समाज व्यवस्थेने नाकारलेल्या बहुजन नायकाची मांडणी आण्णाभाऊ साठेंनी केली
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून माणसांचे जगणे मांडले आहे. त्यांच्या साहित्यातून बहुजन समाजाच्या व्यथा आणि संघर्षाची जाणिव होते. त्यांचे साहित्य म्हणजे व्यवस्थेने नाकारलेल्या नायकाची कहाणी आहे. या नायकाने केलेल्या बंडाची कहाणी आहे. व्यवस्थेने नाकारलेल्या नायकाची मांडणी आण्णा भाऊ साठेनी आपल्या साहित्यातून केली. आण्णाभाऊ साठे च्या साहित्यात बहुजन समाजातील नायिका व नायक दिसून येतात. असे मत सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांनी मांडले.
X
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून माणसांचे जगणे मांडले आहे. त्यांच्या साहित्यातून बहुजन समाजाच्या व्यथा आणि संघर्षाची जाणिव होते. त्यांचे साहित्य म्हणजे व्यवस्थेने नाकारलेल्या नायकाची कहाणी आहे. या नायकाने केलेल्या बंडाची कहाणी आहे. व्यवस्थेने नाकारलेल्या नायकाची मांडणी आण्णा भाऊ साठेनी आपल्या साहित्यातून केली. आण्णाभाऊ साठे च्या साहित्यात बहुजन समाजातील नायिका व नायक दिसून येतात. असे मत सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांनी मांडले.
गेल्या तेरा वर्षापासून युवराज पवार जोशाबा नावाची व्याख्यानमला चालवत असून या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील साहित्यिक,विचारवंत यांना बोलावून वैचारिक विचार मंथन घडवून आणण्याचे काम केले जात आहे. बौद्ध आणि मातंग समाजातील संघर्ष कमी करण्याचे काम युवराज पवार करीत आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी आहेत.
जातीय विषमतेच्या विरुद्ध आण्णा भाऊसाठेचे लिखाण
भारतामध्ये जातीय विषमता मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. या जातीय विषमतेच्या विरुद्ध आण्णाभाऊ ना जो संघर्ष करावा लागला. त्याची मांडणी आण्णाभाऊ साठेनी आपल्या लिखाणातून मांडली. आण्णाभाऊ साठे च्या लिखाणात बंडखोर नायक आणि नायिका दिसून येतात. हे मांडत असताना आण्णाभाऊ साठे नी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजासमोर मांडले. जग बदल,घालुनी घाव,मज सांगून, गेले भीमराव हे क्रांतीची देणं सांगत-सांगत आण्णा भाऊ साठे नी साहित्याची मांडणी केली आहे. आण्णा भाऊ साठे ना ७० वर्षाचे आयुष्य लाभले म्हणण्यापेक्षा अवघे ४६ वर्षाचे आयुष्य लाभले असे म्हणावे लागेल. यामध्ये आण्णा भाऊनचा जीवन संघर्ष आहे. यामध्ये आण्णाभाऊनी वाटेगाव पासून मुंबई पर्यंत पायी प्रवास केला. हा पायी प्रवास करत असताना दररोजची दिनचर्या भागवण्यासाठी आण्णा भाऊ साठेनी विविध प्रकारची कामे केली. याच्या माध्यमातून आण्णा भाऊ साठेनी साहित्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यांची पहिली कादंबरी १९५१ साली वारणेचा वाघ प्रसिद्ध झाली. तेंव्हा पासून आण्णा भाऊ साठेनी लिखाणाला सुरुवात केली. असे मत युवराज पवार यांनी मांडले.
आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात बहुजन समाजातील नायक,नायिका
आण्णाभाऊ साठेचा साहित्याच्या माध्यमातून मांडलेला संघर्ष या देशातील,राज्यातील शोषित,वंचित, पिडीतांचा आहे. ज्यांना माणूस म्हणून व्यवस्थेने नाकारलेले आहे. असे नायक आण्णा भाऊ साठेच्या साहित्यात दिसून येतात. आण्णाभाऊ साठे नी सर्वच जाती धर्मातील माणसांसाठी लिखाण केले आहे. त्यांच्या साहित्यात महार, मांग,चांभार,डोंबारी,कैकाडी मराठा या जातीचे नायक दिसून येतात. अशा या आण्णा भाऊ साठेना आजही जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आण्णाभाऊचे लेखन येथील व्यवस्थेच्या विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक माणसाला नायक बनवणारे आहे. म्हणूनच आण्णा भाऊ एका जाती पुरते मर्यादित नाहीत. आण्णा भाऊ साठे चे साहित्य जगातील २११ देशांपैकी २७ देशामध्ये विविध प्रकारच्या १८ भाषा मध्ये प्रकाशित झालेले आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे पुरोगामी म्हणून ओळखला जातो.
आण्णा भाऊनी रशियात गायले शिवाजी महाराजांचे कवण
रशियातील स्टॅलिन ग्रँड चौकात पहिल्यांदा आण्णाभाऊ साठेनी शिवाजी महाराजांचे कावन गायले. विर,पराक्रमी,बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख रशियाला आणाभाऊ साठे यांनी करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आण्णा भाऊ साठे यांची तीन वेळा भेट झाली होती. नागपूरच्या भावे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आण्णा भाऊ साठे यांची जेवणाच्या वेळी भेट झाली होती.
मातंग समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालू लागल्यास जातीय व्यवस्थेला हादरा बसेल
मतांग समाज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालू लागल्यास जातीय व्यवस्था,धर्म व्यवस्थेला हादरा बसून कोलमडेल. आण्णाभाऊ चे विचार क्रांतिकारी, बंड करणारे आहेत. शोषित,पिढीत लोकांना लोकांना आधार देणारे आहेत. आण्णा भाऊंचे विचार पूर्णपणे समाजाने स्वीकारल्यास संपूर्ण समाज आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर येईल. परंतु येथील जातीय व्यवस्थेने त्यांना जातीत बंदिस्त करून ठेवले आहे.
गेल्या तेरा वर्षापासून सोलापुरात चालवली जातीय जोशाबा व्याख्यानमाला
दोन समाजातील सामाजिक तेढ कमी करण्यासाठी गेल्या तेरा वर्षापासून सोलापूर शहरात सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार चालवत आहेत. त्यांनी सांगितले की,२००० सालापासून सोलापुरात जोशाबा नावाची व्याख्यान माला चालवत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त परिवर्तनवादी व्याख्यानमाला चालवली जात आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील साहित्यिक,विचारवंत बोलावले जातात. त्यांच्या माध्यमातून बौध्द आणि मातंग समाजातील वैचारिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.