जे. जे. रुग्णालयात स्वछता मोहीम
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ़ भारत आवाहनाला प्रतिसाद म्हणून दरवर्षीप्रमाणे शनिवारी सर ज.जी.समुह रुग्णालयातील चारही संलग्नित रुग्णालयामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मान्सूनपूर्व स्वच्छता राबविण्याचे हे या संस्थेचे सातवे वर्ष असुन या मोहिमेमध्ये सर्व जेष्ठ़ प्राध्यापक, सर्व अध्यापक वर्ग, वैदयकीय अधिक्षक, नर्सेस, निवासी डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर्स व सर्व कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेतला.
त्याचबरोबर बांधकाम विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सर. ज. जी. समूह रुग्णालयात वेगवेगळ्या विभागात आणि कक्षात एकूण 35 पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात 50 जणांचा सहभाग होता आणि प्राध्यापक त्या पथकाचे समन्वयक म्हणून काम करत होते. या स्वच्छता मोहिमेत रुग्णालयातील 7 ट्रक कचरा आणि डेब्रिज गोळा करून उचलण्यात आला. उर्वरित कचरा आणि डेब्रिज बांधकाम विभागामार्फत पुढील दोन दिवसात उचलण्यात येणार आहे.
याचबरोबर दुलर्क्षित भागांवर लक्ष केंंद्रित करुन त्या भागाची स्वच्छता स्वच्छता करण्यात आली,ज्यामुळे अशा ठिकाणी तेथे डासांची निर्मिती होणार नाही. याचबरोबर सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या व सर्व नाल्यांची साफसफाई करण्यांत आली. या स्वच्छता मोहिमेदरम्यानरुग्नालयातील प्रत्येक भागाची पाहणी करण्यात आली आणि स्वच्छता करीत असतांना पाऊसामुळे चिखल निर्माण होऊ नये किंवा पाणी साचू नये याची खबरदारी घेण्यात आली. सर ज.जी.समुह रुग्णालयामध्ये प्रत्येक १५ दिवसांमध्ये स्वच्छता अभियान त्या त्या विभागामार्फत राबविण्यात येते. तसेच या महाविदयालयात मान्सून संपल्यानंतरही नियमितपणे स्वच्छता अभियान राबविण्यात येते.