घराचे वासे नाही तर अख्खं घर बदलत आहे.
पॉप सिंगर रियानाने शेतकरी आंदोलनाबाबतप्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे खेळाडू आणि कलाकार सोशल मिडीयातून सरकार समर्थनार्थ व्यक्त होत आहेत, या निमित्ताने आंतरराष्ट्रीय परीणामांविषयी सांगताहेत डॉ. विनय काटे...
X
रियाणाच्या मागोमाग हॅरिसच्या भाचीने केलेले tweet सहज दाखवून देते की भारताच्या लोकशाहीची होत असलेली दुरावस्था अमेरिकेच्या नवीन सत्ताधीशांनी पुरेशी ओळखली आहे. म्हणूनच कधी नाही ते एका परदेशी सेलिब्रिटीला आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने hashtag चालवत उत्तर वगैरे दिले आणि सचिन, लता, करण, अजय, अक्षय, कुंबळे, ओझा वगैरे टीनपाट लोक आणि गोदी मीडिया त्या उत्तराला हुंकार भरू लागले.
रियानाच्या मागोमाग हॅरिसच्या भाचीने केलेले tweet सहज दाखवून देते की भारताच्या लोकशाहीची होत असलेली दुरावस्था अमेरिकेच्या नवीन सत्ताधीशांनी पुरेशी ओळखली आहे. म्हणूनच कधी नाही ते एका परदेशी सेलिब्रिटीला आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने hashtag चालवत उत्तर वगैरे दिले आणि सचिन, लता, करण, अजय, अक्षय, कुंबळे, ओझा वगैरे टीनपाट लोक आणि गोदी मीडिया त्या उत्तराला हुंकार भरू लागले.
भारतातला अतिरेक झालेला राष्ट्रवाद जग पाहत आहे. अमेरिकेतल्या सत्ताबदलानंतर बायडेन यांनी औपचारिकता म्हणून सुद्धा भारतीय नेत्याला फोन केला नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविडचा बहाणा करत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होणे नाकारले. हे चित्र खूप काही गोष्टी दाखवते. येत्या काळात इतर विकसित देशही आपल्यापासून हाताचे अंतर ठेवू शकतात. आपण आहे तसे राहिलो तर येत्या काळात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडू शकतो.
लक्षात राहू द्या की भारत ही अमेरिकन आणि युरोपीय कंपन्यांसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेत त्यांनी केलेली गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून इथे खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था असणे त्यांच्यासाठी खूप गरजेचे आहे. सत्या नाडेलाने मागे CAA च्या विरोधात टिपण्णी केली होती, तेव्हा खूप काही घडले नाही कारण तेव्हा तिकडे ट्रम्प सरकार होते. ट्रम्पच्या जाण्याने आता बोरिस जॉन्सन सुद्धा सावध पावले टाकत नवीन सत्तेशी स्वतःला जुळवून घेत आहे.
बायडेन तेच आहेत ज्यांनी भूतकाळात 8 वर्ष इकडच्या महनीय नेत्याचा अमेरिकन व्हिसा नाकारला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण कुस बदललेल याची खात्री होतीच, पण ते इतक्या लवकर बदललेल हे अपेक्षित नव्हतं. गेल्या वर्षी जॉन ऑलिव्हरने CAA विरोधातल्या आंदोलनावर पूर्ण एपिसोड बनवला होता ज्यात मोदींवर भरपूर टीका होती. जॉनने मोदींचे वर्णन "Most aggressive hugger on the world stage (जागतिक पटलावरचा सगळ्यात मोठा गळेपडू)" असे केले होते. या आठवड्यात जर जॉन ऑलिव्हर अजून मोदींवर काही बोलला तर समजून घ्या की घराचे वासे नाही तर अख्ख घर बदलत आहे. आणि हो रियाना, ऑलिव्हर वगैरे लोकांना हलक्याने घेवू नये, ते अमेरिकेचे जनमत बदलण्याची ताकत ठेवून असतात. ते तेंडुलकर, बच्चन किंवा लता सारखे सरकारी सेलिब्रिटी नाहीयेत 😊