Andheri East bypoll Inside Story : अंधेरी विधानसभा निवडणूकीत भाजपची माघार का?
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली असताना भाजपने माघार का घेतली? भाजपने घेतलेल्या माघारीमागची Inside Story काय आहे? वाचा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी यांचा लेख
X
Andheri East Bypoll : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणूकीत भाजप विरुध्द शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (BJP Vs Shivena Uddhav Balasahe Thackeray)आमने-सामने आले होते. मात्र ऐनवेळी भाजपने उमेदवारी मागे घेत सर्वांनाच धक्का दिला. मात्र भाजपने माघार का घेतली? याबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी (Sudhir Suryavanshi ) म्हणाले की, ज्या दिवशी राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना पत्र लिहीले. त्या दिवशीच पुढील दिशा स्पष्ट झाली होती. कारण राज ठाकरे यांच्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या निवडणूकीबाबत अंदाज आला होता. या निवडणूकीत काही बिंदू जोडले तर भाजपे माघार का घेतली ते स्पष्ट होते.
काय आहेत कारणं?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांचा गट निवडणूक आयोगाकडे गेला. त्यावेळी त्यांनी धनुष्यबाण (Bow and Arrow)आमचाच असल्याचा दावा केला. त्यानंतर शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण गोठवण्यात आले. परंतू शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरला नाही. याऊलट भाजपने ही निवडणूक लढवण्यासाठी जोमाने सुरुवात केली होती.
आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी निवडणूकीपुर्वीच भाजपच्या उमेदवाराबाबत सुतोवाच केले होते. ही निवडणूक लढवायचीच असं भाजपने ठरवलं होतं. मात्र यामध्ये काही गोष्टी उलट घडल्या. ज्यात ऋतुजा लटके(Rutuja Latke ) या महापालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. यामागे ऋतुजा लटके निवडणूक लढवू शकणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण केली होती. जर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला नसता तर नव्या उमेदवाराकडे नवे चिन्ह आणि नवा पक्ष असल्याने भाजपसाठी ही निवडणूक सोपी होती. मात्र ऐनवेळी उच्च न्यायालय(Bombay HighCourt ) ने महापालिकेला खडसावल्यानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. हा भाजपसाठी पहिला धक्का होता. याचे महत्वाचे कारण म्हणजे ऋतुजा लटके यांचा राजीनामा अडकवल्याचा भाजपवर होणारा आरोप आणि उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावल्यानंतर ऋतुजा लटके हे नाव वेगाने घराघरात पोहचले. त्यामुळे भाजपसाठी निवडणूक अवघड झाली.
लटकेंना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे भाजपची माघार?
शिवसेनेतील फुटीनंतर आमदार, खासदार शिंदे गटात गेले असले तरी अनेक शाखा उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहेत. हे अंधेरी पोटनिवडणूकीत सिध्द झालं असतं. त्यामुळे मुंबई महापालिकेचा टोन सेट झाला असता. त्यातच ऋतूजा लटके यांचा विजय ठाकरे गटासाठी संजीवनी ठरला असता. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपला मोठा दणका बसला असता. त्यामुळे आपत्तीपुर्व नियोजन करत भाजपने मुरजी पटेल यांची माघार जाहीर केली.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र का लिहीले? याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहा...