Home > गोष्ट पैशांची > गोष्ट पैशांची - गोल्ड ईटीएफ

गोष्ट पैशांची - गोल्ड ईटीएफ

गोष्ट पैशांची - गोल्ड ईटीएफ
X

आज आपण चर्चा करणार आहोत अशा वस्तू बद्दल जी भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते म्हणजे सोनं... सोन्याच्या खरेदीमध्ये भारतीयांचा हात कुणीच धरू शकत नाही. सोन्याच्या जगातल्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी भारत एक आहे. भारतामध्ये सोन्याला सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे हा भारतीयांसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरला आहे. भारतीय मुख्यत्वेकरून सोन्याचे दागिने विकत घेतात आणि यामुळेच भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पिवळा धातू आयातदार बनला आहे. अजूनही आपल्याकडे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी योग्य असलेली एक मालमत्ता म्हणून सोन्याकडे पहिले जाते. भौगोलिक आणि राजकीय अस्थिरतेमध्ये सोन्यातील गुंतवणूक हा एकच सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मागच्या १५ वर्षा मध्ये सोन्यानं १४% सरासरी परतावा दिला आहे. पण, प्रश्न असा आहे की, सोने हा खरंच संपत्ती निर्मितीसाठी योग्य पर्याय आहे का?

अनेक गुंतवणूक तज्ज्ञांचं असं सुद्धा मत आहे की सोनं हा गुंतवणुकीचा पर्ययाच नाही. सोन्याबद्दल वॉरेन बफे यांना एकदा विचारले असता ते म्हणाले...

"Gold gets dug out of the ground in Africa, or someplace. Then we melt it down, dig another hole, bury it again and pay people to stand around guarding it. It has no utility. Anyone watching from Mars would be scratching their head"

आफ्रिकेतील किंवा इतर ठिकाणच्या खाणींमधून सोनं बाहेर काढलं जातं, मग आपण त्याला वितळवतो, दुसरा खड्डा खणतो, पुन्हा एकदा त्याला त्यात दडवतो आणि त्याच्या सुरक्षेसाठी पैसे मोजतो. सोन्याची विशेष अशी कोणतीही उपयुक्तता नाही आहे. मंगळावरून कोणीही पाहत असेल तर तो संभ्रमात पडत असेल.

अलीकडेच अमेरिकेनं सिरीयावर केलेल हवाई हल्ले, उत्तर कोरीयाच्या शस्त्रस्पर्धेमुळे निर्माण झालेला तणाव, जर्मनीतील अगामी निवडणुका या आणि इतर काही जोखिमींच्या पार्श्वभूमीवर बजारात अनिश्चितेचे वातावरण आहे. अशा स्थितीत सोनं हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय असल्यानं त्याच्या मागणीत वाढ झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. रुपयाची घसरण झाली तरीही ही गुंतवणूक फायदा देते, असे समजले जाते. बाजारपेठ जेव्हा जेव्हा जोखमी वाढते तेव्हा तेव्हा सोन्याची मागणी वाढते; तसंच जोखमीची परिस्थिती कमी होते तेव्हा सोन्याची मागणीतही घटते. सोन्याच्या मागणीतील चढउतार वित्तीय बाजारपेठांची अस्थिरता नोंदवत असते.

आपण जसं पहिल्या लेखामध्ये पाहिलं की प्रत्येक गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये जोखीम आणि परतावा हा वेगळा वेगळा असतो. आपण आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित परतावा याचा अभ्यास केला तर सोनं हा एक पर्याय उपलब्ध आहे. पण, प्रत्यक्ष सोनं किंवा दागिने खरेदी करण्यापेक्षा पेक्षा गोल्ड ईटीफ आणि गोल्ड फंडामध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळेल.

सोन्यामध्ये गुंतवणूक दोन प्रकारे करता येते - भौतिक स्वरुप (सोने-चांदीची नाणी खरेदी करणे बँका आणि ज्वेलर्सद्वारे) आणि गोल्ड ईटीएफद्वारे

खालील तक्त्यावरून प्रत्यक्ष गोल्ड खरेदी आणि गोल्ड ईटीफ समजून घेऊ

प्रत्यक्ष गोल्ड खरेदीगोल्ड ईटीएफ

अर्थ

प्रत्यक्ष सोने खरेदी करणे आणि

सोन्याची शुद्धता किमान 99 .5% असू शकते किंवा नसू शकते.

