दिल्लीतल्या कॉंग्रेसच्या कथित टूलकीट मागची कथा...
संबित पात्रा यांनी ट्वीट केलेलं कॉंग्रेसचं कथीत टूल कीट कुठून आलं. कॉंग्रेसच्या कथीत टूल कीट प्रकरणावरून भाजप अडचणीत आलं आहे का? या सगळ्या प्रकरणात कॉंग्रेस दोषी आहे. तर कॉंग्रेसच्या एखाद्या नेत्याला पोलिसांनी अटक का केली नाही? वाचा ॲड. प्रकाश परांजपे यांनी दिल्लीतल्या टूलकीट ची सांगितलेली कथा.
X
सुरवातीला संबित पात्राने आपल्या ट्विटर अकांऊट वरुन आरोप केला की, काँग्रेसने लबाडीने एक टूल किट तयार केले असून या टूल किटचा वापर करून मोदींची जगभर बदनामी केली जात आहे. तोच आरोप त्यानंतर अनेक मंत्र्यांनी पुन्हा आपल्या ट्विटर वर केला. त्याच्या आरोपांच्या पुष्टी साठी संबित पात्रा यांनी काही तथाकथित बनावट कागदपत्रं पण आपल्या ट्विटर वरती जाहीर केली. मात्र ही कागदपत्रे बनावट असल्याबद्दल कोणतीही तक्रार संबीत पात्राने दिल्ली पोलिसांकडे केली नाही.
मात्र, त्या आरोपांना उत्तर देत काँग्रेस ने ते सर्व आरोप केवळ फेटाळले नाही तर जी कागद पत्रं संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर वर जोडली आहेत. तीच कागदपत्रं बनावट आहेत. म्हणून संबीत पात्रा व त्याचीच री ओढणाऱ्या लोकांच्या विरोधात बनावट कागदपत्रांच्या आधाराने खोटे आरोप केले. म्हणून दिल्ली पोलिसांकडे फिर्याद देखील दाखल केली.
आता या तक्रारीची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली आहे की नाही? हे दिल्ली पोलीसांनी अजूनही जाहीर केलेले नाही. असं असूनही जणू काही दखलपात्र गुन्ह्याची दखल घेतली आहे. असे समजून दिल्ली पोलीस ट्विटरच्या दिल्लीच्या ॲाफीसमध्ये कशासाठी गेली असेल?
दरम्यान मधल्या काळात आणखी काही गोष्टी घडल्या... एका स्वतंत्र संघटनेने हे जाहीर केले होते की संबीत पात्राने पुरावा म्हणून जी काँग्रेस ची लेटरपॅडस् आपल्या ट्विटर वर पुरावे म्हणून जोडली होती. ते लेटरपँडस बनावट आहेत. कारण काँग्रेसचे अधिक्रुत लेटरपँडचा फाँट आणि संबीत पात्राने पुराव्यासाठी जी काँग्रेसची म्हणून लेटरपॅड आपल्या ट्विटर जोडली त्याचा फाँट च वेगळा आहे.
एका अर्थाने संबीत पात्रा यांची चोरी पकडली गेली होती आणि त्याच बरोबरच संबीत यांच्या म्हणण्याला जिजिरे जिजीरे करणाऱ्या चार पाच मंत्र्यांची पण चोरी पकडली गेली होती. ट्विटर वर संबीतने केलेल्या ट्विट ची विश्वासार्हता काँग्रेसने चॅलेंज केल्याने त्यांनीही स्वतंत्र पणे चौकशी सुरू केली होती. चौकशी नंतर त्यांनीही संबीत पात्राच्या ट्विट चे खाली "मॅन्युपलेटेड मीडिया" असा टॅग दिला.
आता संबीत पात्राचं काय होणार? अनेक केंन्द्रीय मंत्र्यांना आता आरोपी करायला लागणार का ? अशी भिती निर्माण झालीट्विटर ने ज्या अर्थी मॅन्युपलेट मीडिया अशी नोंद केली आहे. त्या अर्थी ट्विटर कडे सुद्धा काहीतरी पुरावा असणारच हे सिद्ध करणारा की संबीत पात्रा यांनी जोडलेला पुरावा खोटा आहे. आणि म्हणून तो पुरावा नष्ट करायला दिल्ली पोलीस ट्विटर च्या आॅफीसमध्ये गेले असणार या बाबत शंका उपस्थित केली जात आहे. ट्विटर ही अमेरिकन कंपनी आहे. त्यामुळे अमेरिकेत सुद्धा याची प्रतिक्रिया येणार आहेच.
.मोदींचीच जगभर छी थू होत असल्याने मोदींना यातून यशस्वीपणे बाहेर काढण्यासाठी रचण्यात
आलेले हे एक षड्यंत्र होते. हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. उरबडवेगिरी हा स्थायीभाव असल्यानेच हा कट भाजप च्या नेतृत्वाने संबीत पात्रा मार्फत घडवून आणला नसावा का?
त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ज्याची उत्तरे दिल्ली पोलिसांनी आणि भाजप ने देणे अपेक्षित आहेत
१) संबीत पात्रा यांचे जर म्हणणे होते की काँग्रेस ने बनावट टूलकीट तयार केले आहे आणि त्याचा पुरावा त्यांच्या कडे आहे तर मग ते दिल्ली पोलिसांकडे का गेले नाही ?
२) दिल्ली पोलिसांनी जर काँग्रेसचे फिर्यादी ची दखल घेतली असेल तर त्या गुन्ह्याचा क्रमांक किती आहे? पोलीसांनी कुठल्या कलमा खाली गुन्हा दाखल केला आहे ?
३) ज्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद घेतली त्यापैकी कोणालाही अटक झालेली नाही तर निदान त्यांना विचारपूस तरी केली आहे का ?
ही आहे दिल्लीतल्या तथाकथित टूलकीट च्या मागची कथा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळण्याची आवश्यकता आहे .
ॲड. प्रकाश परांजपे
(लेखक मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच मध्ये गेले १२ वर्षापासून वकिली करत आहेत. त्यापूर्वी १६ वर्षे महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी धुळ्यात १८ वर्षे वकीली केली आहे.)