Home > हेल्थ > दिनचर्येत आहाराचे महत्व - भाग २

दिनचर्येत आहाराचे महत्व - भाग २

दिनचर्येत आहाराचे महत्व - भाग २
X

१. मांसाहार तसेच तमोगुणी आहार टाळा !

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.

२. शाकाहार, तसेच सात्त्विक आहार घ्या !

दूध, लोणी, गायीचे तूप, ताक, तांदूळ, गहू, डाळी, पालेभाज्या, फळे यांसारखे किंवा यांपासून बनवलेले सात्त्विक अन्नपदार्थ सेवन करा.

३. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मिताहार करा !

जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न सेवन करा. तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवा.

भोजनाची योग्य पद्धत

१. पाट किंवा आसन घेऊन त्यावर भोजनासाठी बसा. आसंदी-पटलावर (‘टेबल-खुर्ची’) किंवा नुसत्या भूमीवर भोजनाला बसणे टाळा.

२. शक्यतो सर्व कुटुंबियांनी स्वयंपाकघरात किंवा भोजनगृहात एकत्र भोजनाला बसावे. दक्षिणेकडे तोंड करून भोजनास बसणे टाळा.

३. वाढलेले भोजन प्रथम देवाला अर्पण करा आणि नंतर देवाचा प्रसाद म्हणून ते नामजप करत सेवन करा.

४. कोणाचे उष्टे अन्न खाऊ नका; कारण त्यामुळे वाईट शक्‍तींचा त्रास होऊ शकतो.

५. ताटात अन्नपदार्थ टाकू नका. जेवण झाल्यावर ताटाभोवताली पडलेले अन्नकण पायदळी येऊ नयेत; म्हणून लगेच उचला.

६. ‘अन्नदाता सुखी भव ।’, असे म्हणून आणि उपास्यदेवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून पाटावरून उठा.

जेवल्यानंतर वामकुक्षी करणे

दुपारी जेवल्यानंतर २४ मिनिटे डाव्या कुशीवर झोपणे, म्हणजे वामकुक्षी करणे होय. जेवल्यानंतर अन्नपचन नीट व्हावे यासाठी रक्‍ताचा जास्त पुरवठा पोटाच्या आतड्यांकडे होत असल्याने या काळात मेंदूला रक्‍तपुरवठा अल्प प्रमाणात होतो आणि मेंदूच्या कार्यात थोडी शिथिलता येते. म्हणून या काळात अगदी थोडा वेळच विश्रांती किंवा झोप घ्यावी.

Updated : 30 Jun 2017 1:53 PM IST
Next Story
Share it
Top