Home > News Update > पंजाबमध्ये महाराष्ट्रातील महिलांना पैशासाठी केलं जातंय टॉर्चर!

पंजाबमध्ये महाराष्ट्रातील महिलांना पैशासाठी केलं जातंय टॉर्चर!

पंजाबमध्ये महाराष्ट्रातील महिलांना पैशासाठी केलं जातंय टॉर्चर!
X

देशात कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ची घोषणा केल्यानंतर तिर्थ यात्रेला गेलेल्या 4 महिला अमृतसर मध्ये अडकल्या आहेत. वैष्णव देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्या अमृतसर येथे आल्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊन ची घोषणा केल्यानंतर त्यांना अमृतसर शहरातून बाहेर पडता आलेलं नाही.

त्यामुळं त्या एका हॉटेलला थांबल्या. ते हॉटेल त्यांच्याकडून भांडून पैसे घेत असल्याची क्लीप मॅक्समहाराष्ट्र कडे आहे. आत्तापर्यंत या महिलेकडून हॉटेल मालकाने 80 हजार रुपये घेतले आहेत. तसंच या पैशाचं बील देखील दिलेलं नाही. विशेष म्हणजे हे हॉटेल एका पोलिसाचं असल्यानं कुठंही बोलता येत नाही. या महिलांकडून पैसे घेण्यासाठी मालक मोठ्याने आरडा ओरडा करतो. असं या महिलेने मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.

1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठून आणायचा? आता पैसे संपले आहेत. तर हा माणूस आम्हाला इथून निघून जा, म्हणतो. जेवन एक एनजीओ देत आहे. अशी व्यथा सदर महिलांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली आहे.

सध्या महिलांची इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती झाली असताना त्यांना मॅक्समहाराष्ट्र चा नंबर मिळाला. त्यांनी मॅक्समहाराष्ट्र वर संपर्क केला. आणि आपली व्यथा मांडली.

दरम्यान या संदर्भात अमृतसर पोलिस स्टेशन मध्ये कॉल केला असता, त्यांनी पंजाब सरकार सर्व हॉटेलचे पैसे भरत आहे. कोणाकडूनही पैसे घेतले जात नाही. अशी माहिती दिली.

सदर चार महिलेपैकी एका महिलेचं वय 32 आहे. तर बाकी सर्व महिला ज्येष्ठ नागरिक आहेत.सध्या त्या

Hotel c7

Kot Atma singh,o/s Ram Bagh,near water tank Amritsar

या हॉटेलमध्ये राहत आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकार कडे मदतीची मागणी केली आहे.

Updated : 5 May 2020 9:54 PM IST
Next Story
Share it
Top