Home > मॅक्स ब्लॉग्ज > द्रौपदी मुर्मू यांचा संघर्ष आणि साधेपणा

द्रौपदी मुर्मू यांचा संघर्ष आणि साधेपणा

NDAतर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर झाले आणि त्यांच्याविषयी इंटरनेटवर अनेकांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समाजातील असलेल्या मुर्मू ह्या मोठ्या पदांवर काम करुन अतिशय साधेपणाने वागणाऱ्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या याच साधेपणाचा किस्सा सांगणारा एक लेख सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

द्रौपदी मुर्मू यांचा संघर्ष आणि साधेपणा
X

NDAतर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर झाले आणि त्यांच्याविषयी इंटरनेटवर अनेकांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समाजातील असलेल्या मुर्मू ह्या मोठ्या पदांवर काम करुन अतिशय साधेपणाने वागणाऱ्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या याच साधेपणाचा किस्सा सांगणारा एक लेख सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुवनेश्वरच्या उपजिल्हाधिकारी विजया वार्ष्णेय यांच्या नावाने हा लेख व्हायरल झाला आहे. या लेखात त्यांनी काय म्हटले आहे पाहूया...

"जेव्हा मी भुवनेश्वरला डिप्टी कलेक्टर या पदावर होते, तेव्हा एका दुपारी मी सरकारी दौरा करून कार्यालयात आले तेव्हा एका महिलेला कार्यालया बाहेर बाकावर बसलेली बघितले. मी तिला आत बोलावुन येण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले बरेच दिवस झाले माझी एक अर्जी देऊन.त्यात माझी जमीन विकायची आहे त्या संबंधित मंजुरी हवी आहे.

तिची फाईल तपासताना लक्षात आले,या पुर्वी पण तीन वेळा ती महिला विक्री ची मंजुरी घेऊन गेली होती,पण अजून तिने जमीन विकलेली नाही. तिला कारण विचारलं तर तिने जे सांगितले,मी नि:शब्दच झाले.

पहिल्यांदा तिला मंजुरी मिळाली तर तिचा एक मुलगा अचानक वारला म्हणून विकायचे राहुन गेले. परत दुस-यांदा विकायला काढली तर नव-याचा मृत्यू झाला. या सगळ्यातून सावरले आणि परत मंजुरी मिळवली तर एकमात्र आधार असलेला दुसरा मुलगा पण वारला. आता मला कर्ज फेडण्यासाठी जमीन विकायची आहे त्यासाठीच मंजुरी हवी आहे.

मी लगेच तिला मंजुरी दिली. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून राष्ट्रपदी पदाच्या उमेदवार "श्रीमती दौपदी मुर्मु" आहे.ज्या स्वत: एक मंत्री असून बिना डामडौल,लवाजमा शिवाय एका साधारण नागरिका सारख्या कार्यालयात आल्या आणि मंजुरी मिळवली. आम्हाला अभिमान आहे अशी व्यक्ती आपल्या देशाची राष्ट्रपती होणार आहे.

लेखिका..विजया वार्ष्णेय (डिप्टी कलेक्टर)

Updated : 19 July 2022 1:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top