…अखेर शरद पवार बाहेर पडले!
X
कोरोना व्हायरस मुळं देशातील अनेक नेते देखील लॉकडाऊन झाले आहेत. विशेष म्हणजे देशावर कोणतंही संकट आलं तर स्वत: धावून जाणारे शरद पवार देखील या कोरोना व्हायरस मध्ये लॉकडाऊन झाले होते. लातूर चा भूकंप असो की गुजरात चा भूकंप असो. किंवा मुंबईत झालेले बॉम्बस्फोट असो. आत्ताच अलिकडे आलेला पश्चिम महाराष्ट्रातील पूर असो. संकट कितीही मोठं असलं तर शरद पवार उभे राहतात. हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.
कोरोना व्हायरस च्या संकटापुढं मात्र, शरद पवार बाहेर पडणार नाही. असं वाटत असताना आज शरद पवार अखेर बाहेर पडले. आज त्यांनी मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पाहणी करतानाच तिथल्या क्वारंटाईन सुविधेचा व परिस्थितीचा आढावाही शरद पवार यांनी घेतला.