Home > हेल्थ > एड्ससारख्या दुर्धर आजारावर उपाय सापडण्याची चिन्हं

एड्ससारख्या दुर्धर आजारावर उपाय सापडण्याची चिन्हं

एड्ससारख्या दुर्धर आजारावर उपाय सापडण्याची चिन्हं
X

जगभरात एड्ससारख्या भयानक रोगाला समूळ नष्ट करण्याचं संयुक्त महासंघांचं उद्दिष्ट असून. संपूर्ण जगाने योग्य ती काळजी घेतली असता 2030 पर्यंत एड्सचा समूळ नायनाट होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील हजारो पुरुषांनी निळ्या रंगाच्या अँटीव्हायरल गोळीचं दररोज सेवन केल्यामुळे एचआयव्हीच्या नवीन केसेसमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एड्ससारख्या दुर्धर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय सापडण्याची चिन्हं दिसून येत आहे. याविषयी अभ्यास करणाऱ्या जगातील पहिल्या संशोधनात ही विक्रमी घट पाहायला मिळाली.जगभरात 1990 पासून दरवर्षी 30 लाखापेक्षा जास्त व्यक्तींना एचआयव्हीची बाधा होत असल्याची नोंद आहे. मात्र 2017 मध्ये ही आकडेवारी 18 लाखांवर आल्याचं संशोधनात म्हटलं आहे.

Updated : 19 Oct 2018 4:31 PM IST
Next Story
Share it
Top