Home > मॅक्स ब्लॉग्ज > कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यावर जनतेच्या प्रेमाच्या इतमामात अंत्यसंस्कार

कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यावर जनतेच्या प्रेमाच्या इतमामात अंत्यसंस्कार

कुंडल शहरातून आज त्यांची अंत्ययात्रा निघाली. चौका चौकात वयस्कर स्त्रिया दरवाज्यात येऊन थांबल्या होत्या. कुणी आमच्या गावातला शेवटचा पुढारी गेला म्हणून अश्रू पुसत होतं. तर कुणी आमचा वाघ गेला म्हणून धाय मोकलून रडत होत. क्रांतिवीरांच्या भूमीतील शेवटच्या योद्ध्याची अंत्ययात्रा कॅप्टन भाऊ अमर रहे च्या जयघोषात भजनाच्या तालात पुढे सरकत होती.

कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यावर जनतेच्या प्रेमाच्या इतमामात अंत्यसंस्कार
X

कुंडल शहरातून आज त्यांची अंत्ययात्रा निघाली. चौका चौकात वयस्कर स्त्रिया दरवाज्यात येऊन थांबल्या होत्या. कुणी आमच्या गावातला शेवटचा पुढारी गेला म्हणून अश्रू पुसत होतं. तर कुणी आमचा वाघ गेला म्हणून धाय मोकलून रडत होत. क्रांतिवीरांच्या भूमीतील शेवटच्या योद्ध्याची अंत्ययात्रा कॅप्टन भाऊ अमर रहे च्या जयघोषात भजनाच्या तालात पुढे सरकत होती.


इंग्रजांच्या खजिना भरून निघालेल्या रेल्वे समोर शेनोली परिसरात पटरीवर दगड रचण्यात आले. रेल्वे थांबली. प्रतीसरकारच्या वाघांनी क्षणात हा खजिना ताब्यात घेतला. क्रांतिसिंहांच्या तुफान सेनेचे कॅप्टन होते कॅप्टन रामभाऊ लाड. गोवा मुक्ती संग्रामासह इंग्रजांच्या विरोधातील अनेक सशस्त्र लढ्यात त्यांनी नेतृत्व केले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. देशसेवेसाठी आयुष्य वेचले.

कुंडल शहरातून आज त्यांची अंत्ययात्रा निघाली. चौका चौकात वयस्कर स्त्रिया दरवाज्यात येऊन थांबल्या होत्या. कुणी आमच्या गावातला शेवटचा पुढारी गेला म्हणून अश्रू पुसत होतं. तर कुणी आमचा वाघ गेला म्हणून धाय मोकलून रडत होत. क्रांतिवीरांच्या भूमीतील शेवटच्या योद्ध्याची अंत्ययात्रा कॅप्टन भाऊ अमर रहे च्या जयघोषात भजनाच्या तालात पुढे सरकत होती. ट्रॅकरवर दिमाखात फडकाणारा लाल झेंडा आणि पुढे होणारा जयघोष त्यांच्या लढ्याची प्रेरणा वृद्धिंगत करत होता.

अंत्ययात्रा स्मशान भूमीत पोहचली. या सिंहाला स्वातंत्र्य विराला शेवटचा सलाम करायला, त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला लोकांचा जनसागर उसळला होता.अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली होती. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत यासाठी. एक तास वाट पहावी लागणार असल्याचे तेथे घोषित केले गेले. क्रांतिभूमीतील आपल्या वीरावर बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार या उत्सुकतेने आणि अभिमानाने प्रत्येकजण मोबाईलवर एक तास संपण्याची मिनिटा मिनिटाला वाट बघत होता. एखादी गाडी आली की लोक प्रवेशद्वाराकडे बघत होते. एक तास संपला. त्यानंतर दहा मिनिटात पोलीस येत आहेत असे दोनदा समजले. लोकांचा संताप वाढत होता. शेवटी प्रोटोकॉल चे कारण देत हि टीम पोहचणार नसल्याचे घोषित करण्यात आले. याबरोबरच भाई संपतराव यांनी यावर तीव्र आक्षेप आणि नाराजी वर्तवली.

दोन तास वाट पाहूनही हि टीम पोहचू शकली नाही. जनतेने कॅप्टन भाऊना जनतेच्या प्रेमाच्या आदराच्या स्फुर्तीच्या,देशभक्तीच्या भावनेने,नतमस्तक होत, लाल सलाम करत जनतेच्या प्रेमाच्या इतमामात अंत्यसंस्कार केले.




ज्यांच्या बलिदानावर त्यागावर देश स्वतंत्र झाला. ज्यांनी गोऱ्या इंग्रजांना परतवून लावले. ज्यांच्या जोरावर इथले सरकार बनले त्या कॅप्टन भाऊना आदरांजली वाहायला जिल्ह्यातील पालक मंत्री उपस्थित नव्हते. ना जिल्ह्याचे मंत्री. मंत्रालयीन स्तरावरून मंजुरी न मिळाल्याने पोलिसांची टीम कुंडल येथे पोहचून देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित राहू शकली नाही. निदान या मंत्र्यांनी आपल्या स्तरावर हि जबाबदारी तरी पार पाडायला हवी होती.

काय आहे नियमावली


साधारणपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात माजी मंत्री, शहीद, तसेच घटनात्मक अती विशिष्ट पदावरील व्यक्तींसाठी केला जातो. या व्यतिरिक्त समाजाप्रती ज्या लोकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अशा व्यक्तींना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री आपल्या मंत्री मंडळाशी बोलून निर्णय घेऊ शकतात. हा निर्णय विवेकबुद्धी ने घेतला जातो. प्रोटोकॉलच्या व्यतिरिक्त देखील आजवर काही लोकांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केलेले आहेत.

यामध्ये शेकडोंच्या संख्येने भक्तगण असलेल्या सत्य साईबाबा यांच्यावर देखील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. अभिनेत्री श्रीदेवी, शशी कपूर यांच्यावर देखील अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

या वेळी जिल्ह्यातील मंत्र्यांनी कॅप्टन भाऊ लाड यांच्या कार्याविषयी मुख्यमंत्र्यांना तातडीने कल्पना देऊन तातडीचा मंत्रिमंडळाचा निर्णय देखील घेतला जाऊ शकला असता. यासाठी त्यांच्याकडे चौदा तासांचा वेळ होता.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कारापासून स्वातंत्र्यसैनिक वंचित

सत्यसाईबाबा सारख्या लोकांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतो. अभिनेत्री श्रीदेवी शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतो. पण स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांना असा सन्मान दिला जात नाही. क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील, स्वातंत्र्य सेनानी इंदुताई पाटणकर कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले नाहीत. यासाठी असलेल्या प्रोटोकॉल मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

कॅप्टन भाऊना जनतेने जनतेच्या प्रेमाच्या इतमामात अंत्यसंस्कार केले. कोणत्याही स्थितीत हा जनतेसाठी संघर्षाचा अग्निकुंड विझता कामा नये. हि जबाबदारी जनतेने पार पाडायला हवी. हीच भाऊना खरी आदरांजली ठरेल...

Updated : 6 Feb 2022 7:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top