१ मे कामगार दिनी कामगारांचा एल्गार
X
मे दिन हा भांडवल शाही शेाषण व्यवस्थे विरेाधांत जनते च्या एकजुटीचा संदेश देणारा मेाठा ऐतिहासिक दिवस असून 1 मे हा आंतराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे. कामगार संघटना संयुक्त कृति समितीने हा दिवस केन्द्र सरकार ने मंजूर केलेल्या चार लेबर केाड रद्द करुन महाराष्ट्र सरकार ने नियमावली रद्द करण्यासाठी जुलमी केन्द्र सरकार वर दबाव आणण्यासाठी विरेाध प्रदर्शन रॅली करण्या चा निर्णय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे.
कामगार संघटना संयुक्त कृति समिती ( महाराष्ट्र राज्य ) च्या सामूहिक नेतृत्वा खाली पुणे — मुंबई मेाटर बाईक रॅली निघणार असून 1 मे रेाजी सकाळी 7 वाजता पिंपरी पुणे येथून निघेल. खेापेाली ,पनवेल पर्यंत जुना पुणे मुंबई हायवे या मार्गावरून ही मेाटर बाईक रॅली सुमारे 1500 बाईक स्वार व त्या सेाबत व्यासपीठ व माईक असलेला प्रचार रथ व काही जीप वाहने असणार आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील कारखाने व उददयेाग मेाडीत काढून कवडीमेाल भावाने जनतेची ही संपती विकण्यास हे केंद्र सरकार निर्लज्ज पणे पावले उचलीत आहे . LIC चा IPO व नंतर लगेच IDBI बँक विक्रीला कामगारांकडून कडाडून विरेाध होणार आहे. महागाई ,बेकारी व बेरेाजगारी दिवसागणिक नवीन उच्चांक करीत असताना , अर्थ व्यवस्था श्रीलंकेच्या अधपतना सारखी वेगाने गटांगळया खात आहे . ही वस्तु स्थिति सरकार लपवित आहे. नवीन रेाजगार उपलब्ध हेातील अशी केाणतीही शक्यता दिसत नाही. या परिस्थिती वर मात करण्या साठी जनतेचा संघर्ष महत्वा चा आहे, असे सह निमंत्रक विश्वास उटगी म्हणाले.
चार लेबर केाड रद्द करण्या ची मागणी करीत असतानाच महाराष्ट्र राज्यातील असंघटीत कामगारा करिता किमान वेतन सुरक्षा मिळावी , सामाजिक सुरक्षा कायदा करावा व 60 वर्षा वरील शेतकरी जनतेला पेन्शन सुविधा आणि सरकारी क्षेत्रात जुनी पेन्शन लागू करावी या बद्दल महाराष्ट्र सरकार कडे कृति समिती ने दिलेले मसूदे यांवर महाराष्ट्र सरकार ने चर्चा करून निर्णय करावा ही मागणी आहे . जनतेचे लक्ष वेधित मेाटर बाईक रॅली जे जे ब्रीज वरून आझाद मैदानात 2 वाजे पर्यंत पेाहेाचेल . सुमारे 3000 मेाटार बाईक स्वार सहभागी होणार आहेत.
कामगार विरेाधी चार लेबर केाड रद्द हेाणे व महाराष्ट्र सरकारने नियमावली रद्द करणे ह्याचा आग्रह धरलाच पाहीजे. मे दिन हा भांडवल शाही शेाषण व्यवस्थे विरेाधांत जनते च्या एकजुटीचा संदेश देणारा मेाठा ऐतिहासिक दिवस आहे. आपल्या देशांचे संविधान बदलू पाहणाऱ्या शक्ती सरकार व नेाकरशाहीत सक्रिय आहेत . लेाकशाहीचा उदघेाष करीत असताना प्रत्यक्षात हुकूमशाही व्यवस्था राबविणे हे स्पष्ट दिसत आहे .
तीन कृषि कायदे व चार लेबर केाड याच शेाषण व्यवस्था राबविणयाऱ्या शासन संस्थे चा अविष्कार आहे. कामगाराला गुलामगिरी कडे व वेठबिगारीकडे नेणारा व कॅारपेारेट भांडवलशाहीच कायम करणारा केंद्र सरकारचा अट्टाहास आहे. या विरूध्द कामगार कष्टकरी जनताच रस्त्यावरील संघर्ष करीत केन्द्र सरकारला सत्तेवरून घालवू शकते . हुकूमशाही चा पराभव हा संविधानावर चालणारी लेाकशाही वाचविण्याचा प्रयत्नातून निश्चित हेाईल. आमचा विश्वास आहे की "सत्य परास्त हेा सकता है , सत्य कभी पराजित नहीं हेा सकता ! आता संघर्षातून सत्याचाच विजय हेाईल, असे विश्वास उटगी यांनी शेवटी सांगितले.