Home > मॅक्स ब्लॉग्ज > बिल गेट्‍स च्या यशातील 11 नियम

बिल गेट्‍स च्या यशातील 11 नियम

जगातील सुशिक्षीत तरुणांच्या गळ्यातील ताईत, मायक्रोसॉफ्ट'चा निर्माता बिल गेट्स चा आज वाढदिवस त्या निमित्ताने माजी खासदार भारत कुमार राऊत यांनी बिल गेट्‍स च्या यशामागील सांगितलेले 11 नियम... नक्की वाचा

बिल गेट्‍स च्या यशातील 11 नियम
X

जगातील बहुतेक सर्व सुशिक्षीत तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले 'मायक्रोसॉफ्ट'चे सहनिर्माते बिल गेट्स यांचा आज ६५ वा वाढदिवस. त्यांना लाख लाख शुभेच्छा! गेट्स यांच्याबद्दल जितके बोलावे तितके थिटेच पडेल, अशी प्रचंड कमगिरी त्यांनी करून दाखवली आहे. त्यांच्या कंपनीत त्यांचे सर्वाधिक शेअर्स आहेत. त्यामुळेच ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत पुरुष ठरले. अनेक वर्षे ते जगातील सर्वात श्रीमंत गृहस्थ होते.

अर्थात आर्थिक श्रीमंती हेच गेट्स यांचे मोठेपण नाही. इतकी मोठी कंपनी अमेरिकेच्या पश्चिम बाजूच्या सिएटल शहरातून चालवत असतानाच गेट्स यांनी जनकल्याणाचाही ध्यास धरला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या मुलांना उचीत शिक्षण मिळावे व त्यांची विचारशक्ती शास्त्रशुद्ध बनावी, यासाठी गेट्स पती-पत्नी सतत जगभर फिरून गरजूंना मदत देत असतात.



गेट्स भारतातही अधून मधून येतात. त्यांच्या मदतीतून उभ्या राहिलेल्या अनेक संस्था दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, चेन्नईच्या आसपास कार्यरत आहेत. असे बिल गेट्स. आज जगाच्या ज्ञानाचा स्रोत बनलेले गेट्स स्वत: मात्र किमान पदवीही मिळवू शकले नाहीत, कारण त्यापूर्वीच त्यांनी क्रमिक शिक्षणाला रामराम ठोकला व ते आयुष्याच्या परिक्षेला बसले. मुख्य म्हणजे त्या परीक्षेत त्यांनी घसघशीत यश मिळवले. गेट्स यांनी भारतातील एका शाळेत विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी ११ नियम सांगितले. ते विचार करण्याजोगेच आहेत.


Bill Gates 65th Birthday: Witty Quotes by Microsoft Founder That Show His Interesting Outlook Towards Successबिल गेट्‍स यांचे 11 नियम :-

नियम 1. जीवन चांगले असेलच असे नाही. त्याचा चांगला वापर करायला शिका.

नियम 2. जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.

नियम 3. शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला कोणीच जास्त पगार देणार नाही किंवा तु्म्हाला कार व मोबाईल अशा सेवाही देणार नाही. यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत करावी लागेल व उच्च पदापर्यंत स्वत: उडी घ्यावी लागेल.

नियम 4. तुमचे शिक्षक कडक आहेत, असा तुम्ही जर विचार करत असाल तर थोडे थांबा. तुम्हाला वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

नियम ५ मोठा बर्गर तुमच्या पुढे काहीच नाही. परंतु त्यासाठी तुमचे वडिल बर्गर लिपिंगसाठी दुसर्‍या अर्थाचा शब्द वापरतात तर त्याला चांगली संधी म्हणावी लागेल.

नियम ६ तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही. तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत. त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.

नियम ७ तुमच्या जन्मानंतर तुमचे आई-वडिल तुमच्याकडे जास्त लक्ष देत नसतील. पण आता ते तुमच्याविषयी अधिक जागरूकता दाखवित असतील. तुम्हाला त्यांची परिक्षा घ्यावीशी वाटत असेल तर रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवा.

नियम तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. काही शाळांमध्ये असे दिसून आले आहे की, 'नापास' हा शब्दच त्याच्या शब्दकोशातून पुसुन टाकला आहे. त्यामुळे जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास धरली पाहिजे.

नियम ९ जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.

नियम १० टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्‍यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन काय आहे ते कळते.

नियम ११ आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

Happy Birthday, Bill Gates !

- भारतकुमार राऊत

Updated : 28 Oct 2020 10:32 AM IST
Tags:    
author-thhumb

भारतकुमार

Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.


Next Story
Share it
Top