मोहवृक्षाला आदिवासींचा कल्पवृक्ष का म्हटलं जातं?
आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणजेच मोहवृक्ष. मात्र, मोहवृक्षाला आदिवासींचा कल्पवृक्ष का म्हटले जाते? त्याची आदिवासीसाठी इतकी उपयुक्तता का आहे? जाणून घेण्यासाठी वाचा वनवैभवाच्या नोंदी भाग 1 मध्ये आदिवासींचा कल्पवृक्ष मोहवृक्ष
X
आमचा गडचिरोली जिल्हा वनवैभवाने संपन्न आहे. आदिम माडीया समाजात मोह झाडाला खूप महत्व आहे. आदिवासीसाठी हा वृक्ष कल्पवृक्ष आहे. या झाडांची पाने, फुले, फळे(टोरी),खोड, मूळ औषधी म्हणून वापर होतो. या झाडाच्या लाकडाचा उपयोग जळावू लाकूड तसेच घर, इमारती बांधकामसाठी केला जातो.
या झाडाचे फळ म्हणजे टोरी हे विषारी साप चावला तर औषधी म्हणून वापरतात. टोरी पासून तेल काढले जाते व त्याचा खाण्यासाठी वापर केला जातो. टोरीचे ढेप हे कीटकनाशक असून त्याचा खत म्हणूनही वापर होतो. मोहफुलात खूप जीवनसत्व व प्रथिने आहे.
मोहफुल हे खाण्यास चविष्ट व आरोग्यदायी आहे. मोहफुलापासून अर्क काढला जातो. त्याचा दारू म्हणून वापर होतो. मोह झाडाचे पान हे पत्रावळ किंवा द्रोण बनवण्यासाठी उपयोग होतो. आदिवासी समाजाचे धार्मिक, आध्यात्मिक नाते या झाडाशी जुळलेले आहे. हे झाड माणसाला खूप काही देते. याचे जतन व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.
चिन्ना महाका, हेमलकसा