जनतेचा जाहीरनामा : "खोटी आश्वासनं देऊन निवडणूक लढवणाऱ्यांना धडा शिकवणार"
प्रसन्नजीत जाधव | 19 Sept 2022 8:43 PM IST
X
X
जनतेचा जाहीरनामा : "खोटी आश्वासनं निवडणूक लढवणाऱ्यांना धडा शिकवणार"जनतेचा जाहीरनामाच्या माध्यमातून मॅक्स महाराष्ट्रने मुंबईतील विविध भागातील लोकांच्या मुलभूत सुविधांबद्दलच्या समस्या मांडण्याची मोहीम सुरू केली आहे. शिवडी वॉर्ड क्रमांक 201मध्ये काही भागातील नागरिकांना अजूनही मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली की झोपडपट्टीतील लोकांना बिल्डिंगमध्ये घरे दिली जातील असे आश्वासन देण्यात येते.
पण निवडणूक झाली की हे लोकप्रतिनिधी फिरकतही नाही, अशी तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे. इथे नियमित साफसफाई होत नाही, नालेसफाई होत नाही, सार्वजनित शौचालयांचा प्रश्न गंभीर आहे अशी अनेक तक्रारी इथल्या नागरिकांनी मांडल्या आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी...
Updated : 19 Sept 2022 8:43 PM IST
Tags: slum area basic facilities Mumbai
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire