रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही- राजेश टोपे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Jan 2022 12:39 PM IST
X
X
मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजार पेक्षा अधिक झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. "कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात बेड्स शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील वाढली नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याची असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. यासोबतच राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. बीएसव्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या उदघाटन प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केले आहे.
Updated : 7 Jan 2022 12:39 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire