्वप्रकारची साधनं तुम्ही देऊ शकलात तरचं तुम्ही त्यांना लग्न करायला सांगितलं पाहिजे. कारण लग्न केल्यानंतर जी जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे ती पेलण्याची ताकद त्यांच्या खांद्यामध्ये, पायांमध्ये असली पाहिजे, तेव्हाच त्यांनी लग्न करायला हवं.

डॉ. बाबासाहेबांच्या या विचारामधून मुलांच शिक्षण करा ऐवढचं सांगून थांबत नाही तर, जो पर्यंत मुलगा आणि मुलगी स्वतच्या पायावर उभी राहत नाहीत तोपर्यंत लग्न करण्याची घाई करू नये. असा विचार या ठिकाणी बाबासाहेब व्यक्त करतात... मात्र आजच्या काळामध्ये अजूनही अनेक मुलांचे विशेषत: मुलींचं अल्पवयीन वयात लग्न लावून दिलं जातं. त्यामुळं मुला-मुलींच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचं दिसून येत.

डॉ. आंबेडकर फक्त मुला-मुलींना लग्न करण्यासाठी पायावर सक्षमरित्या उभ राहण्यासाठी सांगत नाही तर पती-पत्नीने एकमेंकांशी कसं वागावं हे सांगताना ते म्हणतात, Above all, let each girl who marries stand up to her husband, claim to be her husband'sfriend and equal and refuse to be his slave. याचा अर्थ असा की, लग्न केलेल्या मुलींनी अत्यंत आदरणारे आपल्या जोडीदाराला प्रेमाने आणि नम्रपणे सांगितलं पाहिजे की मी तुझी मैत्रिण आहे, मी तुझ्या बरोबरची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुझी गुलाम नाही. असं सांगत बाबासाहेब पती-पत्नीचं नातं कसं असावं असं विषद करतात.

कुटुंबनियोजनाबाबत डॉ. बाबासाहेब म्हणतात की, जास्त मुलांना जन्म देऊ नये. जास्त मुलं-मुली जन्माला घालणं हा देशामधला राष्ट्रीय गुन्हा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचारातून त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. त्याचबरोबर त्यांनी मांडलेल्या समस्या आजही आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात. समाजातील एक घटक म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणून पुढे जाताना हा विचार आचरणात आणला तर समाजामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल.

Updated : 3 Sept 2021 5:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top