गोल्ड ईटीएफ हे खुले एक्स्चेंज ट्रेडेड फंड असतात जे स्टॅंडर्ड सूवर्ण धातूमध्ये पैसा गुंतवतात ,आणि त्याची शुद्धता ९९. ५०% इतकी असते . गुंतवणुकदाराकडे ईटीएफ चे युनिट असतात ज्यांचे मूल्य बाजारातील फिजिकल सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते
किंमत

प्रत्यक्ष सोन्याची किंमत एकसमान नसते. ती प्रत्येक सोनाराकडे बदलते.गोल्ड ईटीएफची किंमत ही आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्ड प्रमाणे आणि नेहमी पारदर्शक असते
गुंतवणूक

सुवर्ण बिस्किटे 10 ग्रॅमच्या मानक मुल्यामध्ये उपलब्ध असतात ज्यासाठी जास्त गुंतवणूक आवश्यक आहेगोल्ड ईटीएफ अल्प प्रमाणात उपलब्ध आहे म्हणजे 1 ग्रामदेखील. म्हणून, गुंतवणुकीसाठी अधिक उत्तम आहे.
शुल्क

जेव्हा एखादा गुंतवणूकदार सोन्याचे दागिने खरेदी करतो तेव्हा त्याला घडणावळ शुल्कापोटी 20% -30% जास्त पैसे द्यावे लागतात.गोल्ड ईटीएफची खरेदी करताना दरवर्षी फक्त 1% चा खर्च आणि प्रत्येक व्यवहारासह खरेदी किंमतीच्या 0.5% किंवा त्यापेक्षा कमी शुल्क आकारले जाते
संपत्ती कर

१% संपत्ती कर लागू होतो. जर ३० लाखापेक्षा जास्त पैसे गुंतवल्यासगोल्ड ईटीएफवर कोणतीही संपत्ती कर लागू नाही

शॉर्टटर्म भांडवली कर

जर सोन्या मध्ये 3 वर्षांपेक्षा कमी वेळेसाठी गुंतवलास इन्कम टॅक्स स्लॅबनुसार गुंतवणुकदाराने अल्पकालीन भांडवली लाभ कर भरावा लागतोअल्पकालीन भांडवली लाभ कर हा प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदी सारखा आहे
लॉंग टर्म भांडवली करसोने तीन वर्षांनंतर नफा करून विकले तर गुंतवणूकदाराला इंडेक्सेशनसह 20% च्या कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.दीर्घकालीन भांडवली लाभ कर हा प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदी सारखा आहे
लिक्विडबॅंक आणि ज्वेलर्सकडून सोने खरेदी केली जाऊ शकते पण एक्सचेंज करता येते नाहीसोने ईटीएफची खरेदी / विक्री प्रत्यक्ष सोनेपेक्षा अधिक सोपे आहे कारण त्याचे शेअर बाजारांत व्यवहार होत असतात.
परतावाप्रत्यक्ष परतावा = वर्तमान किंमत -(सोने खरेदी किंमत+बनण्याचा खर्च )प्रत्यक्ष परतावा= युनिटची वर्तमान किंमत -(युनिटची खरेदी किंमत+ब्रोकेरज )
डिमॅट खाते

डीमॅट खाते आवश्यक नाही

डिमॅट खाते आवश्यक आहे.

सोनं प्रत्यक्षात खरेदीकरून त्याच्या सुरक्षेची जोखीम वाढवण्यापेक्षा ते फक्त कागदोपत्री खरेदी करून म्हणजेच गोल्ड ईटीफ मध्ये पैसे गुंतवणूक करून अधिक किफायतशीर ठरू शकतं. तुम्ही दर महिन्याला ३००० रुपयांच एक ग्राम सोनं घेत असाल तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर येते. पण, ते ३ हजार जर तुम्ही ईटीएफमध्ये गुंतवले तर तुम्ही फक्त कागदोपत्री सोन्याची खरेदी करता. तुमच्याकडे त्याच्या सुरक्षेची जोखीम येत नाही. तसंच प्रत्यक्षात सोनं घेतल्यावर वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे १ ग्रॅम दरमहिना प्रमाणे १२ ग्रॅम सोनं जमा होणार असेल तर ईटीएफमध्ये सुद्धा तेवढंच सोनं जमा होतं. त्याची किंमतही तेवढीच असते जेवढी प्रत्यक्षातील सोन्याची असते. फरक फक्त एवढाचं आहे की ईटीएफमध्ये तुमचं सोनं तुमच्या हातात नसतं

कमलेश भगत

(लेखक गुंतवणूक सल्लागार म्हणून हाईपॉईंट सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत )

Updated : 19 May 2017 1:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top